आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 संदर्भातील ताजी स्थिती


आतापर्यंत 12,726 रुग्ण कोरोनामुक्त

Posted On: 05 MAY 2020 5:44PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 5 मे 2020

 

कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालणे, प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने सातत्याने टप्प्याटप्प्याने आखणी करून, पूर्वदक्षता घेऊन सक्रीय उपाययोजना करत आहे. या सर्व उपाययोजना आणि व्यवस्थापनावर सर्वोच्च पातळीवर नियमित देखरेख ठेवली जात आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिगटाच्या चौदाव्या बैठकीत कोविड-19 चे प्रतिबंधन आणि व्यवस्थापनाविषयी सखोल चर्चा झाली. तसेच, केंद्र आणि राज्य सरकार या लढ्यात करत असलेल्या विविध उपाययोजनांवरही यावेळी चर्चा करण्यात आली. PPE सूट्स, मास्क, व्हेंटीलेटर्स, औषधे आणि इतर महत्वाच्या वस्तूंची मुबलकता आणि उपलब्धता किती आहे याचा आढावा मंत्रिगटाने यावेळी घेतला. तसेच आरोग्य सेतू अॅप ची कामगिरी, त्याचा प्रभाव आणि उपयुक्तता यावर मंत्रिगटासमोर सादरीकरण करण्यात आले.

बिगर कोविड उपचार विभाग आणि कोविड विभाग असलेली बिगर कोविड रुग्णालये इथे कार्यरत आरोग्य कर्मचारी आणि इतरांकडून PPE सूट्स चा सुयोग्य वापर करण्याबाबत आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने अतिरिक्त मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. 24 मार्च रोजी याच संदर्भात जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा हा पुढचा भाग असल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

रूग्णालयातील वेगवगेळ्या विभागांसाठी जसे की बाह्य रुग्ण विभाग, डॉक्टरांचे केबिन, भूल देण्यापूर्वीचा तपासणी कक्ष, अंतर्गत-रुग्ण विभाग/अतिदक्षता विभाग, प्रसूतीकक्ष, शस्त्रक्रिया विभाग इत्यादी ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची वैयक्तिक संरक्षक उपकरणे/परिधान (PPEs)करण्याची सूचना करण्यात आली आहे. या संदर्भातल्या सविस्तर मार्गदर्शक सूचना https://www.mohfw.gov.in/pdf/AdditionalguidelinesonrationaluseofPersonalProtectiveEquipmentsettingapproachforHealthfunctionariesworkinginnonCOVIDareas.pdf या लिंकवर उपलब्ध आहेत.

अत्यावश्यक नसलेल्या आरोग्य सेवांच्या पुरवठ्याबाबत आरोग्य मंत्रालयाने याआधीच म्हणजे 14 एप्रिल 2020 रोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. या सूचनांच्या अनुषंगाने,सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना याची खातरजमा करायची आहे की लसीकरण, बाल-माता आरोग्य सुविधा, गंभीर रुग्ण जसे की डायलिसिस, कर्करोग , मधुमेह, क्षयरोग यावरील उपचार आणि रक्तदान सुविधा सुरु राहतील. विविध क्षेत्रांमध्ये लॉकडाऊन मध्ये देण्यात आलेल्या शिथिलतेनुसार, सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही बिगर-कोविड रुग्णालयांमध्ये या सुविधा उपलब्ध केल्या जाव्यात.

कोविड-19 च्या संक्रमणातून 12,726, रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचा दर  27.41% इतका झाला आहे. देशभरात आतापर्यंत कोविड-19च्या रुग्णांची एकूण संख्या 46,433 इतकी झाली आहे.  गेल्या 24 तासात 3,900  नव्या रुग्णांची नोंद झाली. एकूण मृत्यूसंख्या 1568 इतकी असून, कालपासून 195  जणांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाच्या पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत तसेच मृतांच्याही संख्येत सर्वाधिक वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना प्रत्येक पॉझीटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचे ट्रेसिंग, सक्रीय रुग्णांचा शोध आणि वैद्यकीय व्यवस्थापन आणखी प्रभावीपणाने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/.

तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in .

कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे.https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .

*****

G.Chippalkatti/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1621303) Visitor Counter : 188