गृह मंत्रालय

कोविड आणि बिगर-कोविड वैद्यकीय आप्तकालीन पूर्ततेसाठी वैद्यकीय व्यावसायिक आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांची सुरळीत वाहतूक, सर्व खाजगी दवाखाने, शुश्रुषा केंद्र आणि प्रयोगशाळा  सुरु राहतील, याची दक्षता  घ्यावी-गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश

Posted On: 11 MAY 2020 2:55PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 11 मे 2020

 

कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली 10 मे 2020 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून झालेल्या बैठकीत काही राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी वैद्यकीय व्यावसायिक आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीवर लावलेल्या निर्बंधांबाबतचा मुद्दा प्राधान्याने चर्चिला गेला.

याच बैठकीचा पाठपुरवा करत, केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राजे/केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवले असून सर्व वैद्यकीय व्यावसायिक आणि सार्वजनिक आरोग्य सुविधांशी संबंधित लोकांची वाहतूक सध्या मानवाचा जीव वाचवण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. त्यांचा प्रवास आणि वाहतूक काहीही अडथळे न येता होऊ द्यावी, असे त्यात लिहिले आहे. वैद्यकीय व्यावसायिकांच्या वाहतुकीत अडथळे आणल्यास, कोवीड आणि बिगर कोविड अशा दोन्ही प्रकारच्या वैद्यकीय सेवा बाधित होऊ शकतात, असेही गृहमंत्रालयाने म्हंटले आहे.

याच दृष्टीने, सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील सरकारांनी या वैद्यकीय कर्मचाऱ्यांची, परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचारी,सफाई कामगार आणि रुग्णवाहिका अशा सर्वांची वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी घ्यावी, असे त्यांनी या पत्रात म्हंटले आहे. यामुळे, कोविड आणि बिगर कोविड वैद्यकीय सेवा अव्याहतपणे सुरु राहतील, त्याशिवाय, या सर्व वैद्यकीय व्यावसायिकांची आंतर-राज्यीय वाहतूक सुरळीत होईल, याची व्यवस्था देखील संबधित राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांनी करायची आहे, असेही गृहमंत्रालयाने म्हंटले आहे.

तसेच, सर्व खाजगी दवाखाने, शुश्रुषा केंद्र आणि प्रयोगशाळा देखील सुरु ठेवल्या पाहिजेत, यावरही या पत्रात भर देण्यात आला आहे. या सर्व ठिकाणी जाण्याची परवानगी वैद्यकीय व्यावसायिकांना देण्यात आली आहे. यामुळे कोविड आणि बिगर कोविड अशा दोन्ही प्रकारच्या मोठ्या रुग्णालयांवरच रुग्णांचा भार न पडता, इतर ठिकाणी उपचार होऊ शकतील. -

वैद्यकीय व्यावसायिकांच्या संदर्भातला अधिकृत पत्रव्यवहार बघण्यासाठी येथे क्लिक करावे

 

M.Jaitly/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1622920) Visitor Counter : 280