PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 05 JUN 2020 7:00PM by PIB Mumbai

Delhi-Mumbai, June 5, 2020

(Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours, inputs from PIB Field Offices and Fact checks undertaken by PIB)

गवी या आंतरराष्ट्रीय लस आघाडीला  15 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स देण्याचे भारताने वचन दिले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी आयोजित केलेल्या जागतिक लस शिखर परिषदेला  पंतप्रधान  नरेंद्र मोदी संबोधित करत  होतेज्यात 50 पेक्षा जास्त देशांचे - उदयोजकसंयुक्त राष्ट्र संस्था नागरी संस्था, सरकारचे  मंत्री, राष्ट्र प्रमुख आणि देशांचे  नेते सहभागी झाले होते. ही परिषद आभासी माध्यमाद्वारे घेण्यात आली. पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले की, या आव्हानात्मक काळात भारत जगाबरोबर एकजुटीने उभा आहे

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

वर्गीकृत, प्रतिबंधात्मक आणि सक्रिय दृष्टिकोनातून भारत आपली टाळेबंदी  उठवण्याची प्रक्रिया सुलभ करीत असल्याने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोविडचा प्रसार होण्याची शक्यता अधिक असलेल्या सार्वजनिक आणि निम-सार्वजनिक वातावरणात काम करण्यासाठी एसओपी अर्थात प्रमाणित कार्यप्रणाली अपलोड केली आहे.

गेल्या 24 तासात कोविड-19 चे 5,355 रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत कोविड-19 चे एकूण 1,09,462 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे कोविड -19 रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 48.27% वर पोहोचले आहे. आजमितीस कोरोना बाधित 1,10,960 रुग्ण असून ते सक्रिय वैद्यकीय परीक्षणाखाली आहेत.

सरकारी प्रयोशाळांची संख्या 507 पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या 217 पर्यंत वाढविण्यात आली आहे (एकूण 727 प्रयोगशाळा). गेल्या 24 तासांत 1,43,661 नमुने तपासण्यात आले. आतापर्यंत चाचणी केलेल्या नमुन्यांची एकूण संख्या  43,86,379 आहे.

5 जून 2020 पर्यंत, 1,66,460 अलगीकरण खाटा, 21,473 अतिदक्षता खाटा आणि 72,497 ऑक्सिजन समर्थित खाटा असलेल्या 957 कोविड समर्पित रुग्णालये उपलब्ध झाल्यामुळे कोविडशी संबंधित आरोग्य सुविधा मजबूत झाली आहे. 1,32,593 अलगीकरण खाटा, 10,903 अतिदक्षता खाटा आणि 45,562 ऑक्सिजन समर्थित खाटा असलेली कोविड समर्पित 2,362 आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. देशात कोविड चा प्रसार रोखण्यासाठी 11,210 विलगीकरण केंद्रे आणि 7,529 कोविड सेवा केंद्रे असून तिथे 7,03,786 खाटा उपलब्ध आहेत. आतापर्यंत केंद्राने राज्ये / केंद्रशासित प्रदेश / केंद्रीय संस्थांना 128.48 लाख एन 95 मास्क आणि 104.74 लाख वैयक्तिक संरक्षक उपकरणे (पीपीई) उपलब्ध करुन दिली आहेत.

इतर अपडेट्स:

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच पर्यावरणावर भर दिला आहे. आपल्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान म्हणाले होते की आपल्याला झाडं लावण्याची आणि जगवण्याचीही गरज आहे. आज जागतिक पर्यावरण दिनी हाच आपला संदेश आहे, आज विश्व पर्यावरण दिवस आहे, या वेळेचा विषय आहे- जीवविविधता. आपण आज संकल्प करुया, पाणी वाचवण्याचा, वीज वाचवण्याचा, पर्यावरण वाचवण्याचा, आणि स्वच्छता राखण्याचा, पेट्रोल वाचवण्याचा, येवढे आपण जर केले तर आपण निश्चित पर्यावरण दिवसाची प्रतिज्ञा पूर्ण केली, असे होईल, असे पर्यावरण मंत्री, प्रकाश जावडेकर जागतिक पर्यावरण दिन सोहळ्याप्रसंगी म्हणाले. कोविड-19 आजाराच्या माध्यमातून निसर्ग आपल्याला सांगतो आणि आठवण करुन देतो आहे की आपण निसर्गसंरक्षणासाठी अधिक काळजीपूर्वक विशेष प्रयत्न करायला हवे आहेत.  असे पर्यावरण राज्यमंत्री बाबूल सुप्रीयो यावेळी म्हणाले.
  • केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री  रमेश पोखरियाल निशंक यांनी आज विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना ऑनलाइन सुरक्षित राहण्याबाबत जनजागृती करण्यासाठी कोविड -19 च्या काळात सुरक्षित ऑनलाइन शिक्षण ही माहिती पुस्तिका डिजिटली प्रकाशित केली. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) आणि युनेस्कोच्या  नवी दिल्ली कार्यालयाने ही पुस्तिका विकसित केली. लहान मुले, तरुणांना मूलभूत गोष्टींच्या माध्यमातून ऑनलाइन सुरक्षित ठेवण्यात आणि सुरक्षितपणे इंटरनेट कसे वापरावे हे पालकांना आणि शिक्षकांना आपल्या मुलांना शिकवण्यात मदत करण्यात ही पुस्तिका महत्त्वपूर्ण ठरेल.
  • यूपीएससी म्हणजेच केंद्रीय लोक सेवा आयोगाच्यावतीने कोविड -19 महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज एका विशेष बैठक घेतली. आता केंद्र सरकारने आणि राज्य सरकारांनी टाळेबंदीमध्ये मोठ्या प्रमाणावर शिथिलता आणली आहेहे लक्षात घेवून लोक सेवा आयोगाने आपल्या भरती चाचण्यांचे सुधारित वेळापत्रक यूपीएससीच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • कोविड -19 मुळे देशातील सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर , यावर्षीचा आंतरराष्ट्रीय योग दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर डिजिटल पद्धतीने साजरा होणार आहे. आयुष मंत्रालयाबरोबर आज आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे (आयसीसीआर) चे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी ही माहिती दिली. यावर्षी, या कार्यक्रमाद्वारे व्यक्तींसाठी योगासनांची उपयुक्तता, जागतिक महामारीचा सामना करण्यासाठी प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी आणि या संकटाच्या काही महत्त्वपूर्ण बाबीच्या  व्यवस्थापनासाठी समुदायाला बळकट करण्यावर भर दिला जाईल, असे डॉ सहस्रबुद्धे म्हणाले.
  • दिल्लीमध्ये रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने निदान चाचण्या आणि त्याच्या बरोबरीने आक्रमक  देखरेख आणि रुग्णाच्या संपर्कातील लोकांचा शोध, कठोर प्रतिबंध आणि त्या परिघातल्या बाबींचे नियमन करण्याची आवश्यकता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी व्यक्त केली आहे.
  • कोविड-19 ची सद्यस्थिती पाहता, राज्य सरकारांना खर्च करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे; तसेच या सध्याच्या परिस्थिती मध्ये त्यांच्या स्रोतांवरही विपरीत परिणाम झाला आहे, हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने, डिसेंबर 2019 ते फेब्रुवारी 2020 या कालावधीसाठी, राज्य/केंद्र शासित प्रदेशांना 36,400 कोटी रुपयांची जीएसटी भरपाई जारी केली आहे. एप्रिल-नोव्हेंबर 2019 या कालावधीसाठी 1,15,096 कोटी रुपयांची जीएसटी भरपाई राज्य/केंद्रशासित प्रदेशांना याआधीच देण्यात आली आहे.
  • कोविड-19 महामारीमुळे आणि संपूर्ण देशभरामध्ये टाळेबंदी जारी करावी लागल्यामुळे देशामध्ये इतर क्षेत्राप्रमाणेच शैक्षणिक क्षेत्रामध्येही आलेली शिथिलता, साचलेपण कमी करून या सर्वांना कामामध्ये उत्साह वाटावा यासाठी नॉर्थ ईस्ट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (एनईआयएसटी) ने एक योजना तयार केली आहे. आसाममधल्या जोरहाटस्थित सीएसआयआर -एनईआयएसटी यांनी देशव्यापी ग्रीष्मकालीन संशोधन प्रशिक्षण कार्यक्रमाचे (सीएसआयआर-एसआरटीपी-2020) आयोजन केले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून  घोषणा सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर सी. मंडे कार्य करणार आहेत.
  • कोविड-19 चा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगावर परिणाम याबाबत केंद्रीय एमएसएमई, आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज चामडे निर्यात परिषद, फिकी- एनबीएफसी कार्यक्रम,आणि आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रतिनिधींसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे बैठक घेतली. सध्याच्या आर्थिक अस्थिरतेला सामोरे जाण्यासाठी एमएसएमई क्षेत्राला अत्यावश्यक असलेली चालना देण्यासाठी केंद्र सरकारने विशेष आर्थिक पॅकेज- आत्मनिर्भर भारत अभियान जाहीर केल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले.

***

 

RT/MC/SP/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1629679) Visitor Counter : 222