पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  टांझानियाचे अध्यक्ष महामहीम डॉ जॉन पॉमबे जोसेफ मगुफुली यांच्यात दूरध्वनीवरून संभाषण

Posted On: 12 JUN 2020 10:29PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 13 जून 2020

 

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज टांझानियाचे अध्यक्ष महामहीम डॉ जॉन पॉमबे जोसेफ मगुफुली यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

पंतप्रधानांनी जुलै 2016 मध्ये दार-ए-सलामला दिलेल्या भेटीची आठवण करून दिली आणि टांझानियाबरोबर पारंपारिक मैत्रीपूर्ण संबंधाना भारत देत असलेल्या महत्वावर त्यांनी भर दिला. टांझानिया सरकार आणि जनतेच्या आकांक्षा तसेच गरजा लक्षात घेऊन टांझानियाच्या विकासाच्या प्रवासात भागीदारी करण्याच्या भारताच्या प्रतिबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

कोविड -19  च्या पार्श्वभूमीवर टांझानियामधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी टांझानियाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधानांनी राष्ट्रपती डॉ. मगुफुली यांचे आभार मानले.

उभय नेत्यांनी एकूण द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला. भारत आणि टांझानिया दरम्यान वाढती विकास भागीदारी, शैक्षणिक संबंध आणि व्यापार आणि गुंतवणूकीचा ओघ याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आणि याला आणखी वेग देण्याच्या शक्यतेवर चर्चा केली.

यावर्षीच्या अखेरीस टांझानियामध्ये होणाऱ्या अध्यक्षीय आणि संसदीय निवडणुकांसाठी पंतप्रधानांनी महामहिम अध्यक्ष मगुफुली आणि टांझानियाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या.

*****

B.Gokhale/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1631330) Visitor Counter : 287