PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र


PPE चा पुरवठा करण्यासाठी 20 स्थानिक उत्पादक तैनात केले गेले, 1.7 कोटी PPE आणि 49,000 व्हेंटिलेटरची मागणी नोंदवली गेली: आरोग्य मंत्रालय

Posted On: 09 APR 2020 7:20PM by PIB Mumbai

Delhi-Mumbai, April 9, 2020

  भारत -अमेरिका भागीदारी पूर्वीपेक्षाही अधिक बळकट  असल्याचे  प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. कोविड-19 विरुद्धच्या लढाईत अमेरिकेला हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांच्या ट्विटर संदेशाला  उत्तर  देतांना पंतप्रधान म्हणाले की, मानवजातीसाठी भारत शक्य असेल ते सर्व काही करेल.''

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवर पत्रकार परिषद 

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव श्री लव अगरवाल यांनी आज पत्रकार परिषदेत खालील माहिती दिली.

  • आतापर्यंत देशभरातील 473 कोरोनाग्रस्त रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्या कोरोनाबधितांची संख्या 5,734 इतकी आहे. गेल्या 24 तासांत, 540 नवे रुग्ण आणि 17 मृत्य. एकूण मृत्यसंख्या -166.
  • कालपर्यंत सुमारे 1,30,000 कोविड-19 चाचण्या करण्यात आल्या, यापैकी 5,734 positive होत्या - गेल्या 1-2 महिन्यात positivity rate मध्ये लक्षणीय वाढ झालेली नाही, ही वाढ 3%-5% च्या दरम्यान आहे, काल 13,143 नमुने तपासण्यात आले.- ICMR
  • केंद्र सरकारने 'इंडिया कोविड -19 आपत्कालीन प्रतिसाद आणि आरोग्य यंत्रणा सज्जता पॅकेज' साठी 15000 कोटी रुपयांच्या महत्त्वपूर्ण गुंतवणूकीची घोषणा केली आहे. मंजूर करण्यात आलेल्या या निधीचा वापर तत्काळ कोविड -19 आपत्कालीन प्रतिसाद  (7774 कोटीं रुपये रक्कम) आणि मिशन मोड दृष्टीकोनातून पुरविल्या जाणार्या  मध्यम मुदतीच्या मदतीसाठी (1-4 वर्षे) केला जाईल.
  • राज्ये/केंद्रशासित प्रदेशाना व्हेंटिलेटर व्यवस्थापनात पाठबळ देण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने उच्च स्तरीय बहुक्षेत्रीय पथकांची स्थापना केली आहे, कोविड-19 प्रतिबंध योजना व रुग्णालय सज्जता, अशा प्रकारची 10 पथके नऊ राज्यात पाठवली आहेत.
  • CSIR च्या दोन प्रयोगशाळांनी  नोवेल कोरोना विषाणूच्या गुणसूत्र क्रमवारीचे अध्ययन करणे सुरु केले आहे, यातून कोविड-19 च्या उत्क्रांतीचे आकलन करता येईल
  • कोविड-19 आव्हानाला तोंड देण्यासाठी भारतीय रेल्वेने 2500 हुन जास्त डॉक्टर आणि 35000 निमवैद्यकीय कर्मचारी तैनात केले आहेत.
  • 'भारतीय रेल्वे'चे 586 आरोग्य विभाग, 45 उपविभागीय रुग्णालये, 8 उत्पादन विभाग रुग्णालये आणि 16 क्षेत्रीय रुग्णालये देशभरात आवश्यक असून ही सर्व रुग्णालये कोविड-19 चा सामना करण्यासाठी समर्पित आहेत.
  • कोविड-19 साठी 80,000 अलगीकरण खाटा तयार करण्यासाठी, 5,000 रेल्वे डब्यांचे रूपांतर विलगीकरण/ अलगीकरण सुविधांमध्ये करण्यासाठी रेल्वे कार्यरत आहे. 3,250 डब्यांचे यापूर्वीच रूपांतर करण्यात आले आहे.
  • देशातील स्वयंसेवी संस्थाना भारतीय अन्न महामंडळाकडून मुक्त बाजारपेठ योजनेअंतर्गत थेट अन्नधान घेण्याची परवानगी देण्यात आली आहे, जेणेकरुन या संस्था स्थलांतरित कामगार आणि गरिबांसाठीची कल्याणकारी कामे करण्यासाठी त्याचा वापर करू शकतील.
  • मंत्रीगटाची उच्चतरीय बैठक झाली ज्यात कोविड19 चा मुकाबला करण्यासाठी कंटेन्मेंट, व्यवस्थापन आणि कोरोनासाठी समर्पित रुग्णालये स्थापन करण्याबाबत चर्चा झाली. त्यासोबतच, राज्यांशी समन्वय साधून ही कामे जलदगतीने करण्यावर ही चर्चा झाली.
  • मंत्रीगटाच्या बैठकीत PPE, N95 मास्क आणि व्हेंटिलेटर  यांच्या पुरवठ्याबाबत देखील चर्चा करण्यात आली आहे. वरील वस्तूंचा पुरवठा सुरू झाला आहे- PPE चा पुरवठा करण्यासाठी 20 स्थानिक उत्पादक तैनात केले आहेत, 1.7 कोटी PPE आणि 49,000 व्हेंटिलेटरची मागणी नोंदवली आहे
  • या मंत्रीगटाच्या बैठकीत प्रयोग शाळांविषयी आणि  रुग्ण अधिक असलेल्या जागा व परिसरांमध्ये प्रयोगशाळा वाढवण्याबाबत देखील चर्चा झाली.
  • योद्ध्यांप्रमाणे काम करून आपली सेवा करणाऱ्या आपल्या आरोग्य व्यावसायिकांना समुदायाचे संपूर्ण पाठबळ मिळणे गरजेचे असल्याचे  मंत्रिगटाने नमूद केले
  • आपण कोणत्याही खोट्या बातम्या/ अफवांवर विश्वास न ठेवणे सध्या अत्यंत महत्वाचे आहे, जेणेकरुन लोकांमध्ये अनावश्यक घबराट निर्माण होणार नाही, यावर या मंत्रीगटाच्या बैठकीत भर देण्यात आला. तसेच, आपण सतत जागरूक राहून केवळ केंद्र तसेच राज्य सरकारांकडून येणाऱ्या  खऱ्या बातम्या आणि वस्तुस्थिती वेळोवेळी जनतेपर्यंत पोहचवणे गरजेचं आहे.
  • पुरेसे PPEs नसल्याची भीती निर्माण केली जात आहे ; मात्र, यापूर्वी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्वानाच PPEs ची गरज नसते हे आपण लक्षात घेतले पाहिजे, ज्या ठिकाणी  PPEs ची खरोखरच गरज असते तिथेच त्यांचा वापर करणे महत्वाचे आहे.
  • PPE चा वापर व्यक्तीला असलेला संसर्गाचा धोका लक्षात घेऊन करायचा आहे. त्याचा प्रत्यक्ष वापर हा सांगितलेल्या प्रमाणित पद्धतीनेच आणि मार्गदर्शक तत्वानुसारच करायचा आहे.
  • PPE म्हणजे केवळ पूर्ण आच्छादन नाही, ते विविध घटकांचे मिश्रण असते. हे सर्व घटक अती जास्त धोका असलेल्या भागात आवश्यक असतात, जिथे नमुने तपासले जातात तिथे, ईमर्जन्सी रूम्समध्ये आणि शवागार इथे ते वापरतात, इतर ठिकाणी N95 मास्क  आणि हातमोजे पुरेसे असतात.
  • PPE किट्स च्या उपलब्धतेबाबत कुठलीही चिंता करण्याची गरज नाही, केंद्र सरकार सर्व राज्यांना या किट्स चा पुरेसा पुरवठा करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. मात्र, आपण या PPE किट्स चा योग्य आणि योग्य पद्धतीने वापर करणे अधिक महत्त्वाचे आहे.
  • Hydroxychloroquine चा वापर योग्य निकषानुसार झाला पाहिजे; ते केवळ कोविड-19  रुग्णांची हाताळणी करणारे डॉक्टर आणि संपर्कात आलेल्यांनाच दिले पाहिजे;हृदय विकार असलेल्या लोकांसाठी ते धोकादायक ठरू शकते. म्हणूनच HCQ चा वापर केवळ विशिष्ट श्रेणीतील लोकांसाठीच झाला पाहिजे.
  • हायड्रोक्सीक्लोरोक्वीनची आजची आणि भविष्यातील आवश्यकता लक्षात घेऊन, देशाने त्याची तजवीज आणि नियोजन करुन ठेवलं आहे; सध्या आपल्याकडे गरजेपेक्षा अधिक साठा उपलब्ध आहे. आगामी गरजांची पूर्तता करण्यासाठी सरकार 100 टक्के सज्ज आहे.
  • लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी राज्यांकडून हेल्पलाईन, apps, मदत छावणी, अन्नछत्र  आणि निवारे यांसारख्या उपाययोजना केल्या जात आहेत. MHA नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून काल 300 हून जास्त समस्यांचे निराकरण करण्यात आले.
  • ईशान्य भारतातील प्रदेशांसाठी असलेल्या 1944 या हेल्पलाईनद्वारे सर्व सेवा प्रभावीपणे पोचवल्या जात आहेत लॉकडाऊनच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत गृहमंत्रालयाने दिलेली ताजी माहिती
  • लखनौ जिल्ह्यात, हॉटेलांचा वापर कोविड-19 विलगीकरण सुविधा म्हणून केला जात आहे.
  • गरीब, वंचित गटांना सहाय्य करण्यासाठी दररोज, 90,000 लोकांना भोजन दिले जात आहे, गृह-विलगीकरणात असलेल्या सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी समर्पित KarnalLiveTracker  आणि फळे, भाजीपाला आणि इतर वस्तू घरपोच पोचवण्यासाठी NeedOnWheels हे अँप देखील कर्नालमध्ये वापरले जात आहे.
  • कर्नाल जिल्हा, हरयाणा ने कुटुंब दत्तक घ्या अभियान सुरु केले आहे, याअंतर्गत लोक गरजू कुटुंबाना लॉकडाऊनच्या काळात मदत करण्यासाठी योगदान देत आहेत ; याअंतर्गत मिळालेल्या. 64 लाख रुपयांच्या योगदानाद्वारे, 13,000 कुटुंबाना मदत देण्यात आली आहे

@PIBMumbai चे प्रेस कॉन्फरन्सचे लाइव ट्वीट पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Other updates:

 

***

 

DJM/RT/MC/SP/PM

 



(Release ID: 1612675) Visitor Counter : 322