रेल्वे मंत्रालय
नवी दिल्ली येथून भारतीय रेल्वेच्या 3 विशेष गाड्या आज पुन्हा रुळावर धावणार
दिल्ली आणि बिलासपूर विशेष रेल्वेसाठी 1177 प्रवाशांचे आरक्षण, नवी दिल्ली दिब्रूगड विशेष ट्रेनमध्ये 1122 प्रवाशांची नोंद, तर, नवी दिल्ली – बंगळुरू विशेष ट्रेनसाठी एकूण 1162 प्रवाशांची नोंद
एकूण 3461 प्रवाशांनी नवी दिल्लीतून प्रस्थान केले
नवी दिल्ली ते बिलासपूर ट्रेन क्रमांक 02442 या विशेष रेल्वेगाडीचा आपल्या पहिल्या प्रवासाला आज प्रारंभ
Posted On:
12 MAY 2020 6:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 मे 2020
कोविड-19 मुळे स्थगित केलेल्या प्रवासी रेल्वे गाड्या नवी दिल्ली रेल्वे स्थानकातून पुन्हा सोडण्यात येत असून त्याअंतर्गतच रेल्वे क्रमांक 02442 या नवी दिल्ली ते बिलासपूर विशेष रेल्वेचा विशेष रेल्वे म्हणून पहिला प्रवास आज 12 मे 2020 रोजी सुरू होत आहे. प्रवासी रेल्वेगाड्या सोडतानाच भारतीय रेल्वेने प्रवासी गाड्या वर्गीकृत पद्धतीने पूर्ववत सोडण्यास प्रारंभ केला आहे. एकूण 03 विशेष रेल्वे गाड्या नवी दिल्ली येथून आज सुटणार आहेत तर एकूण 05 रेल्वे गाड्या अन्य शहरांमधून नवी दिल्लीच्या दिशेने सोडण्यात येणार आहेत. या विशेष रेल्वे सेवा भारतीय रेल्वेने चालविलेल्या श्रमिक विशेष रेल्वे व्यतिरिक्त असतील. रेल्वेबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे –
अनुक्रमांक
|
गाडी क्रमांक
|
प्रस्थान
|
गन्तव्य
|
1
|
02692
|
नवी दिल्ली
|
बंगळुरू
|
2
|
02424
|
नवी दिल्ली
|
दिब्रूगड
|
3
|
02442
|
नवी दिल्ली
|
बिलासपूर
|
नवी दिल्ली ते बिलासपूर विशेष रेल्वेने प्रवास करणाऱ्या 1177 प्रवाशांचे एकूण 741 पीएनआर तयार झाले आहेत, नवी दिल्ली दिब्रूगड विशेष रेल्वेने प्रवास करणाऱ्या 1122 प्रवाशांचे 442 पीएनआर तयार झाले आहेत आणि नवी दिल्ली – बंगळुरू रेल्वेने प्रवास करणाऱ्या 1162 प्रवाशांचे 804 पीएनआर तयार आहेत.
आज एकूण 08 रेल्वेगाड्या नवी दिल्लीसह विविध शहरांमधून प्रस्थान करीत आहेत. या रेल्वेगाड्यांची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे –
अनुक्रमांक
|
गाडी क्रमांक
|
प्रस्थान
|
गन्तव्य
|
1
|
02301
|
हावडा
|
नवी दिल्ली
|
2
|
02951
|
मुंबई सेंट्रल
|
नवी दिल्ली
|
3
|
02957
|
अहमदाबाद
|
नवी दिल्ली
|
4
|
02309
|
राजेंद्रनगर (टी)
|
नवी दिल्ली
|
5
|
02691
|
बंगळुरू
|
नवी दिल्ली
|
6
|
02692
|
नवी दिल्ली
|
बंगळुरू
|
7
|
02424
|
नवी दिल्ली
|
दिब्रूगड
|
8
|
02442
|
नवी दिल्ली
|
बिलासपूर
|
S.Thakur/S.Shaikh/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1623326)
Visitor Counter : 262
Read this release in:
Punjabi
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada