अर्थ मंत्रालय

प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज : आतापर्यंतची प्रगती


प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजअंतर्गत, सुमारे 42 कोटी गरजूंना 53,248 कोटी रुपयांची मदत

Posted On: 03 JUN 2020 11:57AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 जून 2020

 

प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजअंतर्गत 1.70 लाख कोटी रुपयांच्या निधीमधून केंद्र सरकारने, महिला, गरीब ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांना थेट रोख मदत आणि अन्नधान्य देण्याची घोषणा केली आहे. या पॅकेजच्या त्वरित आणि प्रभावी अंमलबजावणीकडे केंद्र तसेच राज्य सरकारांचे लक्ष आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 42 कोटी गरजूंना 53,248 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत देण्यात आलेल्या मदतीचा तपशील पुढीलप्रमाणे : -  

  • पीएम किसान योजनेच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत 8.19 कोटी लाभार्थींना आतापर्यंत 16394 कोटी रुपयांची मदत गरजेनुसार देण्यात आली आहे.  
  • 20.05 कोटी (98.33%) महिलांच्या जन धन खात्यात, मदतीच्या पहिल्या हप्त्यापोटी, 10029 कोटी रुपये रक्कम जमा करण्यात आली आहे. यापैकी, जन धन च्या एकूण महिला खातेधारकांपैकी, 8.72 कोटी महिलांनी (44%) पहिल्या हप्त्यापोटी जमा झालेली रक्कम खात्यातून काढली आहे. 20.62 कोटी (100%) महिलांच्या खात्यात दुसऱ्या हप्त्याचे 10,315 कोटी रुपये जमा झाले आहेत. दुसऱ्या हप्त्याच्या जमा रकमेतील, 9.7 कोटी(47%) खातेधारक महिलांनी पैसे काढले आहेत.
  • सुमारे 2.81 कोटी ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि दिव्यांग व्यक्तींच्या खात्यात, दोन हप्त्यांत, एकूण 2814.5 कोटी रुपये जमा झाले आहेत. 
  • 2.3 कोटी बांधकाम मजुरांना 4312.82 कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे.
  • आतापर्यंत, एप्रिल महिन्यासाठी 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी  101 लाख मेट्रिक टन अन्नधान्य घेतले आहे. एप्रिल महिन्यात 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी 73.86 कोटी लाभार्थ्यांना 36.93 लाख मेट्रीक टन अन्नधान्याचे वाटप केले आहे. तर मे महिन्यात, 65.85 कोटी लाभार्थ्यांना 32.92 लाख मेट्रिक टन अन्नधान्याचे वितरण करण्यात आले. जून महिन्यात, 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी गरजूंना 3.58 लाख मेट्रीक टन अन्नधान्याचे वाटप केले आहे. विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 5.06 लाख मेट्रीक टन डाळींचेही वाटप करण्यात आले आहे. एकूण 19.4 कोटी लाभार्थ्यांपैकी 17.9 कोटी लाभार्थ्यांना 1.91 लाख मेट्रीक टन डाळींचे वितरण करण्यात आले आहे.
  • प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत, एकूण 9.25 कोटी गॅस सिलेंडर्सची नोंदणी करण्यात आली असून आतापर्यंत गरजूंना 8.58 कोटी सिलेंडर्स मोफत वितरीत करण्यात आले आहेत
  • EPFO म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या 16.1 लाख सदस्यांनी ऑनलाईन पैसे काढण्याच्या सुविधेचा लाभ घेतला असून, ना-परतावा तत्वावर कर्मचाऱ्यांनी 4725 कोटी रुपये निधी काढला आहे.  
  • चालू आर्थिक वर्षात 48.13 कोटी मानवी दिवसांचे काम निर्माण करण्यात आले आहे. मजुरीचा दर वाढवल्याविषयीची अधिसूचना 01-04-2020 रोजी जारी करण्यात आली होती. त्याशिवाय, मजुरी आणि वस्तूंची देयके देण्यासाठी राज्यांना 28,729 कोटी रुपये रोख निधी देण्यात आला आहे.
  •  59.23 लाख कर्मचाऱ्यांच्या खात्यात 24% भविष्य निर्वाह निधीपोटी, 895.09 कोटी रुपये रक्कम जमा करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज

एकूण थेट लाभ हस्तांतरण : 2/06/2020 पर्यंत

 

योजना

लाभार्थींची संख्या

रक्कम

प्रधानमंत्री जन-धन महिला खातेधारकांना मदत

पहिला हप्ता - 20.05 कोटी  (98.3%)

दुसरा हप्ता –20.63 कोटी

पहिला हप्ता  - 10029 कोटी

दुसरा हप्ता – 10315 कोटी

दुर्बल घटकांना मदत (वृध्द विधवा, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक)

2.81 कोटी (100%)

पहिला हप्ता  - 1407 कोटी

दुसरा हप्ता  – 1407 कोटी

पीएम किसान योजनेअंतर्गत  शेतकऱ्यांना मदत

8.19 कोटी

16394 कोटी

बांधकाम मजुरांना मदत

2.3 कोटी

4313 कोटी

EPFO मध्ये 24% योगदान

59 कोटी

895 कोटी

उज्ज्वला

पहिला हप्ता  – 7.48

दुसरा हप्ता  – 4.48

8488 कोटी

एकूण

42 कोटी

53248 कोटी

 


* * *

S.Thakur/R.Aghor/D.Rane
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1628913) Visitor Counter : 313