संरक्षण मंत्रालय

आयुध निर्माण मंडळ आयएसओ क्लास 3 चे 1.10 लाख संसर्गरोधी कव्हरऑल सूट्स तयार करणार

Posted On: 14 APR 2020 4:41PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 14 एप्रिल 2020

 

आयुध निर्माण मंडळाने आयएसओ श्रेणी 3 दर्जाच्या प्रमाणित दर्जाचे संसर्गरोधी  कव्हरऑल (वैयक्तिक संरक्षक संपूर्ण पोशाख) बनवून त्याचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या 1.10 लाख कव्हरऑलची ऑर्डर हिंदुस्थान लिव्हर लिमिटेडच्या लाईफकेअर लिमिटेड ने दिली असून त्याचे उत्पादन युद्धपातळीवर सुरु आहे. ही ऑर्डर 40 दिवसांत पूर्ण होईल.

आयुध निर्माण मंडळाने दोन मीटर चे विशेष तंबूही तयार केले आहेत, जे वैद्यकीय आप्तकालीन परिस्थिती,    स्क्रिनिंग किंवा विलगीकरण यासाठी वापरता येतील.हे तंबू वॉटरप्रूफ कापड, पोलाद आणि अल्युमिनियमचे साहित्य वापरून तयार केले आहेत.

हँड सॅनीटायझर बनवण्याचे काम देखील युद्धपातळीवर सुरु आहे. आतापर्यंत 70, 000 लिटर विविध संस्थाना पाठवण्यात आले आहेत.

ब्लड पेनिट्रेशन टेस्ट साठी दोन ठिकाणी सुविधा तयार करण्यात आल्या आहेत.

10 रुग्णालयात 280 खाटा अलगीकरणासाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या गरजेनुसार ही पावले उचलण्यात आली आहेत. त्याशिवाय आयुध निर्माण मंडळ मास्क बनवण्याचा प्रयत्न करत असून, 90,000 पेक्षा अधिक अ-वैद्यकीय मास्क बनवून वितरीत ही करण्यात आले आहेत.

***

U.Ujgare/R.Aghor/P.Kor


(Release ID: 1614359) Visitor Counter : 201