कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
कोविड-19 बाबत जागृतीसाठी डॉ जितेंद्र सिंह यांनी निवृत्ती धारकांसमवेत घेतला 'वेबीनार'
Posted On:
09 APR 2020 6:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 एप्रिल 2020
कोविड-19 वर मात करण्याच्या उपाययोजनांचा भाग म्हणून, कोविड-19 संबंधित माहिती आणि जागृतीसाठी, केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार, निवृत्तीवेतन राज्य मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली, निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाने आज, वेबीनार (ऑनलाईन संवाद) आयोजित केला. 22 शहरांमधले 100 निवृत्तीवेतन धारक यामध्ये सहभागी झाले. यावेळी एम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया आणि एम्सचे सहयोगी प्राध्यापक डॉ प्रसून चटर्जी यांनी, कोरोना विषाणूचा प्रसार, आरोग्य विषयक सद्यस्थिती, खबरदारीचा उपाय म्हणून काय करावे आणि कोणत्या गोष्टी करू नये याबाबत मार्गदर्शन केले.
प्रश्न उत्तराच्या सत्रात, देशाच्या विविध भागातल्या निवृत्तीवेतनधारकांनी,उपस्थित केलेल्या शंकाचे डॉ गुलेरिया आणि डॉ चटर्जी यांनी विस्तृत माहिती देत निरसन केले. कोविड-19 मुळे वृद्धांमधे जीवितहानीचा धोका जास्त आहे. वृद्धांची रोग प्रतिकार क्षमता क्षीण असल्यामुळे,कोविड-19 संसर्गाची त्यांना लागण होण्याचा धोका जास्त संभवतो, असे डॉ जितेंद्र सिंह यांनी यावेळी सांगितले. या महामारीवर मात करण्यासाठी आरोग्य विषयक चांगल्या सवयी अतिशय महत्वाच्या आहेत. कोविड-19 विषयी अद्ययावत माहिती आणि कोविड-19 चा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आपण आलो तर सावधगिरीचा इशारा देणारे, आरोग्य सेतू हे ऐप डाऊनलोड करण्याचे आवाहन त्यांनी निवृत्तीवेतनधारकांना केले.
जनतेच्या सुरक्षिततेसाठी अथक काम करणारे डॉक्टर हे कोरोना योद्धे आहेत अशा शब्दात त्यांनी डॉक्टरांची प्रशंसा केली. जबाबदारी पेलण्यासाठी, भारताचे आरोग्य क्षेत्र अधिक व्यापक करण्यात येत असून, जनतेच्या सुरक्षिततेसाठी,त्याचबरोबर आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राखण्यासाठी, सरकार आवश्यक ती सर्व पावले उचलत असल्याचे आश्वासन त्यांनी निवृत्तीवेतनधारकांना दिले.
U.Ujgare/N.Chitale/P.Malandkar
(Release ID: 1612603)
Visitor Counter : 189
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam