पंतप्रधान कार्यालय
7 मे 2020 रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या जागतिक आभासी वेसक कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी
पंतप्रधान मोदी यांचे या समारंभात बीजभाषण
Posted On:
06 MAY 2020 10:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 मे 2020
बुद्ध पौर्णिमेनिमित्त उद्या, 7 मे 2020 रोजी होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत.
आंतरराष्ट्रीय बुद्धीस्ट महासंघ ही जागतिक बुद्धीस्ट संघटना आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं बुद्ध पौर्णिमेनिमित्त व्हर्च्युअल म्हणजेच आभासी स्वरुपात जागतिक प्रार्थनेचं आयोजन केलं आहे. जगभरातल्या बुद्धीस्ट संघांचे सर्वोच्च नेते या प्रार्थनेत सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमात सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी याचं बीजभाषण होणार आहे.
कोविड-19 संसर्गजन्य आजाराच्या जगभरावरील प्रभावाच्या पार्श्वभूमीवर बुद्ध पौर्णिमेनिमित्त वेसक दिनी आयोजित ही प्रार्थना आभासी स्वरूपात होणार आहे.
कोविड19 आजाराला बळी पडलेले नागरिक तसेच या आजाराशी लढा देणाऱ्या योद्ध्यांच्या सन्मानार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या निमित्त लुंबिनीतील पवित्र जन्मस्थळ, नेपाळ, महाबोधी मंदिर, बोधगया – भारत, मूलगंधा, कुटीविहार, सारनाथ – भारत, परीनिर्वाण स्तूप, कुशीनगर – भारत, पिरीथ मंत्रोच्चार, रुवानवेली महासेवा, अनुराधापूर स्तूप परिसर, श्रीलंका, बौद्धनाथ, स्वयंभू, नमो स्तूप – नेपाळ या प्रमुख जागांसह इतर सर्व बौध्द प्रार्थनास्थळांवरून या सामूहिक प्रार्थनांचं थेट प्रसारण केलं जाणार आहे.
केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री प्रल्हाद सिंग पटेल आणि क्रीडा मंत्री किरेन रीजीजू देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
वेसक – बुद्ध पौर्णिमा हा दिवस तिहेरी वरदानाचा दिवस मानला जातो. म्हणजेच तथागत गौतम बुद्धांचा जन्म ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तीनही प्रसंगांचा दिवस.
* * *
B.Gokhale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1621734)
Visitor Counter : 210
Read this release in:
Punjabi
,
Malayalam
,
Assamese
,
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada