आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती

2020-21 या वर्षासाठी फॉस्फेटिक आणि पोटॅश खतांसाठी पोषक तत्त्व आधारित अनुदान दर निश्चितीला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

Posted On: 22 APR 2020 5:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 एप्रिल 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीच्या बैठकीत, 2020-21 या वर्षासाठी फॉस्फेटिक आणि पोटॅश युक्त खतांसाठी पोषक तत्त्व आधारित अनुदान दर निश्चितीला मंजुरी देण्यात आली. पोषक आधारित दर याप्रमाणे आहेत-

 

प्रती किलो अनुदान दर ( रुपयात)

एन

पी

के

एस

18.789

 

14.888

 

10.116

 

2.374

 

 

अमोनियम फॉस्फेट या मिश्र खताचा समावेशही पोषक तत्त्व आधारित अनुदान योजनेत करण्यासाठी आज मंजुरी देण्यात आली.

2020-21 या वर्षासाठी फॉस्फेटिक आणि पोटॅश खतांसाठीच्या अनुदानाकरीता 22,186.55 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

या खतांवरचे अनुदान,केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने मंजूर केलेल्या अनुदान दरानुसार खत कंपन्यांना देण्यात येईल.

 

पूर्वपीठीका:

केंद्र सरकार प्रामुख्याने युरिया आणि  फॉस्फेटिक आणि पोटॅश खतांच्या  21 श्रेणी, शेतकऱ्यांना अनुदानित दरात उपलब्ध करून देत आहे. 1- 4 - 2010 पासून फॉस्फेटिक आणि पोटॅश खतांसाठीचे अनुदान पोषक तत्त्व आधारित अनुदान योजने अंतर्गत देण्यात येते. केंद्र सरकार आपल्या शेतकरी स्नेही धोरणाला अनुसरून शेतकऱ्यांना माफक दरात फॉस्फेटिक आणि पोटॅश खते उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. दिलेल्या दरानुसार खत कंपन्यांना अनुदान दिले जाईल, ज्यामुळे या कंपन्या शेतकऱ्यांना माफक दरात खत उपलब्ध करून देतील.

 

* * *

U.Ujgare/N.Chitale/D.Rane

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1617161) Visitor Counter : 100