शिक्षण मंत्रालय

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जनजागृती करण्यासाठी “कोविड -19 च्या काळात सुरक्षित ऑनलाइन शिक्षण” माहिती पुस्तिका प्रकाशित केली


नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (एनसीईआरटी) आणि युनेस्को नवी दिल्ली कार्यालयाने ऑनलाइन सुरक्षित राहण्याबाबत विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ही पुस्तिका केली विकसित

Posted On: 05 JUN 2020 5:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 जून 2020

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री  रमेश पोखरियाल निशंक यांनी आज विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना ऑनलाइन सुरक्षित राहण्याबाबत जनजागृती करण्यासाठी कोविड -19 च्या काळात सुरक्षित ऑनलाइन शिक्षण ही माहिती पुस्तिका डिजिटली प्रकाशित केली. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) आणि युनेस्कोच्या  नवी दिल्ली कार्यालयाने ही पुस्तिका विकसित केली. लहान मुले, तरुणांना मूलभूत गोष्टींच्या माध्यमातून ऑनलाइन सुरक्षित ठेवण्यात आणि सुरक्षितपणे इंटरनेट कसे वापरावे हे पालकांना आणि शिक्षकांना आपल्या मुलांना शिकवण्यात मदत करण्यात ही पुस्तिका महत्त्वपूर्ण ठरेल.

पुस्तिकेचे प्रकाशन केल्यानंतर रमेश पोखरीयाल  म्हणाले की, कोविड -19 परिस्थितीच्या काळात  ऑनलाईन आणि दूरस्थ शिक्षणामध्ये मोठी वाढ झाली आहे. बरीच मुले आणि शिक्षक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरुन एकमेकांबरोबर सहभागी होऊन  शिकत आहेत. मनुष्यबळ  विकास मंत्रालय, केंद्र  सरकार आणि एनसीईआरटीमुले आणि शिक्षकांसाठी सुरक्षित ऑनलाइन वातावरण सुनिश्चित करण्यासाठी आणि त्यांना ऑनलाइन सुरक्षित राहण्यास सक्षम करण्यासाठी वचनबद्ध आहे. आम्ही सायबर धमकीने पीडित सर्वाना आवाहन करतो कि त्यांनी याबाबत तक्रार नोंदवा आणि मदत मागा.  एनसीईआरटी आणि युनेस्को यांनी संयुक्तपणे ही पुस्तिका तयार केली  आहे हे जाणून मला आनंद झाला आहे. यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांची जागरूकता वाढवण्यास तसेच सायबर धमकी प्रकरणी वेळेवर कारवाई करण्यास मदत होईल. "

कोविड -19 महामारीचा  प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 20 मार्च 2020 पासून देशभरातील शाळा, विद्यापीठे, प्रशिक्षण केंद्रे आणि इतर शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या. यामुळे शिक्षणाचे अभूतपूर्व नुकसान झाले आणि 90% पेक्षा जास्त शाळकरी मुलांच्या शिक्षणावर  याचा परिणाम झाला आहे. मनुष्यबळ  विकास मंत्रालय आणि राज्य शिक्षण विभाग यांनी विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवरुन शिक्षणाचे सातत्य सुनिश्चित करण्यासाठी ठोस प्रयत्न केले आहेत. वेगवेगळी डिजिटल प्लॅटफॉर्म  किशोरवयीन मुलांसाठी खुली झाल्यामुळे सायबर धमक्यांना बळी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.

भारतात5-11  वर्षाच्या वयोगटातील अंदाजे 71 दशलक्ष मुले त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या उपकरणांवर  इंटरनेटचा वापर करतात. आणि देशातील  500 दशलक्षपेक्षा अधिक सक्रिय इंटरनेट वापरकर्त्यांपैकी त्यांचे प्रमाण 14  टक्के इतके आहे. भारतातील इंटरनेट वापरणारे दोन तृतीयांश लोक 12-29 वर्षाच्या वयोगटातील आहेत (इंटरनेट मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाने सामायिक केलेली माहिती ). आकडेवारी आणि सांख्यिकीने अधोरेखित केले आहे की लॉकडाउननंतर, इंटरनेटने  मुले आणि तरुणांसाठी ऑनलाइन भेदभावासह सायबर धमक्यांचा धोका वाढवला आहे.  या समस्यांकडे लक्ष देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) आणि युनेस्को नवी दिल्ली कार्यालयाने ही माहिती पुस्तिका विकसित केली.

युनेस्को नवी दिल्लीचे संचालक आणि  प्रतिनिधी एरिक फाल्ट म्हणाले, युनेस्को सर्व मुलांसाठी सुरक्षित, सर्वसमावेशक आणि आरोग्याला  प्रोत्साहन देणार्‍या शैक्षणिक वातावरणात प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे. मुलांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून द्यायचे असेल तर संकेतस्थळे डिजिटल प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सायबर धमकीपासून मुक्त असणे अत्यावश्यक आहे. ‘कोविड 19 च्या काळात सुरक्षित ऑनलाइन शिक्षण’ हे शीर्षक असलेली ही पुस्तिका या सायबर धमक्यांचे नकारात्मक परिणाम आणि ती दूर करण्याचे व टाळण्याचे मार्ग अधोरेखित करते. युनेस्को आणि एनसीईआरटी यांना या पुस्तिकेचा विकास करून खूप समाधान मिळले आहे आणि आशा आहे की हे सुरक्षित ऑनलाइन वातावरण तयार करण्यात मोलाचे साधन म्हणून काम करेल.

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक प्रा. हृषिकेश सेनापती म्हणाले, लाइन सुरक्षा आणि सायबर धमक्या प्रतिबंधित करण्याच्या मुद्यांकडे आपण लक्ष दिले नाही तर शिक्षण प्रणालीतील आमची गुंतवणूक कुचकामी ठरणार आहे. असुरक्षित शिक्षण वातावरण आपल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची गुणवत्ता खराब करू शकते, कारण शैक्षणिक यश आणि भविष्यातील शिक्षण तसेच विद्यार्थ्यांच्या रोजगाराच्या संभाव्यतेवर याचा विपरित परिणाम होतो. चिंता, भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण शिकण्यासाठी विसंगत आहे आणि एनसीईआरटी तरुणांचे आरोग्य आणि कल्याण आणि ऑनलाइन धमक्यांपासून संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे.

इंग्रजीसाठी येथे क्लिक करा

हिंदीसाठी येथे क्लिक करा

 

B.Gokhale/S.Mhatre/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1629640) Visitor Counter : 315