आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 सद्यस्थिती


रुग्ण बरे होण्याचा दर 52.8% पर्यंत वाढला

Posted On: 17 JUN 2020 4:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 जून 2020

गेल्या 24 तासात कोविड-19 चे 6922 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत कोविड-19 चे एकूण 1,86,934 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 52.80% पर्यंत वाढला आहे. सध्या, 1,55,227 रुग्ण वैद्यकीय देखरेखीखाली आहेत.

सरकारी प्रयोगशाळांची संख्या 674 आणि खासगी प्रयोगशाळांची संख्या 250 (एकूण 924) पर्यंत वाढवली आहे.  विभागणी पुढे दिली आहे -

रीअल-टाइम आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा : 535 (सरकारी 347 + खाजगी 188)

ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा : 316  (सरकारी 302  + खाजगी 14)

सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा : 73 (सरकारी 25 + खाजगी 48)

गेल्या 24 तासांत 1,63,187 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. आतापर्यंत चाचणी केलेल्या नमुन्यांची एकूण संख्या 60,84,256 इतकी आहे.

कोविड -19 शी संबंधित सर्व  तांत्रिक मुद्यांविषयी, मार्गदर्शक तत्वांविषयी आणि सूचनांसंबंधी अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी कृपया येथे नियमितपणे भेट द्या:- https://www.mohfw.gov.in/ आणि @MOHFW_INDIA.

कोविड -19 शी संबंधित तांत्रिक प्रश्न technicalquery.covid19[at]gov[dot]in यावर तर इतर प्रश्न ncov2019[at]gov[dot]in आणि @CovidIndiaSeva यावर पाठवू शकता.

कोविड -19 बाबत  काही प्रश्न असल्यास कृपया आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संपर्क साधा : + 91-11-23978046 या हेल्पलाइनवर किंवा 1075 (टोल फ्री) क्रमांकावर. कोविड -19 संबंधी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाइन क्रमांकाची यादी देखील https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .यावर उपलब्ध आहे.

 

S.Tupe/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1632088) Visitor Counter : 249