आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 ची ताजी स्थिती

Posted On: 18 MAY 2020 7:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18  मे 2020

सद्यस्थिती :

कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालणे, प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी केंद्र सरकार सातत्याने  पूर्वदक्षता घेऊन सक्रीय दृष्टीकोनातून उपाययोजना करत आहे. या सर्व उपाययोजना आणि व्यवस्थापनावर सर्वोच्च पातळीवर नियमित देखरेख ठेवली जात आहे.

देशात सध्या कोविड-19 चे 56,316 रुग्ण आहेत.आतापर्यंत कोरोनाचे 36,824 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत एकूण 2,715 रुग्णांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे.  सध्या देशात रुग्ण बरे होण्याचा दर 38.29% इतका आहे.

देशातील प्रती लाख लोकसंख्येच्या तुलनेत, भारतातील रुग्णसंख्या सरासरी 7.1 इतकी आहे.  तर एकूण जागतिक लोकसंख्येच्या परिप्रेक्ष्यात, कोविड रुग्णसंख्या, प्रति लाख लोकसंख्येत 60 रुग्ण, एवढी आहे. जागतिक आरोग्य संघटनेने, आपल्या अहवाल क्रमांक 118 मध्येप्रती लाख लोकसंख्येच्या तुलनेत विविध देशांमध्ये असलेल्या रुग्णसंख्येचे प्रमाण जाहीर केले असून ते पुढीलप्रमाणे आहे-

देश

एकूण रुग्णसंख्या

प्रती 1 लाख लोकसंख्येच्या प्रमाणात रुग्ण

जग

45,25,497

60

अमेरिका

1,409,452

431

रशिया

281,752

195

इंग्लंड

240,165

361

स्पेन

230,698

494

इटली

224,760

372

ब्राझील

218,223

104

जर्मनी

174,355

210

तुर्कस्तान

148,067

180

फ्रान्स

140,008

209

इराण

118,392

145

भारत

96,169*

7.1

 

* - 18th May, 2020 पर्यंतची ताजी आकडेवारी

आतापर्यंत कोविड-19 विरोधात केलेल्या आक्रमक आणि त्वरित उपाययोजनांचे चांगले परिणाम बघायला मिळत आहेत.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या नव्या मार्गदर्शक सूचना

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 17 मे 2020 रोजी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना रेड/ऑरेंज/ग्रीन झोन च्या वर्गीकरणासंदर्भात नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व राज्यांना, त्यांच्या प्रत्यक्ष पाहणी आणि मूल्यमापनानुसार जिल्हा/ महानगरपालिका किंवा गरज असल्यास उपविभाग/वार्ड किंवा इतर कोणताही प्रशासकीय विभाग रेड/ऑरेंज/ग्रीन झोन म्हणून वर्गीकृत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निश्चित केलेल्या निकषांच्या आधारावर विविध बाजूंचा प्रत्यक्ष मूल्यमापन अहवाल मंत्रालयाला मिळाला असून त्या आधारावर हा निर्णय घेण्यात आला आहे.  हे निकष म्हणजे, एकूण सक्रीय रुग्णसंख्या, प्रती लाख लोकसंख्येमागे रुग्णांचे प्रमाण, रुग्ण दुप्पट होण्याचा दर( सात दिवसांपेक्षा अधिकच्या काळात मोजलेला दर) मृत्यूदर, चाचण्यांचे प्रमाण, चाचण्या पॉझिटिव्ह होण्याचा दर इत्यादी.

प्रत्यक्ष जागी जाऊन करायच्या कार्यवाहीबाबत, राज्यांना चिकाटीने प्रयत्न करत कन्टेनमेंट आणि बफर झोनची संख्या कमी करण्यास सांगण्यात आले आहे. या कन्टेनमेंट झोनमध्ये नियमांचे कठोर पालन केले जावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.  

कन्टेनमेंट झोन म्हणजेच प्रतिबंधित क्षेत्रात, विशेष पथकांनी घरोघरी जाऊन संशयित रुग्णांचा शोध घेणे, नमुन्याविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करत, सर्व रुग्णांच्या तपासण्या करणे, संपर्कात आलेल्यांचा शोध, वैद्यकीय व्यवस्थापन ही सगळी कामे प्राधान्याने करायची आहेत. या सर्व कामांमध्ये जनतेची मदतही घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

त्यापुढे, प्रत्येक कन्टेनमेंट झोनच्या सभोवताली एक बफर झोन तयार करायला हवा, जेणेकरून संसर्ग आजूबाजूच्या भागात पसरणार नाही. या बफर झोनमध्ये,संशयित रुग्णांचा शोध घेण्यासाठी तीव्र निरीक्षण मोहीम राबवायला हवी, तसेच, आरोग्य विभागात असलेल्या ILI/SARI रुग्णांकडे देखील लक्ष द्यायला हवे.   

तसेच, समाजात कोरोना प्रतिबंधक जनजागृती सुरूच ठेवावी, वैयक्तिक स्वच्छता, हात धुणे, श्वसनाविषयक सवयी, चेहरा झाकणे, मास्कचा वापर आणि शारीरिक अंतर पाळणे अशा सवयींचे पालन करण्याबाबत सातत्याने जागृती करत राहायचे आहे.

 

G.Chippalkatti/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1624951) Visitor Counter : 187