आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 सद्यस्थिती
कोविड-19 मधून बरे झालेल्यांची संख्या ही सक्रीय रुग्णांपेक्षा 50,000 हून अधिक
रुग्ण बरे होण्याचा दर 55.49% पर्यंत वाढला
Posted On:
21 JUN 2020 1:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जून 2020
कोविड-19 मधून बरे होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. आत्तापर्यंत 2,27,755 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात कोविड-19 चे 13,925 रुग्ण बरे झाले आहेत. कोविड-19 मधून बरे होण्याचा दर 55.49% पर्यंत वाढला आहे.
सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 1,69,451असून ते सर्व वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.
आज कोविड-19 मधून बरे झालेल्यांची संख्या ही सक्रीय रुग्णांपेक्षा 58,305 ने जास्त आहे.
चाचणी प्रयोगशाळांची संख्या आणि पायाभूत सुविधा वाढविण्याच्या सातत्यपूर्ण प्रयन्तांमुळे शासकीय प्रयोगशाळांची संख्या 722 पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या 259 पर्यंत वाढली आहे (एकूण 981 प्रयोगशाळा).
वर्गवारी खालीलप्रमाणे:
जलद आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा: 547 (शासकीय: 354 + खाजगी: 193)
ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा: 358 (शासकीय: 341 + खाजगी: 17)
सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा: 76 (शासकीय: 27 + खाजगी: 49)
दररोज चाचणी करण्यात येणाऱ्या नमुन्यांच्या संख्येतही वृद्धी झाली आहे. गेल्या 24 तासात 1,90,730 नमुने तपासण्यात आले. त्यामुळे आत्तापर्यंत 68,07,226 नमुने तपासण्यात आले.
कोविड-19 शी संबंधित सर्व तांत्रिक मुद्द्यांविषयी, मार्गदर्शक तत्वांविषयी आणि सल्ल्यासंबंधी अधिकृत व अद्ययावत माहितीसाठी कृपया येथे नियमितपणे भेट द्याः https://www.mohfw.gov.in/ आणि @MOHFW_INDIA.
कोविड -19 शी संबंधित तांत्रिक प्रश्न technicalquery.covid19[at]gov[dot]in यावर तर इतर प्रश्न ncov2019[at]gov[dot]in and @CovidIndiaSeva यावर पाठवू शकता.
कोविड -19 वर काही प्रश्न असल्यास कृपया आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संपर्क साधा : + 91-11-23978046 या हेल्पलाइनवर किंवा 1075 (टोल फ्री) क्रमांकावर. कोविड-19 वरील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाइन क्रमांकाची यादी देखील https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf यावर उपलब्ध आहे.
* * *
M.Chopade/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1633122)
Visitor Counter : 225
Read this release in:
English
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam