संरक्षण मंत्रालय

कोविड-19 च्या लॉकडाऊन काळात भारतीय नौदलाच्या विशाखापट्टणम हवाई क्षेत्राचे कार्य 24 तास सुरू राहणार

Posted On: 14 APR 2020 12:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 एप्रिल 2020

 

सध्या देशभर कोविड-19 च्या साथीचा प्रसार होत आहे, त्यामुळे देशव्यापी लॉकडाऊन आहे. कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी ईस्टर्न नेव्हल कमांडच्या (इएनसी) ‘आयएनएस डेगा’च्यावतीने विशाखापट्टणम इथलं संयुक्त वापरातले हवाई क्षेत्र चोवीस तास खुले ठेवून कार्यरत राहण्याचा निर्णय घेतला आहे. या हवाईतळावर त्यासाठी आवश्यक असणारी सर्व सुरक्षा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच गरजेनुसार हवाईतळाच्या व्यवस्थापनामध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व विशेष उड्डाणे आणि स्पाइस जेटच्या मालवाहू कार्गोंची उड्डाणे इथून होवू शकणार आहेत. लॉकडाऊन लागू झाल्यापासून या हवाईतळावरून मालवाहू 15 कार्गोंची उड्डाणे झाली आहेत.

भारतीय नौदलाच्या वतीने रात्रंदिवस नियमितपणे सागरी सीमेवर पाळत ठेवण्याची मोहीम सुरू ठेवली आहे. इएनसीच्या आयएनएएस 311 च्या डॉर्निअर स्क्वाड्रनमार्फत या हवाई स्थानकाचे कार्य सुरू आहे. नियमित दक्षतेचा भाग म्हणून सागरी पाळत ठेवण्याचे काम सुरू ठेवले आहे. या व्यतिरिक्त गरज पडल्यास कोणत्याही मोहिमेसाठी इतर सर्व हवाई सामुग्री-मालमत्ता यांची सिद्धता इथं ठेवली आहे. आवश्यकता भासल्यास तैनातीचीही तयारी करण्यात आली आहे.

B.Gokhale/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 



(Release ID: 1614700) Visitor Counter : 167