पंतप्रधान कार्यालय
‘अम्फान’ चक्रीवादळाचा सामना करण्याच्या तयारीचा पंतप्रधानांनी घेतला आढावा
परिस्थिती हाताळण्यासाठी एनडीआरएफच्या 25 तुकड्या तैनात
प्रविष्टि तिथि:
18 MAY 2020 7:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 मे 2020
बंगालच्या उपसागरात घोंघावत असलेल्या ‘अम्फान’ चक्रीवादळाचा सामना करण्याच्या उपाययोजनांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेण्यात आला.

पंतप्रधानांनी परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेतला आणि चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी सज्जता तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्याच्या तयारीचाही आढावा घेतला. चक्रीवादळाचा सामना करण्याच्या तयारीबाबत सादरीकरण करताना एनडीआरएफचे महासंचालक यांनी संगितले की, एनडीआरएफच्या 25 तुकड्या त्या ठिकाणी तैनात करण्यात आल्या असून 12 तुकड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. देशाच्या विविध भागात एनडीआरएफच्या अन्य 24 तुकड्या देखील सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधानांचे प्रधान सल्लागार पी के सिन्हा; कॅबिनेट सचिव राजीव गौबा आणि केंद्र सरकारचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1624935)
आगंतुक पटल : 209
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Urdu
,
Punjabi
,
Assamese
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Tamil
,
English
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Gujarati
,
Malayalam