PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 30 MAY 2020 7:45PM by PIB Mumbai

Delhi-Mumbai, May 30, 2020

(Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours, inputs from PIB Field Offices and Fact checks undertaken by PIB)

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

गेल्या 24 तासात कोविड-19 चे एकूण 11,264 रुग्ण बरे झाले असून आत्तापर्यंत प्रति दिन बरे होणाऱ्यांच्या संख्येतील हा उच्चांक आहे. त्यामुळे कोविड-19 चे आत्तापर्यंत 82,369 रुग्ण बरे झाले आहेत.

याचा परिणाम म्हणून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 24 तासात 4.51% ने वाढून 47.40% वर पोहोचले आहे. आधीच्या दिवशी ते 42.89% होते.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे 29 मे रोजी असलेली सक्रीय रुग्णांची संख्या 89,987 वरून कमी होऊन सध्या 86,422 झाली आहे. सर्व बाधित रुग्ण सक्रिय वैद्यकीय देखरेखीखाली आहेत.

30 मे 2020 रोजीच्या आकडेवारीनुसार रुग्णसंख्या दुप्पट होण्याचे गेल्या 14 दिवसातील प्रमाण 13.3 दिवस होते ते गेल्या तीन दिवसात वाढून 15.4 दिवस झाले आहे. मृत्यू दर 2.86% आहे. 29 मे 2020 च्या आकडेवारीनुसार कोविड-19 चे 2.55% बाधित रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत, 0.48% रुग्ण व्हेंटिलेटरवर तर 1.96% रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. देशातील चाचणी क्षमता वाढली असून सध्या 462 सरकारी तर  200 खाजगी प्रयोगशाळेत नमुना चाचणी केली जात आहे. आत्तापर्यंत या सर्व ठिकाणी मिळून कोविड-19 च्या 36,12,242 चाचण्या करण्यात आल्या असून 1,26,842 नमुन्यांची चाचणी काल करण्यात आली.

कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी देशातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधांचा विचार करता आजमितीस 942 कोविड समर्पित रुग्णालये असून त्यात 1,58,908 अलगीकरण खाटा, 20,608 अतिदक्षता खाटा, 69,384 ऑक्सिजन सुविधा असलेल्या खाटा आहेत.  2,380 कोविड समर्पित आरोग्य केंद्रे असून त्यात 1,33,678 अलगीकरण खाटा, 10,916 अतिदक्षता खाटा आणि 45,750 ऑक्सिजन सुविधा असलेल्या खाटा कार्यरत आहेत. देशात कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 10,541 विलगीकरण केंद्रे आणि  7,304 कोविड सेवा केंद्रे असून तिथे सध्या 6,64,330 खाटा उपलब्ध आहेत. केंद्र सरकारने राज्य/ केंद्रशासित प्रदेश/ मध्यवर्ती संस्थांना 119.88 लाख  एन95 मास्क आणि 96.14 लाख वैयक्तिक संरक्षण उपकरणे (PPEs) पुरविली आहेत.

इतर अपडेट्स:

  • संपूर्ण देशभरात कोविड-19 च्या चाचण्या मोठ्या संख्येने करणे शक्य व्हावे यासाठी सर्व सरकारी संस्थांमध्ये संशयित रुग्णांचे नमुने घेण्याची सुविधा करण्यात आली आहे. यासाठी शहरांमध्ये तसेच क्षेत्रीय भागात कोविड तपासणी केंद्रे उघडण्यात आली आहेत. ज्या संस्था आणि प्रयोगशाळांकडे तपासणी करू शकतील, अशा तज्ज्ञ लोकांची उपलब्धता आहे, अशा सर्व संस्थांचा उपयोग करण्यात येत आहे.
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने (डीएसटी) भविष्यात होणाऱ्या संसर्गावर देखरेख ठेवण्यासाठी तसेच आरोग्य यंत्रणेची तयारी आणि इतर उपाययोजनांबाबत निर्णय घेण्यासाठी मदत म्हणून कोविड -19 इंडियन नॅशनल सुपर मॉडेल काम सुरु केले.सरकार संसर्ग क्षमता आणि जीवितहानीवर बारीक लक्ष ठेवून आहे, परंतु रोगावरील देखरेख वाढवण्यासाठी तसेच प्रसाराचा अंदाज वर्तवण्यासाठी एक मजबूत पूर्वसूचना प्रणाली आणणे अत्यावश्यक आहे. कोविड -19 संबंधी अंदाज आणि देखरेखीसाठी  असंख्य गणितीय मॉडेलची डीएसटी-एसईआरबी (विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळ) आणि अन्य संस्थांद्वारे प्रायोजित विश्लेषकांकडून चाचपणी केली जात आहे.
  • कोविड-19 महामारीचा प्रकोप शमविण्यासाठी लस, निदान व उपचार या तीनही पातळ्यांवर संशोधन आणि प्रगतीच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. कोविड-19 बाधितांचे नमुने हे संशोधनासाठी मोलाचे आहेत. कोविड-19 बाधितांकडून मिळालेले जैव नमुने आणि माहिती ही संशोधनात्मक कामासाठी पुरविण्याबाबत दिशादर्शक नियमावली, निती आयोगाने नुकतीच जाहीर केली. कॅबिनेट सचिवांच्या सुचनेप्रमाणे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) कोविड-19 बाधितांचे वैद्यकिय परिक्षण नमुने (घसा तसेच नासिका स्राव नमुने/फुफ्फुसातील स्राव/थुंकी, रक्त, लघवी व मल) जमा करणे, साठवणे व देखरेख करणे, यासाठी 16 जैवकोश/'बायोरिपॉझिटरी'ना परवानगी दिली आहे.
  • अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या तक्रार कक्षाकडे प्राप्त 585 समस्यांपैकी 581 तक्रारींचे  निवारण कोविड-19  लॉकडाउन काळात  करण्यात आले. हे कृतीदल या तक्रारी संबंधित राज्य सरकार, अर्थमंत्रालय, गृहमंत्रालय अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे मांडत आहे. उद्योगक्षेत्रातील आघाडीच्या सहयोगी कंपन्यांकडे आणि अन्न प्रक्रिया करणाऱ्या राज्यभरातील उद्योगांना अन्न प्रक्रियेत आणि संबंधित व्यवसायात उत्तम दर्जा आणि अधिकाधिक क्षमतेचे उत्पादन देताना काही समस्या नाहीत ना, यासाठी हे कृतीदल  सातत्याने संपर्कात आहे.

महाराष्ट्र अपडेट्स

692 नवीन केसेस नंतर राज्यातील रुग्ण संख्या 62,228 झाली आहे. सक्रिय केसेसची संख्या 33,124 आहे. तर राज्यांमध्ये 2,098 मृत्यू नोंद झाले आहेत, यादरम्यान महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक ठिकाणी तंबाखू पदार्थांचे सेवन, धूम्रपान आणि थुंकणे यासाठी राज्यभरात बंदी घालण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

PIB FACT CHECK

***

 

RT/MC/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1627966) Visitor Counter : 276