PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 18 MAY 2020 7:45PM by PIB Mumbai

Delhi-Mumbai, May 18, 2020

(Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours, inputs from PIB Field Offices and Fact checks undertaken by PIB)

कोरोनाच्या काळात नव्या जीवनशैलीचा स्वीकार करत कोरोना महामारीने आपल्याला दिलेल्या धड्यातून बोध घेतला पाहिजे असे सांगून उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी 12 सूत्री आराखडाही सुचवला आहे. अपेक्षेपेक्षा जास्त काळ हा विषाणू राहण्याची शक्यता असल्यामुळे जीवन आणि मानवतेप्रती  नव्या दृष्टीकोन बाळगण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती

कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालणे, प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी केंद्र सरकार सातत्याने  पूर्वदक्षता घेऊन सक्रीय दृष्टीकोनातून उपाययोजना करत आहे. या सर्व उपाययोजना आणि व्यवस्थापनावर सर्वोच्च पातळीवर नियमित देखरेख ठेवली जात आहे.

देशात सध्या कोविड-19 चे 56,316 रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोनाचे 36,824 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत एकूण 2,715 रुग्णांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे.  सध्या देशात रुग्ण बरे होण्याचा दर 38.29% इतका आहे.

देशातील प्रती लाख लोकसंख्येच्या तुलनेत, भारतातील रुग्णसंख्या सरासरी 7.1 इतकी आहे.  तर एकूण जागतिक लोकसंख्येच्या परिप्रेक्ष्यात, कोविड रुग्णसंख्या, प्रति लाख लोकसंख्येत 60 रुग्ण, एवढी आहे.

इतर अपडेट्स:

  • 24 मार्च पासून सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या उपाययोजनांमुळे कोविड-19 च्या प्रसाराला आला घालण्यात मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे. त्यामुळे 31 मे 2020 पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने (एमएचए) आपत्ती व्यवस्थापन (डीएम) कायदा 2005 अन्वये यासंदर्भात एक आदेश जारी केला आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वांची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत :
  • केंद्रीय मनुष्यबळ मंत्री रमेश पोखरियाल निशंकयांनी आज नवी दिल्लीत सीबीएसई म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी परीक्षांच्या उर्वरित पेपर्सच्या तारखा जाहीर केल्या. त्यानुसार, दिल्लीतील केवळ ईशान्य दिल्ली भागातील दहावीच्या मुलांच्या परीक्षा घेतल्या जातील. तर बारावीच्या मात्र, संपूर्ण देशभरातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जातील. 5 जुलै पासून सुरू होणाऱ्या या सर्व परीक्षा सकाळी 10:30 ते 1:30 या वेळेत घेतल्या जातील.
  • आत्मनिर्भर भारत  किंवा स्वयंपूर्ण भारत यासाठी दिलेली हाक, त्यापाठोपाठ पाच दिवस उचललेल्या ऐतिहासिक पावलांची शृंखला  भारताच्या इतिहासातला  महत्वाचा टप्पा म्हणून  स्मरणात ठेवली जाईल,असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. केंद्रीय वित्तमंत्र्यांनी पाच भागामधे  जाहीर केलेल्या  प्रोत्साहनपर पॅकेजवर ते  प्रतिक्रिया देत होते. संकट हे देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाची एकापेक्षा अनेक पद्धतीने परीक्षा घेत असते. या परीक्षेत भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  लवकर आणि निर्णायक कृती करत एक उदाहरणच घालून दिले असे ते म्हणाले.
  • शिक्षण क्षेत्राला प्राधान्य दिल्याबद्दल केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री  रमेश पोखरियाल निशंकयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे  आभार मानले आहेत. या उपक्रमांबद्दल त्यांनी  केंद्रीय अर्थमंत्र्यांचे देखील आभार मानले आणि आशा व्यक्त केली की यामुळे शिक्षण व्यवस्थेत परिवर्तन घडून येईल आणि देशातील विद्यार्थ्यांचा समग्र विकास घडवून आणतील.
  • केंद्र सरकारनं एमएसएमई, कामगार, कृषी यांच्यासह विविध क्षेत्रांसाठी जाहीर केलेल्या आर्थिक मदतीच्या पॅकेजमुळे आणि एमएसएमईची नवीन व्याख्या केल्यामुळे उद्योग व्यवसायांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल, असं मत केंद्रीय एमएसएमई आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. एमएसएमईच्या मानांकनाचे अन्वेषण आणि फंड ऑफ फंडच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सहभागीतांनी आपल्या शिफारसी आणि सल्ले द्यावेत, असं आवाहन गडकरी यांनी  केलं.
  • केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज  सांगितले की कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या  20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेज बरोबरच अन्य गोष्टींमुळे वैद्यकीय आयसोटोप्सचा वापर करून कर्करोगाच्या परवडणाऱ्या उपचारांना प्रोत्साहन मिळेल. तसेच अणुऊर्जा विभागाच्या (डीएई) अखत्यारीत पीपीपी (सार्वजनिक-खाजगी-सहभाग) द्वारे  एक विशेष अणुभट्टी स्थापन  करता येईल. आर्थिक पॅकेज नावीन्यपूर्ण, भविष्यवादी आणि धाडसी आहे असे ते म्हणाले.
  • कोविड-19 पासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी पीपीई परिधान करणे अतिशय महत्वाचे ठरते.पीपीई मुळे विषाणूशी संपर्क होण्याचा धोका कमी होतो. मात्र अनेक थर असलेला पीपीई सूट किंवा पोशाख परिधान करून कोविड-19 च्या रुग्णावर उपचार करणे आणि उष्ण आणि दमट हवामानात 6,8 किंवा 12 तास काम करताना या व्यावसायिकांना होणाऱ्या त्रासाची कल्पना करणेही अशक्य आहे.

महाराष्ट्र अपडेट्स

एका दिवसातील विक्रमी 2,347 केसेससह महाराष्ट्रातील रुग्णसंख्या 33,053 झाली आहे. राज्यामध्ये 24,161 सक्रिय केसेस असून 7,688 रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईमध्ये बस सेवा देणाऱ्या बेस्टच्या कर्मचारी कृती समितीने चालकांसाठी असलेल्या कमी सुविधांचा दाखला देत आंदोलन सुरू केले आहे.  याबाबतीत बेस्ट प्रशासनाने असा दावा केला आहे की या आंदोलनाचा राज्यातील परिवहनावर काही परिणाम होणार नाही कारण राज्य परिवहन मंडळाच्या बसेस सेवा देत आहेत. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती आज सुरू झाली कोविड-19 मधील वाढत्या केसेसमुळे ती बंद करण्यात आली होती.

 

***

 

RT/MC/SP/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1624934) Visitor Counter : 250