शिक्षण मंत्रालय
विविध परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या तारखा राष्ट्रीय चाचणी संस्थेने (NTA) पुढे ढकलल्या/बदलल्या
Posted On:
30 APR 2020 9:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 एप्रिल 2020
कोविड-19 च्या उद्रेकामुळे विविध परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना होणारा त्रास लक्षात घेता, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल ‘निशंक’ यांनी राष्ट्रीय चाचणी संस्थेला विविध परीक्षांसाठीचे ऑनलाईन अर्ज भरण्याच्या तारखा बदलण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा सल्ला दिला आहे त्यानुसार, राष्ट्रीय तपास यंत्रणेने या परीक्षांच्या तारखा पुढे ढकलल्या असून नवे वेळापत्रक जारी केले आहे.
सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे :-
अनुक्रमांक
|
परीक्षा
|
सध्याच्या तारखा
|
सुधारित तारखा *
|
From
|
To
|
From
|
To
|
01
|
नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट (NCHM) JEE-2020
|
01.01.2020
|
30.04.2020
|
01.03.2020
|
15.05.2020
|
02
|
इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ IGNOU) पीएचडी आणि OPENMAT(MBA) साठीची प्रवेश परीक्षा
|
28.02.2020
|
30.04.2020
|
01.03.2020
|
15.05.2020
|
03
|
इंडियन कौन्सिल ऑफ एग्रीकल्चर रिसर्च
(ICAR)-2020
|
01.03.2020
|
30.04.2020
|
01.03.2020
|
15.05.2020
|
04
|
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ प्रवेश परीक्षा (JNUEE)-2020
|
02.03.2020
|
30.04.2020
|
02.03.2020
|
15.05.2020
|
05
|
इंडीया आयुष पदव्युत्तर प्रवेश परीक्षा (AIAPGET)-2020
|
01.05.2020
|
31.05.2020
|
06.05.2020
|
05.06.2020
|
ऑनलाइन फॉर्म संध्याकाळी चार वाजेपर्यंत भरता येतील आणि शुल्क रात्री 11.50 पर्यंत स्वीकारले जाईल.
हे शुल्क क्रेडीट कार्ड/डेबिट कार्ड/नेट बँकिंग/UPI आणि पेटीएम ने भरता येईल.
या परीक्षांचे बदललेले वेळापत्रक संबंधित अभ्यासक्रमांच्या वेबसाईटवर देखील उपलब्ध केले जाणार असून तिथूनच विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र देखील डाऊनलोड करता येईल.
विद्यार्थी आणि पालकांनी परीक्षांची काळजी करु नये, असे आववाहन NTA ने केले असून सध्याचा वेळ परीक्षांची तयारी करण्यात घालवावा, असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला आहे. परीक्षांच्या वेळापत्रकात होणाऱ्या बदलाविषयी NTA वेळोवेळी विद्यार्थ्यांना सूचित करत राहील. परीक्षार्थी आणि त्यांच्या पालकांनी www.nta.ac.in या वेबसाईट वेळोवेळी बघत राहाव्यात असे आवाहन देखील NTA ने केले आहे .
अधिक माहितीसाठी उमेदवार 8287471852, 8178359845, 9650173668, 9599676953, 8882356803 या क्रमांकावर देखील संपर्क साधू शकतात.
B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1619782)
Visitor Counter : 209
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada