PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 20 JUN 2020 7:45PM by PIB Mumbai

Delhi-Mumbai, June 20, 2020

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोविड -19 संकटाची झळ सोसावी लागल्यामुळे मोठ्या संख्येने गावी परत येत असलेल्या स्थलांतरित मजुरांना  सक्षम बनवण्यासाठी आणि उपजीविकेच्या संधी  उपलब्ध करुन देण्यासाठी ‘गरीब कल्याण रोजगार अभियान’ या नावाने एक व्यापक रोजगार कम-ग्रामीण सार्वजनिक कार्य अभियान सुरु केले. 20 जून (शनिवारी) बिहारच्या तेलीहार, ब्लॉक बेलदौर, जिल्हा खगरिया या गावामधून या अभियानाला सुरुवात करण्यात आली. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 6 सहभागी राज्यांचे मुख्यमंत्री आणि प्रतिनिधी, विविध केंद्रीय मंत्री आणि अन्य या कार्यक्रमात  उपस्थित होते.

'प्रधान मंत्री गरीब कल्याण पॅकेज'चा भाग म्हणून केंद्र सरकारने महिला, गरीब जेष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांना 1.70 लाख कोटी रुपयांच्या मोफत अन्नधान्य आणि आर्थिक मदत जाहीर केली. या योजनेच्या जलदगती अंमलबजावणीवर केंद्र आणि राज्य सरकार सातत्याने लक्ष ठेवून आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजअंतर्गत 42 कोटीहून अधिक गरीब लोकांना 65,454 कोटी रुपयांचे वित्तीय सहाय्य प्राप्त झाले आहे.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती:

गेल्या 24 तासात कोविड-19 चे 9,120 रुग्ण बरे झाल्यामुळे आत्तापर्यंत एकूण 2,13,830 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 54.13% पर्यंत पोहोचला आहे.

सध्या संक्रमित रुग्णांची संख्या 1,68,269 असून ते सर्व सक्रिय वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.

शासकीय प्रयोगशाळांची संख्या 715 पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या 259 पर्यंत वाढली आहे (एकूण 974 प्रयोगशाळा).

वर्गवारी खालीलप्रमाणे:

जलद आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा: 543 (शासकीय: 350 + खाजगी: 193)

ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा: 356 (शासकीय: 338 + खाजगी: 18)

सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा: 75 (शासकीय: 27 + खाजगी: 48)

गेल्या 24 तासात 1,89,869 नमुने तपासण्यात आले. त्यामुळे आत्तापर्यंत 66,16,496 नमुने तपासण्यात आले.

कोविड-19शी संबंधित सर्व तांत्रिक मुद्द्यांविषयी, मार्गदर्शक तत्वांविषयी आणि सल्ल्यासंबंधी अधिकृत व अद्ययावत माहितीसाठी कृपया येथे नियमितपणे भेट द्या:-

https://www.mohfw.gov.in/ आणि @MOHFW_INDIA.

कोविड-19शी संबंधित तांत्रिक प्रश्न technicalquery.covid19@gov.in यावर, तर इतर प्रश्न ncov2019@gov.in and @CovidIndiaSeva यावर पाठवू शकता.

इतर अपडेट्स:

महाराष्ट्र अपडेट्स: महाराष्ट्रात शुक्रवार संध्याकाळपर्यंत कोविडचे 3827 नवीन रुग्ण आढळले असून यामुळे राज्यात एकूण रुग्णसंख्या 1,24,331 इतकी झाली आहे. यापैकी 55,651 रुग्ण निरीक्षणाखाली आहेत. मुंबईमध्ये 1269 नवे रुग्ण आढळले असून 114 कोरोना बधितांचा मृत्यू झाला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने विशेष कोविड-19 रुग्णालय उभे केले आहे. यामध्ये 1 हजार खाटा उपलब्ध असून त्यापैकी 300 आयसीयू खाटा आहेत. भायखळामधील रिचर्डसन व क्रुड्डास येथील आवारात ही सुविधा करण्यात आली आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या देखरेखीसाठी उभारण्यात आलेले हे रुग्णालय या महिना अखेरीस कार्यान्वित होईल.

 

 

 

RT/SP/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1633001) Visitor Counter : 30