आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 सद्यस्थिती


केंद्रीय मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी भारताच्या पहिल्या फिरत्या आय-लॅबचे (संसर्गजन्य रोग निदान प्रयोगशाळा) केले उद्घाटन

रुग्ण बरे होण्याचा दर 52.96% पर्यंत वाढला

Posted On: 18 JUN 2020 6:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 जून 2020


कोविड-19 ची चाचणी सुविधा शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचावी म्हणून तयार करण्यात आलेल्या भारताच्या पहिल्या फिरत्या आय-लॅबचे (संसर्गजन्य रोग निदान प्रयोगशाळा) उद्घाटन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केले. देशातील दुर्गम, अंतर्गत आणि सुलभ दळणवळणाचे मार्ग नसलेल्या भागात ही प्रयोगशाळा तैनात केली जाईल आणि प्रति दिन 25 कोविड-19 आरटी-पीसीआर चाचण्या, दररोज 300 एलिसा चाचण्या, क्षयरोग, एचआयव्ही इत्यादींसाठी अतिरिक्त चाचण्या घेण्याची तिची क्षमता आहे. कोविड नियंत्रण धोरणाअंतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैव तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने ही संसर्गजन्य रोग निदान प्रयोगशाळा सुरु करण्यात आली आहे.

गेल्या 24 तासात कोविड-19 चे 7390 रुग्ण बरे झाले आहेत. कोविड-19 चे आत्तापर्यंत एकूण 1,94,324 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 52.96% पर्यंत वाढला आहे. सध्या 1,60,384 संक्रमित रुग्ण वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.

शासकीय प्रयोगशाळांची संख्या 699 पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या 254 पर्यंत वाढली आहे (एकूण 953 प्रयोगशाळा). वर्गवारी खालीलप्रमाणे:

जलद आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा: 540 (शासकीय: 349 + खाजगी: 191)

ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा: 340 (शासकीय: 325 + खाजगी: 15)

सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा: 73 (शासकीय: 25 + खाजगी: 48)

गेल्या 24 तासात 1,65,412 नमुने तपासण्यात आले. त्यामुळे आत्तापर्यंत  62,49,668 नमुने तपासण्यात आले.

कोविड-19 शी संबंधित सर्व  तांत्रिक मुद्द्यांविषयी, मार्गदर्शक तत्वांविषयी आणि सल्ल्यासंबंधी अधिकृत व अद्ययावत माहितीसाठी कृपया येथे नियमितपणे भेट द्याः https://www.mohfw.gov.in/ आणि @MOHFW_INDIA.

कोविड-19शी संबंधित तांत्रिक प्रश्न technicalquery.covid19[at]gov[dot]in यावर तर इतर प्रश्न ncov2019[at]gov[dot]in आणि CovidIndiaSeva यावर पाठवू शकता.

कोविड-19 वर काही प्रश्न असल्यास कृपया आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संपर्क साधा : + 91-11-23978046 या हेल्पलाइनवर किंवा 1075 (टोल फ्री) क्रमांकावर. कोविड-19 वरील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाइन क्रमांकाची यादी देखील https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf यावर उपलब्ध आहे.


* * *

S.Tupe/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1632353) Visitor Counter : 263