गृह मंत्रालय
कोविड-19 विरुद्धच्या लढ्यातील लॉकडाउन निर्बंधामुळे देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या लोकांच्या वाहतुकीसाठी विशेष गाड्या चालविल्या जाणार
प्रविष्टि तिथि:
01 MAY 2020 5:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 मे 2020
देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर व्यक्तींच्या वाहतुकीसाठी रेल्वे मंत्रालयामार्फत विशेष गाड्या चालविण्यास परवानगी देण्याचा आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केला आहे.
या अडकलेल्या लोकांच्या वाहतुकीकरिता रेल्वे मंत्रालय राज्य / केंद्रशासित प्रदेशांशी समन्वय साधण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करेल. तसेच तिकिटांच्या विक्रीसाठी आणि रेल्वे स्थानकांवर, रेल्वे फलाटांवर आणि गाड्यांमध्ये पाळावयाचे परस्परांमधील शारीरिक अंतर पाळण्याचे नियम तसेच इतर सुरक्षा उपाययोजनांबाबत रेल्वे मंत्रालय सविस्तर मार्गदर्शक सूचनाही जारी करेल.
राज्ये / केंद्रशासित प्रदेशांसोबत झालेले अधिकृत संभाषण पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
* * *
G.Chippalkatti/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1620079)
आगंतुक पटल : 329
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Punjabi
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam