PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र


कोविड-19 रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी आता राष्ट्रीय पातळीवर 11 दिवसांचा झाला आहे. लॉकडाऊन पूर्वी हाच दर 3.4 इतका होता: आरोग्य मंत्रालय

Posted On: 30 APR 2020 7:25PM by PIB Mumbai

Delhi-Mumbai, April 30, 2020

(Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours, inputs from field offices, and Fact checks undertaken by PIB)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण भारतवासियांच्या वतीने बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि समस्त बांगलादेशी नागरिकांना रमझानच्या पवित्र महिन्याच्या शुभेच्छा दिल्या. कोविड-19 या जागतिक संसर्गजन्य आजारामुळे आशियाई प्रदेशात निर्माण झालेल्या स्थितीविषयी यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.या आजाराचा प्रभाव कमी करण्यासाठी आपापल्या देशात सुरु असलेल्या उपाययोजनांची माहिती दोघांनीही एकमेकांना दिली. सार्क देशांच्या 15 मार्च रोजी झालेल्या बैठकीत कोविड संदर्भात ज्या विशेष व्यवस्थांबाबत सदस्यांमध्ये सहमती झाली होती, त्याच्या अंमलबजावणीबाबत उभय नेत्यांनी समाधान व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 30 एप्रिल 2020 रोजी म्यानमारच्या स्टेट कौन्सिलर डौ. ऑंग सॅन स्यू की यांच्याशीदेखील दूरध्वनीवरून संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोविड -19 साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी जास्तीत जास्त परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी तसेच स्थानिक गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी एक सर्वसमावेशक बैठक घेतली.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव श्री लव अगरवाल, गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्या श्रीमती पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी कोविड-19  घडामोडींवरील माहिती दिली. 

  • केंद्र सरकारने विविध ठिकाणी अडकलेल्या लोकांना त्यांच्या गावी पोहचवण्यासाठी आंतरराज्यीय वाहतूकीची सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी गृहमंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे आणि राज्यांच्या प्रोटोकॉल चे काटेकोर पालन करायचे आहे – गृह मंत्रालय
  • कोविड19 रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी आपण बघितला तर, आपल्या लक्षात येईल, की राष्ट्रीय पातळीवर हा दर 11 दिवसांच्या कालावधीचा आहे. लॉकडाऊन पूर्वी हाच दर 3.4 इतका होता
  • कोविड-19 शी संबंधित नसलेल्या अत्यावश्यक सेवांची ज्यांना गरज असेल त्यांना त्या पुरविणे सुरूच ठेवण्याच्या आरोग्य मंत्रालयाने राज्यांना सूचना दिल्या आहेत.
  • कोविड19 च्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने डायलिसिस साठी एक प्रमाणित कार्यपद्धती प्रोटोकॉल (SOP) तयार केला आहे. आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्रालयांना निर्देश दिले आहेत की रुग्णांना रक्त देण्याची प्रकिया सुरळीत ठेवावी, विशेषतः ज्या रुग्णांना नियमित रक्तपुरवठा करावा लागतो, त्यांची व्यवस्था करावी. विशेषतः खासगी क्षेत्रातील सर्व आरोग्य सेवा, कार्यरत राहतील आणि रुग्णांना समस्यांचा सामना करावा लागू नये अशा दृष्टीने गंभीर आजारांच्या सेवा पुरवत राहतील याची खबरदारी राज्यांनी घ्यावी अशा आरोग्य मंत्रालयाच्या सूचना आहेत.
  • कोणत्याही आरोग्य सुविधा केंद्राने करण्यास सांगितलेली कोविड-19 तपासणी प्रोटोकॉलनुसारच असली पाहिजे. कोणत्याही रुग्णाला प्रोटोकॉलपलिकडे जाऊन अतिरिक्त तपासणी गरजेची असल्याचे कारण सांगून, उपचार नाकारले जाता कामा नयेत
  • बिगर-कोविड19 रुग्णालयात कोविडचा पॉझिटिव्ह अथवा संशयित रुग्ण आढळला तर त्यासंदर्भातल्या उपाययोजनांबाबत आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या रुग्णालयात आवश्यक ती निर्जंतुकीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तिथल्या आरोग्य सेवा पुढेही सुरु ठेवता येतील
  • हायड्रॉक्झी-क्लोरोक्वीनचा, कोविड-19 संसर्गावरील प्रतिबंधात्मक उपचारासाठी वापर करण्याबद्दल सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. हायड्रॉक्झी-क्लोरोक्वीनची पुरेशी उपलब्धता राखण्याची काळजी घेतली गेली पाहिजे- आरोग्य मंत्रालय
  • आरोग्य सेवा प्रदात्यांनी स्वसंरक्षणासाठी आवश्यक ती काळजी आणि खबरदारी घ्यायची असून मार्गदर्शक तत्वांनुसार PPE सुट्स वापरायचे आहेत. आरोग्य सुविधा देताना संक्रमण प्रतिबंध आणि नियंत्रणविषयक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे – आरोग्य मंत्रालय
  • जलद प्रतिपिंड(antibody) तपासणी किट्सच्या वापराबद्दल ICMR म्हणजे, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, राज्यांशी समन्वय साधत आहे. या तपासणीची उपयोगिता, लक्ष ठेवण्यापुरती मर्यादित आहे, हे समजून घेतले पाहिजे. तपासणी व उपचार यासाठी RT-PCR चाचणी वापरली गेली पाहिजे.
  • विविध ठिकाणी अडकलेल्या व्यक्तींच्या राज्यांतून वाहतुकीसाठी बसेसचा वापर करायचा असून गटागटाने त्यांची वाहतूक करायची आहे-- एका प्रश्नाला उत्तर देतांना गृहमंत्रालयाने  माहिती दिली
  • कोविड19 च्या रुग्णांची एकूण संख्या- 33,050 वैद्यकीय निरीक्षणाखाली असलेले सक्रिय संक्रमित रुग्ण- 23,651. गेल्या 24 तासांत -67 मृत्यू, 630 जण बरे झाले. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या- 8,324. बरे होण्याचा दर- 25.19%
  • रुग्ण कोरोनामुक्त होण्याचा दर सुधारला आहे. 14 दिवसांपूर्वी 13.06% असणारा हा दर आज 25% पेक्षाही जास्त आहे. हे अतिशय आशादायक चिन्ह आहे.
  • आजपर्यंत तरी कोविड19 च्या उपचारांसाठी कोणताही खात्रीशीर प्रोटोकॉल अस्तित्वात नाही. रेमडेसिविर हा एक प्रोटोकॉल असून, त्याचा पडताळा घेण्याचे काम सुरू आहे. NIAIDNews ने रेमडेसिविर विषयी केलेल्या अभ्यासानंतरही त्याची परिणामकारकता निःसंदिग्धपणे सिद्ध झालेली नाही. अर्थपूर्ण कृती सुरू करण्यासाठी, अधिक मोठ्या पुराव्याची प्रतीक्षा सुरू आहे.
  • सरकारच्या विविध संस्था कोविड19 च्या विविध लसींच्या चाचण्यांमध्ये व्यस्त आहेत. आम्ही जागतिक आरोग्य संघटनेच्या एकत्रित चाचण्यांमध्ये देखील सहभागी आहोत. काही कॅन्डीडेट लसी निश्चित करण्यात आल्या होत्या, मात्र अद्याप त्यातून काही ठोस निष्कर्ष निघालेला नाही.
  • एखाद्या लसीचा मानवासाठी उपयोग करण्यापूर्वी अनेक टप्पे पार करून तिची सुरक्षितता व परिणामकारकता तपासावी लागते. भारतापुरता विचार केल्यास, आपण प्रतिबंधात्मक उपचार म्हणून हायड्रॉक्झी-क्लोरोक्वीनला मान्यता दिली आहे.
  • आता यापुढे शारीरिक अंतर हे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवून ती सवय लावून घ्यायची आहे, याबाबत आरोग्य मंत्रालय अत्यंत सुस्पष्ट आहे. त्याशिवाय, संक्रमण साखळी तोडण्यासाठी कंटेंनमेंट च्या उपाययोजना पाळणे देखील तेवढेच महत्वाचे आहे
  • RT-PCR प्रकारच्या तपासणीचे प्रमाण वाढविण्यात आले असून आता देशात 292 सरकारी आणि 97 खासगी प्रयोगशाळांमध्ये कोविड-19 च्या तपासण्या केल्या जातात. काल आपण 58,686 तपासण्या केल्या. गेल्या 5 दिवसांत, दररोज सरासरी 49,800 तपासण्या केल्या गेल्या आहेत.
  • आम्ही आमची चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढवत आहोत, प्रोटोकॉल नुसार ज्या लोकांना चाचण्यांची गरज आहे, अशा सर्व लोकांच्या चाचण्या केल्या जात आहेत.
  • हैदराबादला भेट देणाऱ्या केंद्रीय पथकाने असे निरीक्षण मांडले आहे की, राज्यात चाचणी किट्स,  PPE इ. सामुग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. राज्यात प्रत्येक टप्प्यावर नजर ठेवणारा माहिती तंत्रज्ञानाचा डॅशबोर्ड वापरला जात आहे.हैदराबादच्या केंद्रीय पथकाने राज्यातील गांधी रुग्णालयाला भेट दिली. या ठिकाणी डिस्चार्ज आणि उपचारांसाठीचे आवश्यक प्रोटोकॉल पाळले जात आहेत. या प्रदेशातील 93% पेक्षा जास्त कोरोना रुग्णांवर याच रुग्णालयात उपचार केले गेले असून इथे दररोज 300 चाचण्या करण्याची क्षमता आहे.गांधी रुग्णालयातून रुग्णाला डिस्चार्जनंतर घरापर्यंत सोडण्यात येते, व नंतर मोबाईलवरील मेसेजेसच्या माध्यमातून विलगीकरणावर देखरेख ठेवण्यात येते, असे निरीक्षण या पथकाने नोंदविले आहे. केंद्रीय पथकाने किंग कोटी रुग्णालयालाही भेट दिली, तिथेही प्रोटोकॉलचे पालन होत आहे. PPE सूट काढणे आणि घालण्याची जागा परस्परांपासून दूर असावी तसेच कर्मचारी आणि रुग्ण यांच्यासाठी वेगवेगळ्या मार्गिका असाव्यात, अशी सूचना या पथकाने केली.
  • हैदराबाद पथकाने हुमायूँनगरमधील क्षेत्रबंदीच्या परिसराला भेट दिली. अत्यावश्यक वस्तू आणि सेवा महानगरपालिकेकरवी घरोघरी पोहोचविल्या जात आहेत. नजर ठेवण्यासाठी पोलीस, ड्रोन तंत्रज्ञान वापरत आहेत.IMCT हैदराबादने केंद्रीय औषधी केंद्रातील औषधसाठा देखरेख व्यवस्थेची तपासणी केली. या केंद्रात जिल्हे आणि उपजिल्ह्यातील 44 रुग्णालयातल्या औषधसाठ्यावर चोवीस तास सतत देखरेख ठेवली जाते. केंद्रीय पथकाने मांडलेल्या निरीक्षणानुसार, हैदराबादमधील  निवाराकेंद्रांमध्ये अन्न आणि इतर गरजांची पूर्तता केली जात आहे. महानगरपालिका फिरत्या स्वयंपाकघरांच्या माध्यमातून वृद्धाश्रम, अनाथाश्रम, रात्रनिवारे व तृतीयपंथी व्यक्तींना भोजन पुरवित आहे. IMCT हैदराबादला असेही आढळले की लॉकडाऊन आणि शारीरिक अंतरविषयक नियमांचे साधारणपणे व्यवस्थित पालन केले जात आहे. IMCT चेन्नईच्या पाहणीत असे आढळले की तामिळनाडू मधला रुग्ण बरे होण्याचा दर चांगला असून, आतापर्यंत कोविड19 चे 57 टक्के रुग्ण बरे झाले आहेत.
  • चेन्नईला भेट देणाऱ्या केंद्रीय पथकाने दिलेल्या माहितीनुसार, निवारा शिबिरांत उपलब्ध करून दिलेल्या सुविधांविषयी स्थलांतरित कामगार समाधानी आहेत. टीव्ही, वैद्यकीय तपासण्या आणि समुपदेशन सेवाही त्यांना पुरविण्यात आल्या आहेत. दररोज तीन वेळा आहार पुरवण्यात येतो. अनुदानित दराने शिधा आणि अत्यावश्यक वस्तूंचे एक किट दिले जाते. नमुना संकलनासाठी फिरत्या गाड्या वापरल्या जात आहेत. त्यामुळे फैलाव कमी होत असल्याचे चेन्नईला भेट देणाऱ्या पथकाने नोंदविले आहे. चेन्नईच्या पथकाने अशी माहिती दिली की चाचण्यांचे रिपोर्ट्स 24 तासांत दिले जातात. कोविड टेली-मार्गदर्शन आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केंद्रांचे काम व्यवस्थित सुरु आहे. कोविड रुग्णालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या सुविधेचा वापर करत डॉक्टर्स रुग्णांशी संवाद देखील साधतात. चेन्नईतील केंद्रीय पथकाने अशी माहिती दिली आहे की, कौटुंबिक हिंसाचाराविरोधात राज्य सरकारने पावले उचलली आहेत. असे प्रकार थांबवण्यासाठी महिला पोलीस, पोलिसांकडे पूर्वी नोंदवलेल्या माहितीच्या आधारे वेळेवर घरोघरी भेट देतात. चेन्नई IMCT ने राज्याला काही भागात, विशेषतः दाट लोकवस्तीच्या ठिकाणी शारीरिक अंतराचे नियम अधिक कठोर बनवण्याची सूचना केली आहे. तसेच, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी PPE सूटचा वापर वाढवावा आणि ट्रकचालकांचे स्क्रिनिंग वाढवावे असे सांगण्यात आले आहे.
  • आजवरच्या कोरोनामृत्यूंची आकडेवारी

मृत्यूचे प्रमाण 3.2% आहे.

मरण पावलेल्यांमध्ये 65% पुरुष तर 35% स्रिया आहेत.

वयानुसार वर्गीकरण -

45 वर्षांपेक्षा कमी वय- 14%

45-60 चा गट - 34.8%

60 वर्षांवरील गट - 51.2%

(60 ते 75 वर्षे वयोगट-: 42% , 75 वर्षांपुढे -: 9.2%)

इतर अपडेट्स :

  • नौवहन मंत्रालयाने आपले संकेतस्थळ shipmin.gov.in  अद्ययावत करून 30 एप्रिल 2020 रोजी त्याचा प्रारंभ केला आहे.
  • वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (डीपीआयआयटी) उद्योग आणि व्यापाराशी संबंधित समस्यांवर देखरेख  ठेवण्यासाठी आणि संबंधित राज्य सरकार, जिल्हा आणि पोलिस प्रशासन आणि इतर संबंधित संस्थांकडे या समस्या पोहचवण्यासाठी 26.3.2020  पासून एक नियंत्रण कक्ष स्थापन केला होता. हा नियंत्रण कक्ष पुढील बाबींवर देखरेख ठेवतो-
  • कोविड-19 साथरोग आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर UGC अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाने, शैक्षणिक नुकसान टाळण्याच्या उद्देशाने परीक्षा व शैक्षणिक दिनदर्शिका यांविषयी विचारविनिमय करून शिफारशी करण्यासाठी एका समितीची नेमणूक केली होती. UGC चे माजी सदस्य व हरियाणा केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.आर.सी. कुहाड यांनी या समितीचे अध्यक्षपद भूषविले.
  • जीआयएस म्हणजेच भौगोलिक माहिती प्रणाली डॅशबोर्डचा वापर करून आग्रा स्मार्ट सिटीमध्ये कोविड- 19च्या हॉट-स्पॉटसचे निरीक्षण केले जात आहे. या डॅशबोर्डमुळे शहरात कोविड-19चा प्रसार वेगाने होत असलेली स्थानके, हीट मॅप, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या, आजारातून बरे झालेल्यांची संख्या यांची माहिती मिळत आहे.
  • कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील टाळेबंदीमध्ये आपल्या जवळपासची प्रधानमंत्री जनौषधी केंद्र (पीएमजेएके) शोधून त्यात परवडणाऱ्या जेनेरिक औषधांची उपलब्धता आणि त्यांच्या किंमती जाणून घेण्यासाठी "जनौषधी सुगम मोबाइल ॲप लोकांना मोठ्या प्रमाणावर मदत करीत आहे. त्याद्वारे मिळणाऱ्या अनेक सुविधांचा लाभ घेण्यासाठी 3,25,000 पेक्षा जास्त लोक जनौषधी सुगम मोबाइल अॅप वापरत आहेत.

महाराष्ट्र अपडेट्स

  • सापडलेल्या 597 नव्या केसेससह महाराष्ट्रातील कोविड-19 रुग्ण संख्या 9,915 झाली आहे. एकूण 1,539 रुग्ण बरे झाले असून 432 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये सर्वोच्च रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे जी 3,096 आहे. नाशिकमधील मालेगाव हे एक नवीन हॉटस्पॉट बनल्याचे आढळून आले आहे.
  • लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, यात्रेकरू तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कार्यपद्धती निश्चित केली असून सर्व जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी असतील तसेच मंत्रालयातील नियंत्रण कक्षाद्वारे यावर देखरेख ठेवली जाईल. याबाबतीत अतिशय काळजीपूर्व व जबाबदारीने सर्व यंत्रणांनी अंमलबजावणी करावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
  • मंत्रालयात महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ नितीन करीर, महिला बाल विकास प्रधान सचिव आय.ए कुंदन, तसेच संचालक , आपत्ती व्यवस्थापन अभय यावलकर यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ०२२-२२०२७९९०, ०२२-२२०२३०३९ हे दूरध्वनी क्रमांक असून controlroom@maharashtra.gov.in हा ईमेल देण्यात आला आहे.
  • जिल्ह्यांचे नोडल अधिकारी  त्यांच्या जिल्ह्यातील अडकलेल्या व्यक्तींची यादी तयार करून संबंधित इतर जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवतील. परराज्यातील लोकांच्या ये-जासाठी दोन्ही राज्ये एकमेकांशी बोलून त्यांची रस्तेमार्गे कशी वाहतूक करायची ते  ठरवतील.
  • जिल्हाधिकारी किंवा संचालक, राज्य आपत्ती व्यवस्थापन यांचे पत्र असल्याशिवाय लोकांच्या कोणत्याही गटाला स्थलांतर करण्याची परवानगी दिली जाणार नाही. ज्या व्यक्तीना कोविड किंवा इंफ्लूएन्झा सारखी लक्षणे नाहीत त्यानांच केवळ प्रवासाची परवानगी दिली जाईल. लक्षणे असल्यास निश्चित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे वैद्यकीय उपचार करण्यात येतील. इतर राज्यांतील किंवा जिल्ह्यांमधील प्रशासनाच्या पत्रात संबंधित व्यक्तीस कुठलेही लक्षण नाही हे स्पष्टपणे लिहिलेले असणे आवश्यक करण्यात आले आहे.

 

***

 

DJM/RT/MC/SP/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1619679) Visitor Counter : 334