PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र


लॉकडाऊनच्या काळात 4 मे पासून आणखी दोन आठवड्याची वाढ

शैक्षणिक, उर्जा, नागरी हवाई वाहतूक  व कृषी क्षेत्रासंदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली बैठक

Posted On: 02 MAY 2020 8:29PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली-मुंबई, 2 मे 2020

(Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours, inputs from PIB Field Offices  andFact checks undertaken by PIB)

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती

कोविड-19या साथीच्या रोगाच्या प्रसाराला आळा घालणे, प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने सातत्याने एकत्रितपणे आणि सर्व स्तरावर उपाययोजना करत आहे. या सर्व उपाययोजना आणि व्यवस्थापनावर सर्वोच्च पातळीवर नियमित देखरेख ठेवली जात आहे.

PPE सूट्सचा (म्हणजेच पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट--शारिरिक संरक्षक परिधानाचा) योग्य वापर कसा करावा याबाबत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने काल अतिरिक्त मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. याआधी मंत्रालयाने, “पर्सनल प्रोटेक्टीव्ह इक्विपमेंटचा सुसंगत वापर” या नावाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचाच हा पुढचा भाग आहे. या सर्व मार्गदर्शक सूचना बघण्यासाठी येथे क्लिक करा:

https://www.mohfw.gov.in/pdf/AdditionalguidelinesonrationaluseofPersonalProtectiveEquipmentsettingapproachforHealthfunctionariesworkinginnonCOVIDareas.pdf

 

आतापर्यंत देशभरात कोविड-19 चे 9950 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात 1061, रुग्ण उपचारानंतर बरे झाल्अयाचे आढळले आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 26.65 टक्के इतका आहे. सध्या देशात कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या, 37,336 इतकी आहे. कालपासून देशात कोविडच्या 2293 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

 

कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/.

तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in .

कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf.

 

इतर अपडेट्स :

  • गृह मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार लॉकडाउनमुळे विविध ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित मजूर, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी व अन्य व्यक्तींना त्यांच्या इच्छित स्थळी हलवण्यासाठी 'कामगार दिनापासून' श्रमिक विशेष गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • कोविड– 19 विषाणू संसर्गाचे देशभरातील वाढते प्रमाण लक्षात घेऊन सर्व प्रवासी गाड्यांच्या वाहतुकीवर लावलेले निर्बंध 17 मे पर्यंत वाढवायचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे; मात्र, विविध राज्य सरकारांनी केलेल्या मागणीनुसार त्या त्या राज्यातील स्थलांतरित मजूर, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि विविध ठिकाणी अडकून पडलेले इतर लोक यांना त्यांच्या इच्छीत स्थळी पोहोचविण्यासाठी विशेष श्रमिक गाड्या चालविण्यात येणार आहेत.

  • देशातील कोविड -19 ची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी केलेल्या लॉकडाऊन उपायांचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर 4 मे 2020 पासून लॉकडाऊनला आणखी दोन आठवड्यांसाठी मुदतवाढ देण्याचा आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने काल दिला; त्यानुसार ऑरेंज झोनमधील व्यक्ती व वाहनांच्या हालचालींबाबतचा गोंधळ दूर करण्यासाठी स्पष्टीकरण इथे पहा:- https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1620415 (मराठी)

 

महाराष्ट्र अपडेट्स

  • महाराष्ट्रामध्ये दिवसभरात आजवरच्या 1,003 नविन रूग्णांची भर पडली असून एकट्या मुंबईमध्ये 741 कोरोना बाधित रूग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय राज्यात आजवरचे सर्वाधिक 26 रूग्ण मृत्यूमुखी पडले आहेत; यासह राज्यातील एकूण मृतांची संख्या आता 485 झाली आहे. राज्यातील एकूण रूग्णांची संख्या 11,506. मुंबईमधील एकूण रूग्णांची संख्या 7,625.

  • महत्वाचे म्हणजे महाराष्ट्र सरकारने अशी घोषणा केली आहे की सद्य परिस्थितीमध्ये केवळ गरीबांसाठी असलेली महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) आता सर्व रहिवासी दखला व रेशन कार्ड धारकांना लागू असेल. यामध्ये रुपये 1.5 लाखापर्यंतचे 1000 उपचार, राज्यातील 900 निर्धारित रुग्णालयांमध्ये घेता येतील.

DJM/RT/SP/MC/PK

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1620498) Visitor Counter : 246