वस्त्रोद्योग मंत्रालय

देशातील कोविड-19 रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आवश्यक असणाऱ्या संपूर्ण सुरक्षा अच्छादनांची उत्पादन क्षमता प्रतिदिन 1 लाखांहून अधिक झाली;  आत्तापर्यंतचे एकत्रित उत्पादन अंदाजे 10 लाख

कोविड-19 विरुद्धच्या लढाईत आघाडीवर असणाऱ्या आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी हे मोठे प्रोत्साहन आहे

पीपीई सूट म्हणजे संपूर्ण सुरक्षा अच्छादनांच्या उत्पादनात बंगळूरू अग्रस्थानी आहे; तामिळनाडूमधील चेन्नई आणि तिरुपूर, पंजाबमधील फागवारा आणि लुधियाना, एनसीआरमधील गुरुग्राम आणि नोएडा ही उत्पादनाच्या उद्योगांची मुख्य केंद्रें बनली आहेत.

Posted On: 26 APR 2020 3:57PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 26 एप्रिल 2020

 

देशातील कोविड-19 रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आवश्यक संपूर्ण सुरक्षा अच्छादनांच्या उत्पादनाची क्षमता दिवसागणिक वाढून आता ती प्रतिदिन 1 लाखांहून अधिक झाली आहे. कोविड-19 वर मात करण्यासाठी बंगळूरू हे देशातील या उत्पादनाचे मुख्य केंद्र बनले आहे. देशातील सुमारे 50 टक्के उत्पादन हे बंगळूरू मध्ये होते. संपूर्ण शरीराची सुरक्षा (पीपीई) करणारा हा एक विशेष संरक्षक अच्छादन सूट आहे जो आरोग्यसेवा व्यावसायिकांना उच्च स्तरीय संरक्षण प्रदान करतो, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नमूद केल्याप्रमाणे यामध्ये कठोर तांत्रिक बाबींची पूर्तता होणे आवश्यक आहे.

बंगळूरू व्यतिरिक्त, तमिळनाडूमधील तिरुपूर, चेन्नई आणि कोयंबटूर, गुजरातमधील अहमदाबाद आणि वडोदरा, पंजाबमधील फगवाडा आणि लुधियाना, महाराष्ट्रातील कुसुमनगर आणि भिवंडी, राजस्थानमधील डूंगरपूर, कोलकाता, दिल्ली, आणि नोएडा, गुरुग्राम आणि इतर काही ठिकाणे पीपीई सूटची निर्मिती केली जात आहे. पीपीई सुटचे आत्तापर्यंतचे एकत्रित उत्पादन अंदाजे 10 लाख सूट इतके आहे.

जानेवारी 2020 च्या शेवटच्या आठवड्यात, आयओएसओ 16003 नुसार डब्ल्यूएचओ वर्ग-3 एक्सपोजर प्रेशरनुसार किंवा त्याच्या समकक्षानुसार पीपीई सूटसाठी तांत्रिक मानक विहित केले आहे. काही आंतराष्ट्रीय कंपन्या अशी सामग्री तयार करत होते परंतु, साठ्यावरील अतिरिक्त भार आणि स्रोत देशांकडून असलेली निर्यात बंदी यामुळे त्यांनी पुरवठा करण्यास असमर्थता दर्शविली. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या खरेदी संस्थेने केवळ मर्यादित प्रमाणात मागणी आणि खरेदी केली.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कार्यक्षेत्रातील तज्ञांशी सल्लामसलत करून, साधन-सामग्रीची देशांतर्गत उपलब्धता आणि कोविड-19 च्या रुग्णांवर उपचार करत असणाऱ्या आरोग्यसेवा व्यवसायिकांच्या उच्च स्तरीय संरक्षणासाठी तांत्रिक आवश्यकता, या बाबींच्या आधारे 2 मार्च 2020 रोजी तांत्रिक आवश्यकता अंतिम स्वरूप दिले. हे स्पष्टीकरण एचएलएल लाइफकेयर लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळावर 5 मार्च 2020 रोजी प्रकाशित केले होते आणि खरेदी प्रक्रियेत भाग घेण्यासाठी पुरेशी क्षमता असलेल्या उत्पादकांना आमंत्रित केले होते.

आत्तापर्यंत, देशात चार प्रयोगशाळा आहेत ज्यात कृत्रिम रक्त प्रवेश प्रतिरोध चाचणी सुविधा आहेत तसेच कोविड-19 साठी आवश्यक असलेल्या पीपीईसाठी चाचण्या आणि प्रमाणपत्र घेण्यासाठी आवश्यक मंजूरी आहे. त्या आहेत- दक्षिण भारत वस्त्रोद्योग संशोधन संघ (सीआयटीआरए), कोयंबटूर, संरक्षण संशोधन आणि विकास प्रतिष्ठान (डीआरडीई), ग्वालियर आणि आयुध कारखाना मंडळा अंतर्गत दोन प्रयोगशाळा - अवजड वाहन कारखाना, अवडी आणि लहान आयुध कारखाना, कानपूर.

कापड आणि पीपीई सूट पोषाखाच्या संदर्भात घेण्यात आलेल्या अशा प्रत्येक चाचणीसाठी, संबंधित उत्पादकांकडून प्रतिकृती नमूना पाठविला जातो आणि त्यानंतर एक विशिष्ट प्रमाणपत्र कोड (UCC-COVID19) तयार केला जातो. या कोडमध्ये कापडाचा प्रकार, पोशाखाचा प्रकार, त्याची चाचणीची तारीख, चाचणी मानक आणि इतर संबंधित तपशीलांची नोंद असते. मंजूर झालेल्या प्रत्येक नमुन्यास दिलेल्या यूसीसी डीआरडीओ, ओएफबी आणि सिट्राच्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित केला जातो जेणेकरून कोणत्याही उत्पादन वापरकर्त्याला तो सहजपणे पडताळणीसाठी उपलब्ध होऊ शकेल. चाचणीची प्रक्रिया अधिक सुसंगत करण्याच्या दृष्टीने आणि पीपीई सूटची  गुणवत्ता कायम राखली जाईल या उद्देशाने, चाचणी प्रयोगशाळा आता, संस्थाच्या पीपीई सूटची चाचणी मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये घेण्याच्या हेतूने संस्थेने विहित नमुन्यात प्रतिज्ञापत्र सादर केल्यावरच प्रयोगशाळा चाचणीसाठी नमुना स्वीकारेल.

आरोग्य मंत्रालयाकडून आवश्यकतेनुसार राज्यांना पीपीई संच पाठविले जात आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, औषधनिर्माण विभाग आणि वस्त्रोद्योग मंत्रालय पुरवठा साखळी सुलभ करण्यासाठी, अडथळे दूर करण्यासाठी आणि आरोग्यसेवा व्यवसायिकांना आवश्यक असणार्‍या सर्व साहित्याचा अव्याहत पुरवठा करण्यासाठी चोवीस तास अहोरात्र विविध उद्योग संस्था, भागधारक आणि उत्पादक यांच्याबरोबर सातत्याने कार्यरत आहेत.

***

G.Chippalkatti/S.Mhatre/P.Kor(Release ID: 1618443) Visitor Counter : 29