पंतप्रधान कार्यालय
ऊर्जा क्षेत्राचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी घेतली बैठक
Posted On:
01 MAY 2020 8:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 मे 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उर्जा क्षेत्रासंदर्भात सविस्तर बैठक घेतली आणि कोविड-19 च्या परिणामाांचा आढावा घेतला. या क्षेत्राची शाश्वतता, लवचिकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी विविध दीर्घकालीन सुधारणांवरही त्यांनी चर्चा केली.
या चर्चेत व्यवसाय सुलभता, नवीकरणीय ऊर्जेचा प्रसार; कोळशाच्या पुरवठ्यात लवचिकता; सार्वजनिक-खाजगी भागीदारीची भूमिका आणि ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूकीस चालना देण्याच्या उपाययोजनांवर चर्चा झाली.
पंतप्रधानांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्यामध्ये उर्जा क्षेत्राचे महत्व अधोरेखित केले. खासगी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी करारांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या गरजेवरही चर्चा झाली. सर्व ग्राहकांना 24X7 दर्जेदार आणि विश्वासार्ह वीज पुरवण्याच्या उद्दिष्टाप्रति कार्य करण्याचे निर्देशही दिले गेले. सुधारित प्रशासनासह दरांचे सुसूत्रीकरण आणि वेळेवर अनुदान देण्यासह वितरण कंपन्यांच्या व्यवहार्यतेत सुधारणा करण्याच्या उपायांवरही चर्चा झाली.
या बैठकीला गृहराज्यमंत्री, अर्थमंत्री, ऊर्जा, कौशल्य आणि एनआरई राज्यमंत्री आणि अर्थ राज्यमंत्री यांच्यासह केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
* * *
G.Chippalkatti/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1620173)
Visitor Counter : 218
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam