PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 19 MAY 2020 8:42PM by PIB Mumbai

 

(Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours, inputs from PIB Field Offices and Fact checks undertaken by PIB)

नवी दिल्ली-मुंबई, 19 मे 2020

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

गेल्या 24 तासांत कोविड-19 चे 2,350 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. यामुळे, आतापर्यंत कोरोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 39,174 इतकी झाली आहे. म्हणजेच, सध्या देशात रुग्ण बरे होण्याचा दर 38.73 टक्के इतका आहे. रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने सुधारतो आहे.

देशात सध्या कोविड-19 चे 58,802 सक्रीय रुग्ण असून या सर्वांवर उपचार सुरु आहेत. या एकूण रूग्णांपैकी सुमारे 2.9% रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत.

प्रती लाख लोकसंख्येच्या प्रमाणात भारतात मृत्यूसंख्या 0.2 इतकी आहे. तर जगभरातल्या लोकसंख्येचा विचार करता, प्रती लाख लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण 4.1 मृत्यू इतके आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अहवाल क्रमांक 119 मध्ये जारी केलेल्या आकडेवारीनुसार, प्रती लाख लोकसंख्येच्या तुलनेत, सर्वाधिक मृत्यू होणाऱ्या देशांची यादी खालीलप्रमाणे आहे.

देशभरात काल विक्रमी 1,08,233 नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत देशात एकूण 24,25,742 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

 

इतर अपडेट्स:

लॉकडाऊन 31.05.2020 पर्यंत वाढवण्यात आल्यामुळे निर्बंधांमध्ये व्यापक प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना पुन्हा एकदा बजावले आहे कि सुधारित मार्गदर्शक सूचनांअंतर्गत लॉकडाउन निर्बंध व्यापक प्रमाणात शिथिल केले असले तरी राज्ये / केंद्रशासित प्रदेश गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लागू निर्बंध सौम्य करू शकत नाहीत. परिस्थितीच्या वास्तविक विश्लेषणाच्या आधारे आवश्यकता भासल्यास ते अन्य काही उपक्रमांना मनाई करू शकतात किंवा निर्बंध घालू शकतात.

  • राज्यांना पाठवलेल्या निवेदनात केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयाने (एमएचए) नमूद केले आहे की कोविड -19 चा संसर्ग होण्याची आणि उदरनिर्वाहाचे नुकसान होण्याची भीती अडकलेल्या मजुरांना घरची वाट धरण्यामागचे मुख्य कारण आहे. स्थलांतरित कामगारांचा त्रास कमी करण्यासाठी, केंद्र सरकारच्या समन्वयाने सक्रियपणे राज्य सरकार द्वारा अनेक उपाययोजना हाती घेण्याबाबत या निवेदनात भर देण्यात आला आहे. कोणत्याही स्थलांतरित मजुराला आपल्या गंतव्यस्थानी जाण्यासाठी रस्ते किंवा रेल्वे रुळांवरून चालत प्रवास करावा लागणार नाही हे जिल्हा प्रशासनाने सुनिश्चित केले पाहिजे. आवश्यकतेनुसार रेल्वेगाड्या चालविण्यासाठी ते रेल्वे मंत्रालयाकडे विनंती करू शकतात.
  • केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन नवी दिल्ली येथे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून 73 व्या जागतिक आरोग्य परिषदेत सहभागी झाले. जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) महासंचालकांनी केलेल्या भाषणावर डॉ. हर्ष वर्धन यांनी भारताची दिलेली प्रतिक्रिया खालीलप्रमाणे:
    • “जागतिक आरोग्य परिषदेच्या अध्यक्ष महामहीम केवा बेन, डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस आणि मान्यवर,
    • सर्वप्रथम मी, कोविड-19 मुळे संपूर्ण जगभरात झालेल्या जीवित हानिबाद्द्ल तीव्र शोक व्यक्त करतो. जे लोकं आघाडीवर राहून ही लढाई लढत आहेत त्यांच्या प्रयत्नांबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो.
    • आम्ही, भारतामध्ये कोविड-19 च्या आव्हानाला राजकीय वचनबद्धतेच्या सर्वोच्च पातळीवर स्वीकारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैयक्तिकरित्या परिस्थितीवर लक्ष ठेवले आणि या प्राणघातक विषाणूचा प्रसार रोखण्यास कोणतीही कसर राहू नये म्हणून वेळेवर, सक्रीय आणि श्रेणीबद्ध प्रतिक्रिया सुनिश्चित केल्या.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तूंना, उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केल्यानंतर, त्याला प्रतिसाद देत, गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व निमलष्करी दलांच्या कॅन्टीन आणि दुकानांमध्ये केवळ स्वदेशी उत्पादनांची विक्री अनिवार्य केली आहे. विशेषतः कुटिरोद्योग तसेच खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रातील उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यावर त्यांनी भर दिला आहे. या निर्णयामुळे शेतकरी, बेरोजगार युवक आणि कुटिरोद्योग तसेच ग्रामोद्योग क्षेत्रातील अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. गृहमंत्रालयाने 15 मे रोजी यासंदर्भातला आदेश जारी करुन या निर्णयाची अंमलबजावणी 1 जून 2020 पासून केली जावी, असे सांगितले होते.
  • केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री हरदीप पुरी यांनी आज जाहीर केलेल्या कचरामुक्त शहरांच्या नव्या यादीमध्ये नवी मुंबईला फाईव्ह स्टार रेटिंग देण्यात आले आहे. सूरत, राजकोट, इंदूर, म्हैसूर आणि छत्तीसगडमधील अंबिकापूर यांनाही कचरामुक्त शहरांचे फाईव्ह स्टार रेटिंग मिळाले आहे. भारतातील स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये नवी मुंबईचा सातत्याने समावेश होत आहे. स्वच्छ सर्वेक्षणाच्या 2019 च्या आवृत्तीत नवी मुंबईचा 7 वा क्रमांक होता.
  • सीमावर्ती भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासंदर्भातील लेफ्टनंट जनरल डी बी शेकटकर (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञ समितीच्या तीन महत्वपूर्ण शिफारशी सरकारने स्वीकारल्या आहेत आणि त्यांची अंमलबजावणी केली आहे. या शिफारशी रस्ते बांधणीला गती प्रदान करण्यासंदर्भातल्या होत्या ज्यामुळे सीमावर्ती भागात सामाजिक आर्थिक विकास होत आहे.
  • राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या (एनडीडीबी) संपूर्ण मालकीची असलेली उपकंपनी मदर डेअरीने लॉकडाऊन दरम्यान विदर्भ आणि मराठवाडा विभागातील दुग्ध पुरवठा साखळी स्थिर ठेवण्यासाठी योगदान दिले आहे. नागपूर शहराच्या सिव्हिल लाइन्स भागात स्थित, मदर डेअरी शेतकर्‍यांना सर्वतोपरी सहकार्य करीत असून तिच्यामार्फत विदर्भ आणि मराठवाडा विभागात दररोज सरासरी 2.55 लाख लिटर दुधाची खरेदी केली जात आहे. शेतकरी आणि ग्राहकांशी संपर्क दृढ करण्यासाठी मदर डेअरी वचनबद्ध आहे. प्रदेशातील कोविड -19 च्या उद्रेकानंतर, दुग्धशाळेने एक दिवसदेखील खरेदीचे काम थांबवलेले नाही; उलट या संकटकाळातही या डेअरीचे दुध संकलन 16% नी वाढले आहे. नागपूर व जवळपासच्या शहरांत 90 हून अधिक दूध संकलन केंद्रे असणाऱ्या मदर डेअरीने ग्राहकांना सुरक्षित उपाययोजनांद्वारे नियमित पुरवठा सुनिश्चित केला आहे. नागपूर महानगरपालिकेने सिव्हिल लाइन्स येथील आमदार वसतिगृहात कोविड -19 लढवय्यांसाठी प्राधान्याने स्थापन केलेल्या सरकारी विलगीकरण क्षेत्रात किऑस्कस उभारण्यासाठी मदर डेअरीचे योगदान आहे.

 

महाराष्ट्र अपडेट्स

महाराष्ट्रात 2033 नवीन रुग्णांची नोंद झाली असून यामुळे एकूण रुग्णसंख्या 35,058 इतकी झाली आहे. ताज्या माहितीनुसार राज्यामध्ये 25,392 सक्रिय रुग्ण असून आतापर्यंत 8,437 रुग्ण बरे झाले आहेत. दारिद्र्य रेषेवरील केशरी शिधा पत्रिका धारकांना मे आणि जून महिन्यात प्रति व्यक्ती 5 किलो याप्रमाणे सवलतीच्या दरात अन्नधान्य देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. कोविड-19 च्या महामारीच्या सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यात 54,422 रेशन दुकानांमधून अन्नधान्य वितरित करण्यास सुरुवात केली आहे.

 

PIB FACTCHECK

 

* * *

RT/ST/DR

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1625205) Visitor Counter : 221