पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी राजसी आशियाई सिंहांच्या वाढत्या संख्येबद्दल व्यक्त केला आनंद
प्रविष्टि तिथि:
10 JUN 2020 8:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जून 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या गिर अरण्यातील राजसी आशियाई सिंहांच्या वाढत्या संख्येबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
पंतप्रधान आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत की, “दोन खूप चांगल्या बातम्या आहेत: गुजरातच्या गिर अरण्यात राहणाऱ्या राजसी आशियाई सिंहांच्या संख्येमध्ये जवळपास 29 टक्क्यांनी वृद्धी झाली आहे.
भौगोलिकदृष्ट्या, वितरण क्षेत्र 36 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
गुजरातची जनता आणि ज्यांच्या प्रयत्नांमुळे ही उत्कृष्ट कामगिरी साध्य झाली आहे, ते सर्वच कौतुकास पात्र आहेत.
मागील अनेक वर्षांपासून, गुजरातमधील सिंहांच्या संख्येत निरंतर वाढ होत आहे. समुदायाचा सहभाग, तंत्रज्ञानावर भर, वन्यजीव आरोग्यसेवा, योग्य अधिवास व्यवस्थापन आणि मानव-सिंह संघर्ष कमी करण्यासाठी उचललेल्या उपाययोजनांमुळे याला अधिक बळकटी मिळाली. आशा आहे की ही सकारात्मक प्रवृत्ती कायम राहील!”
S.Pophale/S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1630827)
आगंतुक पटल : 313
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam