रेल्वे मंत्रालय
प्रवासी गाड्यांच्या वाहतुकीवर लावलेल्या निर्बंधाला मुदतवाढ
Posted On:
02 MAY 2020 3:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 मे 2020
कोविड– 19 विषाणू संसर्गाचे देशभरातील वाढते प्रमाण लक्षात घेऊन सर्व प्रवासी गाड्यांच्या वाहतुकीवर लावलेले निर्बंध 17 मे पर्यंत वाढवायचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे
मात्र, विविध राज्य सरकारांनी केलेल्या मागणीनुसार त्या त्या राज्यातील स्थलांतरित मजूर, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि विविध ठिकाणी अडकून पडलेले इतर लोक यांना त्यांच्या इच्छीत स्थळी पोहोचविण्यासाठी विशेष श्रमिक गाड्या चालविण्यात येणार आहेत. अर्थात या गाड्यांचे परिचालन गृह व्यवहार मंत्रालयाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसारच होईल.
मोठ्या प्रमाणावर आवश्यक असलेला माल आणि पार्सल यांची ने आण करणाऱ्या गाड्यांची सध्या सुरु असलेली वाहतूक यापुढच्या काळात कोणत्याही नव्या निर्बंधाशिवाय चालूच राहणार आहे.
B.Gokhale/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1620359)
Visitor Counter : 280
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam