गृह मंत्रालय
'अम्फान' चक्रीवादळानंतरच्या व्यवस्थापनासाठी पश्चिम बंगालमध्ये एनडीआरएफच्या 10 अतिरिक्त तुकड्या तैनात
Posted On:
23 MAY 2020 7:03PM by PIB Mumbai
पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळानंतर निर्माण झालेल्या स्थितीला पूर्वपदावर आणण्यासाठी, पश्चिम बंगालच्या आपत्ती व्यवस्थापन आणि नागरी संरक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडून आलेल्या लेखी विनंतीला प्रतिसाद देत, NDRF म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या आणखी 10 तुकड्या या राज्यात पाठवण्यात येणार आहेत. या तुकड्या आज रात्री उशीरापर्यंत कोलकात्याला पोहचण्याची शक्यता आहे.
सध्या पश्चिम बंगालच्या चक्रीवादळ-प्रभावित जिल्ह्यात, NDRF ची 26 पथके पुनर्वसन कार्यात व्यस्त आहेत. आणखी 10 पथके तैनात केल्यानंतर राज्यातील एकूण पथकांची संख्या 36 होईल. अम्फानमुळे प्रभावित सहा जिल्ह्यात ही पथके काम करतील.
*****
B.Gokhale/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1626446)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam