गृह मंत्रालय

कोविड-19 या जागतिक आजारावर आळा घालण्यासाठी देशात 3 मे 2020 पर्यंत लॉकडाऊन ची अंमलबजावणी सुरु राहणार

Posted On: 14 APR 2020 7:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 एप्रिल 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला उद्देशून केलेल्या भाषणात, कोविड-19 ला आळा घालण्यासाठी, लॉकडाऊनची अंमलबजावणी 3 मे 2020 पर्यंत कायम राहणार असल्याची घोषणा केली आहे.

या घोषणेच्या अनुषंगाने, केंद्र सरकराने सर्व केंद्रीय मंत्रालये/विभाग,राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेश अशा सर्वाना काही सूचना आणि निर्देश जारी केले आहेत. यानुसार, केंद्रीय गृहमंत्रालयाने तयार केलेल्या लॉकडाऊनविषयक मार्गदर्शक तत्वांच्या नुसारच, पुढेही सर्व नियम लागू राहणार आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना या संदर्भात आदेश जारी केले आहेत. लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर, सर्व विभागावर जी बंधने घालण्यात आली आहेत, तसेच काही कामांवर मर्यादा घालण्यात आल्या असून ही बंधने पुढेही कायम राहणार आहेत. ह्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे सर्व मंत्रालये, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी या आदेशांचे काटेकोर पालन करायचे आहे.

आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेले आदेशानुसार ही बंधने लावण्यात आली असून ती शिथिल करण्याचा अधिकार राजे किंवा केंद्रशासित प्रदेशांना नाही,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

लॉकडाउनच्या उपाययोजनांच्या संदर्भातील संबंधीत आदेश पाहण्यासाठी येथे क्लिक करा   

 

 

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar


(Release ID: 1614694)