PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 07 MAY 2020 8:35PM by PIB Mumbai

 

(Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours, inputs from PIB Field Offices and Fact checks undertaken by PIB)

दिल्‍ली-मुंबई, 7 मे 2020

आरोग्य मंत्री हर्ष वर्धन आणि आयुष राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी आज नवी दिल्ली येथे संयुक्तपणे आयुर्वेद हस्तक्षेपावरील क्लिनिकल संशोधन अभ्यासक्रम सुरु केला, कोविड-19 आणि आयुष संजीवनी अॅप्लिकेशन ची प्रमाणित काळजी घेण्यासाठी हे हस्तक्षेप पूरक आहेत. आयुष मंत्री गोव्याहून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

कोविंड 19 व्यवस्थापनाच्या उत्तर प्रदेश ओडिशा आणि पश्चिम बंगाल मधील तयारी आणि प्रतिबंधक उपायांचा केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन यांनी आज उच्चस्तरीय बैठक घेतली.  यामध्ये उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री जय प्रताप सिंग, ओडिशाचे आरोग्य मंत्री नबकिशोर दास तसेच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे आणि राज्य तसेच केंद्राचे इतर वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत तीनही राज्यांमधील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.

सुरूवातीला हर्षवर्धन यांनी देशात कोविड-19 महामारीशी  सर्वतोपरी लढत असणाऱ्या सर्व राज्यांचे कौतुक केले.  त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 7 मे 2020 ला  देशात 52,952 रुग्णसंख्या  नोंदवली गेली. त्यापैकी 15,266 रुग्ण बरे झाले तर 1,783 आजाराला बळी पडले. गेल्या चोवीस तासात 3,561 नवीन निदान झालेल्या रुग्णांची भर पडली तर 1,084 रुग्ण रोगमुक्त झाले.  इतर देशांच्या तुलनेत भारताची परिस्थिती चांगली असून मृत्यूदर 3.3% तर रोगमुक्तीचा दर 28.83% आहे असे त्यांनी नमूद केले.  देशातील एकूण रुग्णांपैकी 4.8%. रुग्ण आयसीयूमध्ये,  1.1% रुग्ण व्हेंटिलेटरवर, तर 3.3% रुग्ण ऑक्सिजन आधारावर आहेत असे त्यांनी सांगितले.  ते पुढे म्हणाले की देशात रोग परीक्षण क्षमता वाढवली असून 327 सरकारी परिक्षण केंद्रे आणि 118 खाजगी परिक्षण केंद्रांमध्ये दर दिवशी   95000 परीक्षणे होत आहेत.  सर्व धरून आत्तापर्यंत कोविड-19 साठी 13,57,442 परीक्षणे करण्यात आलेली आहेत.

गेल्या सात दिवसात एकही नवीन रुग्ण नाहीत असे 180 जिल्हे आहेत तर 180 जिल्ह्यात गेल्या 7-13 दिवसात एकही नवीन रुग्ण नाही. 164 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 ते 20 दिवसात नवीन केस नाही तर 21 ते 28 दिवसांमध्ये 136 जिल्ह्यांमध्ये एकही नवीन रुग्ण नाही असे त्यांनी स्पष्ट केले.  13 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यामध्ये गेल्या 24 तासात एकही रुग्ण आढळला नाही अंदमान आणि निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश, छत्तिसगढ, गोवा, झारखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश, केरळ, लडाख, मणिपूर, मेघालय, मिझोराम आणि ओदिशा हे ते 13 प्रदेश.  दीव -दमण, सिक्किम, नागालँड आणि  लक्षद्वीप इथे आत्तापर्यंत एकही केस सापडली नसल्याचं हर्षवर्धन यांनी सांगितले. देशात 130  जिल्हे हॉटस्पॉट असून 284 हॉटस्पॉट नसलेले जिल्हे तर 319 अप्रभावीत जिल्हे असल्याचं त्यांनी नमूद केले.  नवीन 821 समर्पित रुग्णालयात 1,50,059 खाटा (विलगीकरण कक्ष 1,32,219 आणि आयसीयू खाटा 17,840) 1,898 कोविड समर्पित आरोग्य केंद्रे 1,19,109 खाटा (विलगीकरण कक्ष 1,09,286 आणि आयसीयू खाटा 9,823) या तयारीनिशी  आता देशात उपलब्ध असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.

 राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय संस्थांमध्ये मिळून  29.06लाख   पीपीई आणि 62.77 लाख N95  मास्कचे वितरण  करण्यात आल्याची माहिती  केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी दिली.

हर्षवर्धन यांनी सांगितले की राज्यांनी जास्त परिणामकारक सर्वेक्षण,  रुग्णांचा कुठे संबंध आला याचा माग आणि आरंभीच्या पातळीवर रोगनिदान या बाबींवर  लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे.  यामुळे मृत्यूदर कमी व्हायला मदत होईल. कोविड-19 रुग्ण नसलेल्या जिल्ह्यांमध्ये  तसेच गेल्या 14 दिवसांपासून ज्या जिल्ह्यात कोविड केसेस मिळालेल्या नाहीत अशा जिल्ह्यांमध्ये IDSP नेटवर्क  आणि वैद्यकीय महाविद्यालयांची रुग्णालये यांच्या सहकार्याने    श्वसनसंस्थेशी संबंधित गंभीर आजार (SARI), / फ्ल्यू सारखे आजार (ILI)  या आजारांच्या रुग्णांचे सर्वेक्षण होणे आवश्यक आहे.  त्यामुळे एखाद्या न सापडलेल्या रुग्णाची सुरुवातीच्याच पातळीवर खात्री होऊन वेळच्यावेळी काळजी घेता येईल असेही त्यांनी नमूद केले.

 संसर्ग पसरणार नाही याची खबरदारी, आरोग्य यंत्रणा व्यवस्थापनात पूर्व तयारी आणि प्रतिबंध हयायोगे आरोग्य सेवकांमध्ये संसर्ग पसरण्याचे प्रमाण कमी ठेवण्याची काळजी राज्यांनी घेतली पाहिजे यावर हर्षवर्धन यांनी भर दिला.  केंद्राची नियमावली आणि सूचना यांचा अवलंब तळागाळापर्यंत राज्याने प्रामाणिकपणे राबवला पाहिजे.

येत्या काही दिवसात स्थलांतरित मजूर राज्यात येण्याचं प्रमाण वाढेल यावर बोलताना हर्षवर्धन यांनी ठराविक धोरण आखून बाधित रुग्णांवर उपचार करण्याची सूचना केली. परिणामकारक धोरणात परिक्षण, संस्थात्मक अलगीकरण आणि उपचार यांचाही आवश्यकता भासल्यास समावेश करावा लागेल.

लसीकरण क्षयरोग तपासणी आणि उपचार डायलिसिस वरील रुग्णांना रक्त संक्रमणाची सुविधा पुरवणे, कर्करोगाच्या रुग्णांवरील उपचार, गरोदर स्त्रियांवरील उपचार अशासारख्या अनेक संबंधित नसलेल्या परंतु अत्यावश्यक आरोग्यसेवांमध्ये शिथिलता  येणार नाही याची  राज्यांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे यावरही त्यांनी भर दिला आयुष्मान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्रे ही रक्तदाब, मधुमेह आणि तीन प्रकारच्या कर्करोगांच्या चाचणीला वापरली जाऊ शकतात.  लॉकडाऊनच्या काळात टेली-कौन्सेलिंग आणि टेलीमेडिसीन यासारख्या सुविधा मोठ्या लोकसंख्येपर्यंत आरोग्य यंत्रणा पोचायला मदत करतात असे त्यांनी लक्षात आणून दिले.

 

इतर अपडेट्स :

  • कोविड-19 महामारीचा स्वयंचलित वाहन उद्योगावर काय परिणाम होवू शकतो, यासंदर्भात ‘एसआयएएम’ संस्थेच्या सदस्यांबरोबर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग तसेच एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेवून संवाद साधला. आगामी दोन वर्षांमध्ये देशभरात 15 लाख कोटी रुपयांचे रस्त्यांच्या बांधणीसाठी खर्च करण्याचे लक्ष्य आपल्या सरकारने निश्चित केले आहे. आपल्या मंत्रालयाच्यावतीने सर्व लवादाची प्रकरणे निकालात काढण्यासाठी जास्त काम केले जात  असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं.
  • केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज नवी दिल्लीत ‘आयुष संजीवनी’ या अॅपचे आणि कोविड-19 परिस्थितीशी संबंधित आयुष आधारित दोन अभ्यासांचा प्रारंभ केला. आयुष राज्य मंत्री श्रीपाद नाईक गोव्याहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले.
  • केंद्रीय एमएसएमई आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज फ्रॅग्रन्स अँड फ्लेवर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या सदस्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या चर्चेदरम्यान सदस्यांनी कोविड-19 साथीमुळे एमएसएमई समोर असलेल्या विविध आव्हानांबाबत काही सूचना केल्या तसेच  चिंता व्यक्त केली आणि या क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारकडून सहकार्याची विनंती केली.
  • कोविड-19 महामारीच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत सरकारने लागू केलेला लॉकडाऊन 17 मे, 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यावर लाखो प्रवासी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पर्याय निवडतील अशी अपेक्षा असताना आता हा प्रसार कसा नियंत्रित करायचा हे सरकार समोर आव्हान आहे.या पार्श्वभूमीवर, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या अंतर्गत ‘सेंटर फॉर रोड रिसर्च इन्स्टिट्यूट’ (सीआरआरआय) ही प्रयोगशाळा सुरक्षित सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी एक कृती आराखडा घेऊन आली आहे
  • रेल्वे मंत्रालयाने 5,231 रेल्वे कोचांचे रुपांतर, कोविड केअर केंद्र म्हणून केले आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या  नियमावलीनुसार हे कोच फारश्या गंभीर नसलेल्या रुग्णांसाठी वापरता येतील. ज्या राज्यांमध्ये आरोग्यसुविधा अपुऱ्या पडू लागतील आणि संशयीत तसेच निश्चित रोगनिदान झालेल्या रुग्णांसाठी विलगीकरण कक्षांची गरज भासेल तिथे हे कोच उपलब्ध करून दिले जातील.
  • संपूर्ण जगात पसरलेल्या कोविड-19 विषाणू महामारीमुळे लागू कराव्या लागलेल्या लॉक डाऊन अर्थात संपूर्ण बंदीचे देशातील मत्स्य उत्पादन आणि मत्स्यसंवर्धन क्षेत्रावर विविध प्रकारचे दुष्परिणाम झालेले दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत मत्स्य आणि कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आयसीएआर अर्थात भारतीय कृषी संशोधन परिषद, डीएआरई अर्थात कृषी संशोधन आणि शिक्षण विभाग आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय यांनी त्यांच्या विविध संशोधन संस्थांच्या माध्यमातून विविध उप क्षेत्रातील सर्व संबंधितांच्या जागृतीसाठी अनेक नाविन्यपूर्ण पावले उचलली आहेत.

महाराष्ट्र अपडेट्स

विक्रमी 1,233 नव्या कोविड-19  केसेस सहित महाराष्ट्रातील रुग्ण संख्या 16,758 झाली आहे. 34 मृत्यूंसह एकूण मृत्यू संख्या 651 झाली आहे. आता केवळ मुंबईतच 10,500 केसेस आहेत. त्याचबरोबर मुंबई हे एकमेव शहर आहे ज्याने 1 लाखाहून अधिक चाचण्या केल्या आहेत. प्रत्येक दिवशी 6 सरकारी आणि 11 खाजगी प्रयोगशाळांमध्ये 4,500 चाचण्या केल्या जात आहेत. परंतु चाचण्या पॉझिटिव येण्याच्या दरात एप्रिल च्या सुरुवातीच्या 3 टक्‍क्‍यांवरून 10 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली आहे, जे वाढत्या संसर्गाचे लक्षण आहे. महाराष्ट्र सरकारने मुंबईमधील खाजगी सेवा देणाऱ्या 25,000 डॉक्टरांना कोविड-19  चे उपचार देणाऱ्या रुग्णालयांमध्ये हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व डॉक्टरांना संरक्षक साधने दिली जातील आणि अत्यावश्यक सेवा दिल्याबद्दल मानधन दिले जाईल असे सरकारने नोटीसमध्ये म्हटले आहे. 55 पेक्षा जास्त वय असलेल्या डॉक्टरांना यातून सूट देण्यात आली आहे

***

RT/MC/SP/DR

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1621934) Visitor Counter : 218