रेल्वे मंत्रालय
भारतीय रेल्वे येत्या 10 दिवसांत आणखी 2600 श्रमिक विशेष गाड्या चालविणार
या निर्णयाचा फायदा अडकलेल्या सुमारे 36 लाख स्थलांतरितांना होणार
गेल्या 23 दिवसांत भारतीय रेल्वेने चालविल्या 2600 श्रमिक विशेष गाड्या
आत्तापर्यंत सुमारे 36 लाख अडकलेल्या स्थलांतरितांना त्यांच्या राज्यात सोडले
Posted On:
23 MAY 2020 6:48PM by PIB Mumbai
देश कोविड -19 महामारीविरोधात लढा देत असताना या महत्त्वपूर्ण काळात संकटग्रस्तांना दिलासा देण्यासाठी भारतीय रेल्वेने कोणतीही कसर सोडली नाही. परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात परत जाता यावे म्हणून रेल्वे मंत्रालयाने राज्य सरकारच्या गरजेनुसार पुढील दहा दिवसांत आणखी 2600 श्रमिक विशेष गाड्या चालविण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा अडकलेल्या सुमारे 36 लाख स्थलांतरितांना होण्याची अपेक्षा आहे.
हे लक्षात घेतले पाहिजे कि लॉकडाऊनमुळे विविध ठिकाणी अडकलेल्या प्रवासी कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर व्यक्तींना सोडण्यासाठी भारतीय रेल्वेने 01 मे 2020 पासून श्रमिक विशेष गाड्या चालविण्यास सुरुवात केली. अशा अडकलेल्या लोकांना परत पाठविण्यासाठी प्रमाणित नियमावलीनुसार संबंधित दोन्ही राज्य सरकारच्या विनंतीनुसार या विशेष गाड्या त्या विशिष्ट स्थानकादरम्यान चालविल्या जात आहेत. या श्रमिक विशेष गाड्यांच्या समन्वय आणि सुरळीत परिचालनासाठी रेल्वे आणि राज्य सरकारांनी नोडल अधिकारी म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.
गेल्या 23 दिवसांत भारतीय रेल्वेने 2600 श्रमिक विशेष गाड्या चालविल्या आहेत.
आत्तापर्यंत सुमारे 36 लाख अडकलेल्या स्थलांतरितांना त्यांच्या राज्यात पोहचविले आहे.
हे लक्षात घेतले पाहिजे की श्रमिक विशेष गाड्यांव्यतिरिक्त रेल्वे मंत्रालयाने 12.05.2020 पासून विशेष गाड्यांच्या 15 जोड्या सुरू केल्या आहेत आणि 01 जून 2020 पासून 200 रेल्वे सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.
M.Jaitly/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1626444)
Visitor Counter : 374
Read this release in:
Telugu
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam