आदिवासी विकास मंत्रालय

कोविड-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वन-उपज गोळा करणारे आदिवासी आणि आदिवासी कारागीरांच्या उदरनिर्वाह आणि सुरक्षेसाठी सरकारने त्वरित उपाययोजना केल्या


ट्रायफेड देशभरातील आदिवासी कारागिरांकडून 23 कोटी रुपये किंमतीचा आदिवासी उत्पादनाचा साठा खरेदी करणार

Posted On: 04 MAY 2020 4:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 मे 2020


आदिवासी कारागिरांना होणाऱ्या अभूतपूर्व त्रासाच्या पार्श्वभूमीवर, वन-उपज गोळा करणारे आदिवासी आणि आदिवासी कारागीर यांना पाठबळ देण्यासाठी सरकार त्वरित विविध उपक्रम राबवीत आहे. आदिवासी व्यवहार मंत्रालयाने याआधीच ‘आदिवासी उत्पादनांच्या विकास आणि विपणनासाठी संस्थात्मक पाठबळ’ या योजनेंतर्गत किरकोळ वनोत्पादनाच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये वाढ केली आहे. आदिवासी व्यवहार मंत्रालया अंतर्गत कार्यरत ट्रायफेड सुमारे 10 लाख आदिवासी कारागीर कुटुंबियांसोबत जोडली गेली आहे. मागील 30 दिवसांपासून सुरु असलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे आदिवासी कारागिरांचे सर्व व्यावसायिक व्यवहार ठप्प झाले असून याचा परिणाम त्याच्या उदरनिर्वाहावर झाल्यामुळे त्यांना अनिश्चिततेला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्यकडे मोठ्याप्रमाणात साठा पडून आहे किंवा त्याची विक्री पण झालेली नाही. कारागीरांकडे उपलब्ध असलेल्या वस्तूंमध्ये वस्त्रे, भेटवस्तू आणि सजावटीच्या वस्तू, वन धन नैसर्गिक उत्पादने, धातू, दागिने, आदिवासी चित्रे, मातीची भांडी, वेत आणि बांबू अशा अनेक प्रकारच्या उत्पादनांचा समावेश आहे.

वरील बाबी लक्षात घेत आदिवासी जमातीला त्वरित पाठबळ पुरविण्यासाठी खालील गोष्टींचा विचार केला जात आहे:


a) विक्री न झालेल्या साठ्यांची खरेदी:

बहुतांश आदिवासी जमातीचा उदरनिर्वाह हा त्यांच्या आदिवासी उत्पादनाच्या विक्रीवर अवलंबून असतो आणि म्हणूनच त्यांना तात्काळ मदत करण्याची गरज आहे. आदिवासी कुटुंबांना दिलासा मिळावा यासाठी आदिवासी व्यवहार मंत्रालयाने सध्याच्या लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक प्रभावित झालेल्या आदिवासी कारागीरांकडून त्यांच्याकडे उपलब्ध असलेला साठा खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार, ट्रायफेड देशभरातील आदिवासी कारागिरांकडून अंदाजे 23 कोटी रुपये किंमतीचा आदिवासी उत्पादनाचा साठा खरेदी करणार आहे. 

याव्यतिरिक्त ट्रायफेड व्हिडीओ कॉन्फरन्स वेबिनारच्या माध्यमातून उद्योग महासंघ, प्रमुख कॉर्पोरेट आणो व्यवसाय संघटना यांच्यासोबत चर्चा करत आहे आणि त्यांना आदिवासी कारागीरांकडील उत्पादनांचा साठा खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे ज्याचा उपयोग खालील गोष्टींसाठी होऊ शकतो:

  • प्रत्यक्ष खरेदी आणि विक्री 
  • भेटवस्तूंची आवश्यकता 
  • फोल्डर, स्टेशनरी इत्यादी सारखे परिषद/परिसंवादासाठी लागणारे साहित्य 
  • चित्र, डोकरा इत्यादी सजावटीच्या वस्तूंसह कार्यालयांसाठी पुरवठा
  • फ्रॅंचाइझ मॉडेल शोधला जाऊ शकतो
  • मध, सूप, मसाले, तांदूळ, बाजरी, चहा आणि कॉफी यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या (वन धन नैसर्गिक) खरेदीसाठी मोठ्याप्रमाणात पुरवठा केला जाऊ शकतो आणि नियमित पुरवठ्यासाठी करार देखील केला जाऊ शकतो. 
  • सद्य परिस्थितीत काही आदिवासी कारागीरांनी डब्ल्यूएचओ, युनिसेफ, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून मास्क आणि सॅनिटायझर तयार केले आहे. 

 

(मणिपूर स्थित वन धन केंद्रांच्या चुराचंदपूरच्या वन धन उत्पादनांच्या मोबाइल वेंडिंग दुकानाचे उद्घाटन)

 

b) आदिवासी भारत कारागिरांना मासिक शिधेची तरतूद 

आदिवासी कारागिरांना थोडा दिलासा मिळावा यासाठी ट्रायफेडने आदिवासी कुटुंबाच्या घटकांचा समावेश करत त्यांच्या #iStandWithHumanity मोहिमेशी जोडण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग प्रतिष्ठान सोबत करार केला आहे. यामध्ये संपूर्ण भारतातील आदिवासी कुटुंबांना एक हजार रुपये किंमतीच्या शिध्याची पाकिटे (शारिरी अंतराच्या नियमांचे पालन करत) खरेदी आणि वितरीत करण्याच्या कामाचा समावेश आहे. शिध्याच्या प्रत्येक पाकिटात 5 किलो गव्हाचे पीठ, 2 किलो डाळ, 3 किलो तांदूळ, 500 मिली तेल, 100 ग्रॅम हळद, 100 ग्रॅम लाल तिखट, 100 ग्रॅम जिरे, 100 ग्रॅम मोहरी, 100 ग्रॅम भाजी मसाला, 2 साबण यांचा समावेश आहे. 

c) छोट्या कारागिरांना कार्यकारी भांडवलाची तरतूद 

आदिवासी कारागिरांना त्यांच्याकडील साठा गहन ठेऊन सुलभ कर्जासाठी अनुकूल अटींची पूर्तता करत आवर्ती निधी प्राप्त व्हावा यासाठी ट्रायफेड वित्तीय संस्थांसोबत चर्चा करत आहे. आदिवासी कारागीरांसाठी कार्यकारी भांडवल आणि कर्जाची तरतूद केल्यामुळे त्यांना हा अभूतपूर्व त्रास सहन करणे शक्य होईल.

d) आदिवासी भागात मास्क, साबण, हातमोजे आणि पीपीई कीटची तरतूद 

कोविड-19 च्या सध्याच्या परिस्थितीमुळे देशातील सर्वात असुरक्षित अशा आदिवासी कारागीर व जमातीसह गरीब आणि उपेक्षित समजाच्या उदरनिर्वाहाला मोठा फटका बसला आहे. देशातील अनेक प्रांतांमध्ये हा हंगाम वनोत्पादाने गोळा करणे आणि उत्पादन घेण्याचा आहे आणि या कामात अनेक आदिवासी एकत्र येतात आणि यामुळे त्याच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. आदिवासी कारागीर व जमातीच्या सुरक्षेसाठी ट्रायफेडचा आदिवासी लाभार्थ्यांना 1 दशलक्ष फेस मास्क, साबण आणि हातमोजे आणि 20,000 पीपीई किट देण्याचा मानस आहे.
 
वेबिनार आणि कोविड 19 सल्लेसूचना 

ट्रायफेडने युनिसेफच्या सहकार्याने 9 एप्रिल 2020 रोजी सर्व राज्य नोडल आणि अंमलबजावणी संस्था, मार्गदर्शक संस्था, वन धन केंद्रे आणि इतर हितधारक यांच्यासमवेत आदिवासी जमातींमध्ये शारीरिक अंतर राखण्यासंदर्भात आणि त्यांचे नेहमीचे व्यवहार पार पडताना आवश्यक स्वच्छता राखण्यासंदर्भात जनजागृती निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील वेबिनार आयोजित केले होते. 

यानंतर, सर्व राज्य नोडल विभाग आणि अंमलबजावणी संस्था यांच्या समन्वयाने ट्रायफेडने युनिसेफची प्रादेशिक युनिट्स आणि जिल्हा संस्था, वन धन केंद्रे, मार्गदर्शक संस्था यांचा सहभाग घेऊन 14 एप्रिल ते 17 एप्रिल 2020 या कालावधीत स्वतंत्रपणे राज्यस्तरीय वेबिनार आयोजित केले होते. युनिसेफने फ्लायर्स, डिजिटल पॉकेट बुक, ऑडिओ मेसेजेस, प्रेझेंटेशन इत्यादींच्या रूपात ही माहिती प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करुन दिली होती.
ट्रायफेडने कोविड 19 संबंधित राज्य संस्था, नोडल विभाग, अंमलबजावणी संस्था, व्हीडीव्हीके सदस्यांना एमएफपी खरेदी व कामकाजाच्या कामात सावधगिरी व सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात सल्लेसूचना दिल्या आहेत.
 

* * *

M.Jaitly/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1620912) Visitor Counter : 244