अर्थ मंत्रालय

PMGKP योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 39 कोटी गरजूंना 34,800 कोटी रुपयांची मदत

Posted On: 06 MAY 2020 3:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6  मे 2020

 

डिजिटल पेमेंटच्या सुविधांचा उपयोग करत, केंद्र सरकारने, प्रधानमंत्री गरीब कल्याण पैकेजअंतर्गत 5 मे 2020 पर्यंत सुमारे 39 कोटी गरजूंना 34,800 कोटी रुपयांची मदत केली आहे. कोविड-19 मुळे लागू झालेल्या देशव्यापी लॉकडाऊनच्या काळात, गरिबांना मदत व्हाही या हेतूने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 26 मार्च रोजी या पैकेजची घोषणा केली होती.

PMGK पैकेजचा भाग म्हणून सरकारने महिला, गरीब लोक, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांना अन्नधान्य आणि रोख रक्कम देण्याची घोषणा केली. या पैकेजच्या त्वरित अंमलबजावणीकडे केंद्र आणि राज्य सरकारचे सातत्याने लक्ष आहे. वित्त मंत्रालय, इतर संबधित मंत्रालये, कॅबिनेट सचिव आणि पंतप्रधान कार्यालय एकत्रितपणे , या पैकेजचे लाभ गरजू लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

 लाभार्थ्यांपर्यंत रोख मदत त्वरित पोचावी यासाठी फिनटेक आणि डिजिटल तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. थेट लाभ हस्तांतरण सुविधेमुळे, मदतीची पूर्ण रक्कम, कोणत्याही मध्यस्थ अथवा गळतीविना थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत आहे. त्यासाठी लाभार्थ्याना स्वतः बँकेत जाण्याची गरज नाही. 

 PMGKP अंतर्गत दिल्या जाणाऱ्या मदतीच्या प्रगतीचा आढावा पुढीलप्रमाणे.

  • पीएम-किसान योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या मदतीचा पहिला टप्पा म्हणून 8.19 कोटी लाभार्थ्यांच्या खात्यात 16,394 कोटी रुपये रक्कम वितरीत करण्यात आली आहे.  
  • जन-धन खाते असलेल्या महिलांना मदत म्हणून 20.05 कोटी (98.33%) महिलांच्या खात्यात 10,025कोटी रुपये रक्कम पहिल्या टप्प्यात जमा करण्यात आली आहे. PMJDY खातेधारक महिलांनी या खात्यातून रक्कम काढली असून सर्व खात्यांमधून 8.72 (44%)कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे. याच योजनेचा दुसरा टप्पा म्हणून 5 मे रोजी 5.57 कोटी महिलांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे.
  • ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि दिव्यांग व्यक्तींच्या खात्यात 1405 कोटी रुपये वितरीत करण्यात आले. हे लाभ सर्व म्हणजे  2.812 कोटी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले.
  • 2.20 बांधकाम मजुरांना  3492.57 कोटी रुपयांची आर्थिक मदत वितरीत करण्यात आली आहे.
  • आतापर्यंत 36 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी एप्रिल महिन्यासाठी  67.65 लाख मेट्रिक टन अन्नधान्याची  उचल घेतली आहे. 36 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी 30.16 लाख मेट्रिक टन धान्य   एप्रिल महिन्यात 60.33 लाभार्थ्याना वितरीत केले आहे. मे 2020 मध्ये  22 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी 12.39 कोटी लाभार्थ्यांना   6.19 लाख मेट्रिक टन अन्नधान्याचे वितरण केले आहे.
  • विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशात  2.42 लाख मेट्रिक टन डाळींचेही वाटप करण्यात आले आहे. एकूण 19.4 कोटी लाभार्थ्यापैकी 5.21  लाभार्थ्यांच्या घरात डाळींचे वाटप करण्यात आले आहे.
  • प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत, आतापर्यंत l 5.09 कोटी गैस सिलेंडर्सची नोंदणी करण्यात आली असून त्यापैकी  4.82 कोटी सिलेंडर्स वितरीतही करण्यात आले आहेत.
  • कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या 9.6 लाख सदस्यांनी EPFO खात्यातून बिगर-परतावा आगावू रक्कम काढली असून ती रक्कम EPFO च्या खात्यातून काढली असून ही रक्कम 2985 इतकी आहे.
  •  44.97 लाख कर्मचारयांचा खात्यात 24% EPF योगदानाचे 698 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.
  • मनरेगाच्या वाढीव मजुरीबाबतची अधिसूचना 1 एप्रिल 2020 रोजी जारी करण्यात आली होती. चालू आर्थिक वर्षात 5.97 कोटी लोकांसाठी पुरेल इतके काम सुरु करण्यात आले आहे.मजुरांची थकीत मजुरी देण्यासाठी राज्यांकडे पैसा यावा, यासाठी 21,032 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे.
  • सरकारी रुग्णालयातील आणि आरोग्य चिकित्सा केंद्रातील आरोग्य कर्मचारयांसाठी विमा योजना सुरु करण्यात आली. न्यू इंडिया अशूअरन्स कंपनीच्या या विमा योजनेमुळे  22.12 लाख आरोग्य कर्मचाऱ्याना विमासुरक्षा मिळाली आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज

05/05/2020 पर्यंतचे थेट लाभ हस्तांतरण

योजना

लाभार्थींची संख्या

रक्कम

जन-धन योजना महिला खातेधाराकांना मदत

1st हप्ता - 20.05 कोटी  (98.3%)

दुसरा हप्ता  - 5.57 कोटी

पहिला हप्ता  - 10025 कोटी

दुसरा हप्ता  – 2785 कोटी

NSAP यांना मदत (विधवा, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग)

2.82 कोटी (100%)

1405 कोटी

पीएम-किसाना योजनेअंतर्गत मदत

8.19 कोटी

16394 कोटी

बांधकाम मजुरांना मदत

2.20 कोटी

3493 कोटी

EPFO मध्ये 24%योगदान

 

.45 कोटी

698 कोटी

 

एकूण

39.28 कोटी

34800 कोटी

 

 

G.Chippalkatti/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1621335) Visitor Counter : 242