• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
रसायन आणि खते मंत्रालय

आरसीएफने चालू आर्थिक वर्षात औद्योगिक उत्पादनांच्या एकूण विक्रीत ओलांडला 100 कोटी रुपयांचा टप्पा

Posted On: 06 JUN 2020 7:32PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 जून 2020


सध्याच्या कोविड-19 च्या परिस्थितीतही भारत सरकारच्या खते विभागाच्या सार्वजनिक क्षेत्र उपक्रम आरसीएफ अर्थात राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडने आपले कामकाज चालू ठेवण्यात यश मिळविले असून चालू आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या दोन महिन्यांत कंपनीच्या औद्योगिक उत्पादनांच्या  विक्रीने 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

प्रमुख उत्पादने आहेत: अमोनिया- स्टीलच्या नायट्रिडिंगसाठी, रॉकेटचे इंधन आणि औषध निर्मितीत  रेफ्रिजरेंट म्हणून याचा उपयोग होतो.

अमोनियम नायट्रेट- कोळसा खाणीसाठी स्फोटकात वगैरे.

अमोनियम बाय-कार्बोनेट- बेकरी उत्पादनांसाठी, चामडे कमावण्यासाठी.

मिथाइल अमाईन्स - कीटकनाशके, डायस्टफ, औषध निर्मितीत.

संहत नायट्रिक आम्ल: स्फोटके, औषध निर्मितीत.

विद्राव्य  नायट्रिक आम्ल: दागिने, प्रोपेलेंट

अरगॉन-  आर्क वेल्डिंग

फॉर्मिक आम्ल: रबर, चामडे.

डाय-मिथाईल-फॉर्मॅमाईड- फायबर्स, स्पॅनडेक्स आणि पॉलीअमाइड्स साठी विद्रावक.

डाय-मिथाईल असेटामाईड-पॉलिस्टर फिल्म, ऍक्रिलिक फायबर्ससाठी विद्रावक.

सोडियम नायट्रेट :  प्रोपेलेंट आणि स्फोटकांमध्ये.

आर्थिक वर्ष 2018-19 च्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत आरसीएफचा 2019-20 आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीतील निव्वळ नफा 190 % वाढला.

आरसीएफचा निव्वळ नफा गेल्या वर्षाच्या 48.47 कोटी रुपयांवरून 193.54% वाढ नोंदवत मार्च पर्यंतच्या तिमाहीत तिप्पट होऊन 142.28 कोटी रुपयांवर पोहोचला.

आर्थिक वर्ष 2018-19 च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये आरसीएफचा निव्वळ नफा 49 % वाढला.

गत वर्षाच्या तुलनेत निव्वळ नफा 139.17 कोटी रुपयांवरून वाढून 31st March 2020 ला संपलेल्या आर्थिक वर्षात 208.15 कोटी रुपयांवर पोहोचला.

गत वर्षाच्या तुलनेत कंपनीचा उत्पादन विक्रीतून येणारा वार्षिक महसूल 9 % वाढून 9698 कोटी रुपयांवर पोहोचला जो कंपनी सुरु झाल्यापासूनचा सर्वाधिक आहे. गत वर्षाच्या तुलनेत अपवादात्मक गोष्टी व्यतिरिक्त वार्षिक व्याज, कर, घसारा आणि कर्जफेडीची तरतूद या वर्षी 36 % वाढून  711.96 कोटी रुपये झाली.

कंपनीसमोर अनेक आव्हाने असूनही चालू वर्षाची आर्थिक कामगिरी मागील वर्षाच्या तुलनेत चांगली आहे.

भारत सरकारने प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेल्या सुधारित नवीन किंमत योजना III अंतर्गत काही प्रकल्पांना (30 वर्ष जुने + गॅसवर परिवर्तित केलेले) 150 रुपये प्रति टन व्हिन्टेज भत्ता आणि युरियासाठी अतिरिक्त 350 रुपये प्रति टन निश्चित किंमत दिल्यामुळे खत उद्योगाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

उपरोक्त भत्ता आरसीएफने आर्थिक वर्ष 2019-20 च्या चौथ्या तिमाहीच्या हिशोबात घेतला आहे.    

आरसीएफच्या संचालक मंडळाने 28.40% लाभांश देण्याची शिफारस केली आहे, कंपनीच्या इतिहासातील त्याची आतापर्यंतची सर्वोच्च लाभांश घोषणा आहे.

आरसीएफचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक एस.सी. मुदगेरीकर यांनी नमूद केले आहे की आर्थिक वर्ष 2019-20 दरम्यान उत्पादित व व्यापार केलेल्या खतांच्या एकूण विक्रीत मागील वर्षाच्या तुलनेत 7% वाढ झाली आहे. कंपनीच्या कॉम्प्लेक्स फर्टिलायझर-सुफला विक्रीत मागील वर्षाच्या तुलनेत 15% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात आरसीएफने सेंद्रिय वाढ उत्तेजक आणि पाण्यात विद्राव्य सिलिकॉन खत ही दोन नवीन उत्पादने बाजारात आणली. आर्थिक वर्ष 2019-20 दरम्यान आरसीएफने दररोज 15 दशलक्ष लिटर क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरु केला. सरकारी खात्यात युरिया आयात करण्यासाठी  आरसीएफला राज्य व्यापार उपक्रम म्हणून मान्यता मिळाली आणि त्यांनी युरियाची 16 लाख मेट्रिक टन आयात केली.

पुढे जाऊन, शेती क्षेत्राला आथिर्क वर्ष 2020-21 मध्ये चांगल्या पावसाळ्याच्या अंदाजातून मदत मिळणे अपेक्षित आहे. सध्या सुरू असलेल्या कोविड-19 महामारीच्या काळात कंपनी आगामी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे तयार आहे आणि येणाऱ्या संधींचे सोने करण्यास सज्ज आहे.


* * *

B.Gokhale/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com



(Release ID: 1629928) Visitor Counter : 279


Link mygov.in