आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 विषयक ताजी स्थिती


आतापर्यंत 20,917 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त; रुग्ण बरे होण्याचा दर 31.15% पर्यंत वाढला

Posted On: 11 MAY 2020 9:23PM by PIB Mumbai

 

आतापर्यंत कोविड-19 चे 20,917 रुग्ण उपचारानंतर पूर्ण बरे झाले आहेत. यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर 31.15 टक्क्यांपर्यत वाढला आहे. देशभरातल्या कोविड-19 च्या रुग्णांची संख्या आता 67,152 इतकी झाली आहे. कालपासून, कोरोनाचे 4,213 नवे रुग्ण आढळले आहेत.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी विविध वैद्यकीय व्यावसायिकांच्या कामांचे कौतुक केले. कोविड-19 चा सामना करतांना त्यांनी दाखवलेल्या चिकाटीबद्दल, विशेषतः गेले तीन महिने सातत्याने करत असलेल्या सेवेबद्ल आपल्याला त्यांचा अभिमान वाटतो, असे डॉ हर्षवर्धन म्हणाले. डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना वाळीत टाकले जाऊ नये किंवा त्यांना लक्ष्य करू नये असे कळकळीचे आवाहान त्यांनी आज पुन्हा देशाला केले. किंबहुना, ते करत असलेल्या जनसेवेबद्दल सगळ्यांनी त्यांचे कौतुक आणि अभिनंदन करायला हवे, असे ते म्हणाले. डॉक्टर्स,परिचारिका,आरोग्य कर्मचारी या सगळ्यांना कोविड-19 शी लढा देत असतांना, आपल्याकडून रास्त सन्मान, पाठींबा आणि सहकार्य मिळायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोविड-19 विषयक जिल्हास्तरीय सुविधा आधारित निरीक्षणासाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचना, खालील संकेतस्थळावर बघता येतील--

: https://www.mohfw.gov.in/pdf/DistrictlevelFacilitybasedsurveillanceforCOVID19.pdf

कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/.

तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in .

कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf

*****

G.Chippalkatti/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1623125) Visitor Counter : 159