गृह मंत्रालय
भारतीय वैद्यकीय परिषदेचे प्रतिनिधी आणि डॉक्टरांशी केंद्रीय गृहमंत्र्यांची चर्चा; कोविड-19 शी लढा देतांना त्यांना पूर्ण सुरक्षा देण्याचे आश्वासन
आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले निषेधार्ह; त्यांची सुरक्षा आणि कल्याणासाठीच्या प्रयत्नांत सरकार कोणतीही कसूर करणार नाही : अमित शाह
Posted On:
22 APR 2020 2:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 एप्रिल 2020
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज भारतीय वैद्यकीय परिषदेचे (IMA), वरिष्ठ प्रतिनिधी आणि डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून चर्चा केली.

कोविड-19 सोबत सुरु असलेल्या देशव्यापी लढ्यात डॉक्टरांच्या महत्वाच्या योगदानाचे गृहमंत्र्यांनी कौतुक केले आणि डॉक्टर्स यापुढेही कोविड विरुद्धचा आपला आजवरचा लढा असाच पुढेही सुरु ठेवतील, अशा विश्वास व्यक्त केला. ह्या भयंकर आजारापासून जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी संपूर्ण वैद्यकीय कर्मचारी जो त्याग करत आहेत, त्याबद्दल शाह यांनी त्यांना वंदन केले.
डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर या काळात होणाऱ्या हल्ल्यांचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. या संपूर्ण प्रकाराकडे आणि डॉक्टरांच्या समस्यांकडे पंतप्रधान स्वतः लक्ष देत आहेत, असेही त्यांनी सांगितले. भविष्यात अशी एकही घटना घडू नये यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेतली जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली. मात्र, अशा घटनांचा प्रतीकात्मक निषेध करण्यासाठी देखील सध्या डॉक्टरांनी कोणतेही आंदोलन करु नये, सध्याच्या परिस्थितीत, ते देश किंवा वैश्विक हिताचे ठरणार नाही, अशी विनंती शाह यांनी केली.
या घटनांची केंद्र सरकारतर्फे उच्चस्तरावरुन तातडीने घेण्यात आलेली दखल आणि गृहमंत्र्यांनी दिलेली ग्वाही लक्षात घेऊन, भारतीय वैद्यकीय परिषदेने आपले प्रस्तावित आंदोलन मागे घेतले आहे.तसेच, कोविड-19 विरुध्च्या लढ्यातले कार्य पुढेही सुरूच ठेवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसह नीती आयोगाचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते.
B.Gokhale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1617016)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam