PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
07 JUN 2020 7:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली-मुंबई 7 जून 2020

(Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours, inputs from PIB Field Offices and Fact checks undertaken by PIB)


आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
गेल्या 24 तासात कोविड-19 चे 5,220 रुग्ण बरे झाले आहेत. कोविड-19 चे आत्तापर्यंत एकूण 1,19,293 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे कोविड -19 रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 48.37% वर पोहोचले आहे. आजमितीस 1,20,406 रुग्ण संक्रमित असून ते सक्रिय वैद्यकीय परीक्षणाखाली आहेत.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने संक्रमित व्यक्तींमध्ये नोवेल कोरोना विषाणू शोधण्यासाठी चाचणी क्षमता वाढविली आहे. सरकारी प्रयोशाळांची संख्या 531 पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या 228 पर्यंत (एकूण 759) वाढविण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 1,42,069 नमुने तपासण्यात आले. आत्तापर्यंत चाचणी केलेल्या नमुन्यांची एकूण संख्या 46,66,386 आहे.
इतर अपडेट्स:
- कोविड-19 महामारीच्या काळात सर्वात असुरक्षित व्यक्तींना रोख देयकांच्या समर्थनासाठी भारताने यशस्वीरीत्या केलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी नीती आयोग आणि मायक्रोसेव्ह कन्सल्टिंग यांनी 5 जून रोजी आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन केले होते.
- माध्यमांच्या एका विशिष्ट विभागाद्वारे वृत्त दिले जात आहे की आर्थिक वर्ष 2019-20 साठी प्रत्यक्ष कर संकलनाच्या वाढीत लक्षणीय घसरण झाली आहे आणि जीडीपी वाढीच्या तुलनेत प्रत्यक्ष कर संकलनाचा उत्साह नकारात्मक झाला आहे. या वृत्तातून प्रत्यक्ष करांच्या वाढीसंदर्भात योग्य चित्र दाखवण्यात आले नाही . ही वस्तुस्थिती आहे की आर्थिक वर्ष 2019-20 साठी निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन आर्थिक वर्ष 2018-19.मधील निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनापेक्षा कमी होते. परंतु प्रत्यक्ष करांच्या वसुलीत ही घट अपेक्षित धर्तीवर आहे आणि आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये हाती घेण्यात आलेल्या ऐतिहासिक कर सुधारणांमुळे आणि जास्त परताव्यामुळे ती तात्पुरत्या स्वरूपाची आहे.
- नवी दिल्लीतल्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टने (एनजीएमए) 8 जून 2020 ते 3 जुलै 2020 या कालावधीत ऑनलाईन 'नैमिष' 2020 उपक्रम आयोजित केला आहे. सध्या साथीमुळे उद्भवलेली परिस्थिती आणि लॉकडाऊन दरम्यान संग्रहालये आणि सांस्कृतिक संस्था अभ्यागत आणि प्रेक्षकांना नेहमीप्रमाणे सेवा देऊ शकत नाहीत. यामुळे एनजीएमएने प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी नवे मंच शोधले. गेल्या दोन महिन्यांत एनजीएमएने अनेक व्हर्चुअल कार्यक्रम आणि प्रदर्शन आयोजित केली.
- सध्याच्या महामारीच्या परिस्थितीत, नासॉफरेन्जियल (एनपी) स्वॅबवर विसंबून राहण्याजोगी परिस्थिती नाही, परिणामी याच्या पुरवठा साखळीत विलंब होतो, किंमती वाढतात आणि गुणवत्तेमध्ये फरक पडतो. सीएसआयआर – राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा (सीएसआयआर-एनसीएल), पुणे यांनी कोविड-19 रूग्णाच्या घशातून नमुने गोळा करण्यासाठी स्वदेशी एनपी स्वॅब विकसित केला आहे. सीएसआयआरने एप्रिलच्या मध्यात एनपी स्वॅबसाठी देशांतर्गत तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे एनसीएलच्या निदर्शनास आणून दिले होते.
- ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन, अणु ऊर्जा आणि अंतराळ मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी मोदी सरकारच्या दुस-या कार्यकाळातल्या पहिल्या वर्षात ईशान्य विकास मंत्रालयाने केलेल्या कामगिरीची पुस्तिका आणि ई-आवृत्तीचे प्रकाशन केले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमाच्यावेळी ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाचे सचिव उपस्थित होते. यावेळी शिलाँग येथे असलेल्या मंत्रालयाच्या कार्यालयातले वरिष्ठ अधिकारीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कार्यक्रमामध्ये सहभागी झाले.
- सध्याच्या कोविड-19 च्या परिस्थितीतही भारत सरकारच्या खते विभागाच्या सार्वजनिक क्षेत्र उपक्रम आरसीएफ अर्थात राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडने आपले कामकाज चालू ठेवण्यात यश मिळविले असून चालू आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या दोन महिन्यांत कंपनीच्या औद्योगिक उत्पादनांच्या विक्रीने 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. प्रमुख उत्पादने आहेत: अमोनिया- स्टीलच्या नायट्रिडिंगसाठी, रॉकेटचे इंधन आणि औषध निर्मितीत रेफ्रिजरेंट म्हणून याचा उपयोग होतो.
महाराष्ट्र अपडेट्स
गेल्या चोवीस तासात सापडलेल्या 2,739 नवीन केसेस सहित महाराष्ट्रातील रुग्ण संख्या 82,698 झाली आहे. राज्यातील एकूण मृत्यू 2,969 आहेत यापैकी 120 मृत्यू गेल्या 24 तासात नोंद झाले, आजवर 37,390 लोकांना बरे झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे असे महाराष्ट्र आरोग्य विभाग कळवतो. गेल्या 24 तासात 2,234 इतके रुग्ण बरे झाले आहेत खाजगी रुग्णालयांच्या गैरप्रकारांच्या तक्रारींना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पाच सनदी अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे ज्यांना तक्रारी ई-मेलद्वारे कळवल्या जाऊ शकतील या या अधिकाऱ्यांद्वारे एकूण 35 रुग्णालयांवर देखरेख ठेवली जाईल.

*******
RT/MC/SP/PK
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1630076)
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada