PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 23 JUN 2020 7:44PM by PIB Mumbai

Delhi-Mumbai, June 23, 2020

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

पीएम केअर्स फंड ट्रस्टने मेड इन इंडिया अर्थात भारतात निर्मित होणाऱ्या 50,000 व्हेंटीलेटरच्या  पुरवठ्यासाठी 2000 कोटी रुपये निर्धारित केले असून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातल्या सरकारी कोविड रुग्णालयांना  हे व्हेंटीलेटर पुरवण्यात येणार आहेत.तसेच स्थलांतरित मजुरांच्या कल्याणासाठी 1000 कोटी रुपये  निर्धारित करण्यात आले आहेत. 50,000 व्हेंटीलेटरपैकी 30,000 व्हेंटीलेटरची भारत इलेक्ट्रोनिक्स मधे निर्मिती करण्यात येत आहे. आतापर्यंत 2923 व्हेंटीलेटरची निर्मिती झाली असून त्यापैकी 1340 व्हेंटीलेटरचा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्राला 275, दिल्ली 275, गुजरात 175, बिहार 100, कर्नाटक 90, तर राजस्थानला 75 व्हेंटीलेटर पुरवण्यात आले. 2020 जून अखेरपर्यंतआणखी 14,000 व्हेंटीलेटर राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना देण्यात येतील.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

जागतिक आरोग्य संघटनेच्या 22 जून, 2020 रोजी प्रसिद्ध झालेल्या 154 व्या परिस्थिती अहवालानुसार भारतात प्रति लाख लोकसंख्येमागे सर्वात कमी मृत्यूची नोंद आहे. भारतात प्रति लाख लोकसंख्येमागे मृत्यूचे प्रमाण 1.00 आहे तर जागतिक सरासरी त्याच्या सहापटीपेक्षा जास्त म्हणजे 6.04 आहे. युनायटेड किंग्डममध्ये प्रति लाख लोकसंख्येमागे कोविड-19 आजाराने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण 63.13 आहे तर स्पेन, इटली आणि अमेरिकेत हे प्रमाण अनुक्रमे 60.60, 57.19 आणि 36.30 आहे.

भारतात, सुरवातीच्या लक्षणात संक्रमित व्यक्तींचा शोध, वेळेवर चाचणी आणि सर्वेक्षण करणे, प्रभावी उपचार व्यवस्थापनासह विस्तृत प्रमाणात संपर्कित व्यक्तींचा शोध यामुळे मृत्यू दर तपासण्यात मदत झाली आहे. कमी प्रमाणावरील मृत्यूची नोंद हे कोविड -19 च्या प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी राज्ये / केंद्रशासित प्रदेशांसह भारत सरकारच्या श्रेणीबद्ध, पूर्व-प्रभावी आणि प्रतिबंधात्मक सक्रिय दृष्टिकोनाचे फलित आहे.

रूग्ण बरे होण्याचा दर सातत्याने वाढत आहे. आजमितीस कोविड-19 चे 56.38% रुग्ण बरे झाले आहेत. कोविड-19 चे आत्तापर्यंत एकूण 2,48,189 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात कोविड-19 चे 10,994 रुग्ण बरे झाले आहेत.

सध्या 1,78,014 सक्रिय रुग्ण असून ते सर्व वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.

शासकीय प्रयोगशाळांची संख्या 726 पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या 266 पर्यंत वाढली आहे ज्यामुळे एकूण 992 प्रयोगशाळा झाल्या आहेत. वर्गवारी खालीलप्रमाणे:

जलद आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा:  553 (शासकीय: 357 + खाजगी: 196)

ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा: 361 (शासकीय: 341 + खाजगी: 20)

सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा: 78 (शासकीय: 28 + खाजगी:  50)

गेल्या 24 तासात नमुने तपासणीत 1,87,223 पर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत 71,37,716 नमुने तपासण्यात आले आहेत.

माहिती तंत्रज्ञानाचा सक्रिय वापर, स्थानिक सरपंचांना अधिकारप्राप्त बनवून, लोकसहभागाने कुशल आरोग्यसेवा तयार करणे आणि असुरक्षित गटांचे संरक्षण यासारख्या कोविड विरोधी सक्रिय उपाययोजनांवर ओदिशा सरकारने लक्ष केंद्रित केले आहेत. यामुळे कमी मृत्यू दरासह रोग प्रसाराचा धोका कमी झाला आहे. भुवनेश्वर महानगरपालिकेने शहरातील गंभीर आजार झालेल्या व्यक्ती आणि वृद्ध नागरिकांच्या पूर्ण देखरेखीसाठी सचेतक हे मोबाईल अॅप विकसित केले आहे. ओदिशा सरकारने कोविड-रूग्णांना आरोग्य सेवा देण्यासाठी 1.72 लाख आरोग्य कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले आहे.

इतर अपडेट्स:

  • काटेकोर टाळेबंदी आणि सामाजिक अंतर राखण्याच्या उपाययोजनांचा मात्र अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला. जीव वाचवण्याच्या तसेच उदरनिर्वाहाच्या धोरणात - जान भी जहान भीहळू हळू बदल घडवून आणत असताना, सेवा आणि उद्योग टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू करण्यासाठी 1 जूनपासून भारत अनलॉक इंडियाटप्प्यात दाखल झाला आहे. कमीतकमी नुकसानीसह अर्थव्यवस्था लवकरात लवकर पूर्वपदावर आणण्यासाठी सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने अल्प मुदतीच्या आणि दीर्घ मुदतीच्या - त्वरित धोरणात्मक उपाययोजना केल्या आहेत.
  • श्रम आणि रोजगार मंत्रालयाने 24 मार्च 2020 रोजी जारी केलेल्या सूचनेनुसार एक महत्त्वाचे पाऊल उचलत राज्य सरकारांनी लॉकडाऊनच्या काळात इमारत आणि इतर बांधकाम क्षेत्रातील सुमारे दोन कोटी नोंदणीकृत मजुरांना आतापर्यंत 4957 कोटी रुपयांच्या रोख मदतीचे वाटप केले आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनेंच्या माध्यमातून सुमारे 1.75 कोटी व्यवहार मजुरांच्या थेट बँक खात्यांमध्ये करण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात मजुरांना 1000 ते 6000 रुपयांपर्यंतची रोख रकमेची मदत करण्याव्यतिरिक्त काही राज्यांनी आपल्या कामगारांना अन्न आणि रेशन देखील उपलब्ध करून दिले. कोविड-19 लॉकडाऊनच्या अतिशय आव्हानात्मक परिस्थितीमध्ये सर्व राज्ये आणि राज्य कल्याण मंडळांशी बांधकाम मजुरांच्या कल्याणासाठी समन्वय साधणारे नोडल केंद्रीय मंत्रालय म्हणून काम करणाऱ्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने या मजुरांना या मदतीची सर्वाधिक गरज असताना वेळेवर रोख रक्कम मिळावी म्हणून कोणतीही कसर बाकी ठेवलेली नाही.
  • केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज सांगितले की कोरोना साथीच्या आजारामुळे उद्‌भवलेल्या गंभीर आव्हानांमुळे, सौदी अरेबियन सरकारच्या निर्णयाचा आदर करत आणि लोकांचे आरोग्य आणि हित लक्षात घेत भारतातील मुसलमानांना यावर्षी हज (1441 एच/2020 एडी) साठी सौदी अरेबियाला न पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ते आज नवी दिल्ली येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते.
  • अग्रक्रमाने कर्जपुरवठा देय असणाऱ्या क्षेत्रात कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पांचा समावेश करण्याबाबत सरकार विचार करत आहे. त्यामुळे सीबीजी प्रकल्पांना सुलभपणे अर्थसहाय्य प्राप्त होईल, असे पेट्रोलियम, नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. तामिळनाडूमधील नामक्कल येथे सीबीजी प्रकल्प आणि सीबीजी इंधन स्थानकांच्या ऑनलाइन उद्‌घाटन प्रसंगी ते आज बोलत होते. नवीन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी, सीबीजी प्रकल्प उभारणीसाठीचे केंद्रीय आर्थिक सहाय्य किंवा अनुदान 2020-21 पर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. सीबीजी प्रकल्प व्यवहार्य आहेत आणि नवीन उद्योजकांना त्यातून आकर्षक परतावा मिळू शकेल, असेही त्यांनी सांगितले.
  • केंद्र सरकारने पूर्ण पिकलेल्या आणि सोललेल्या नारळाचे 2020 च्या हंगामासाठी किमान समर्थन मूल्य (एमएसपी) प्रति क्विंटल 2700 रूपये घोषित केले आहे. 2019 च्या  हंगामामध्ये पक्व नारळाचे मूल्य 2,571 रूपये प्रति क्विंटल होते. या तुलनेत यंदा सरकारने समर्थन मूल्यामध्ये 5.02 टक्के वाढ केली आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले की, मोदी सरकारने देशभरामध्ये प्रत्येक स्तरावर सर्व कृषी उत्पादकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. कोविड-19 महामारीच्या संकटामुळे नारळाच्या पुरवठा साखळीमध्‍ये खूप व्यत्यय निर्माण झाला होता, त्यामुळे नारळ उत्पादक अडचणीत आले होते. आता या वाढीव समर्थन मूल्यामुळे नारळ उत्पादक शेतकरी बांधवांना लाभ होणार आहे.

महाराष्ट्र अपडेट्स

गेल्या 24 तासात 3,721 रुग्णांची भर पडल्यानंतर  महाराष्ट्रातील रुग्ण संख्या सध्या 1,35,796 आहे. 67,706 रुग्ण बरे झाले आहेत तर सक्रीय रुग्ण 61,793 आहेत.  भारतीय नौदलाच्या आयएनएस शिवाजी लोणावळा प्रशिक्षण केंद्रातील 8 प्रशिक्षणार्थी कॅडेट्स पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांना पुण्याच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

FACTCHECK

 

RT/MC/SP/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1633745) Visitor Counter : 254