नागरी उड्डाण मंत्रालय

"लाईफलाईन उडान" विमानांद्वारे देशभरात 07 एप्रिल 2020 रोजी 39 टन पेक्षा जास्त वैद्यकीय साहित्याचा पुरवठा

Posted On: 08 APR 2020 7:48PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 8 एप्रिल 2020

 

लाईफलाईन उडान विमानांद्वारे 7 एप्रिल २०२० रोजी देशभरात 39.3 टन वैद्यकीय साहित्याचा पुरवठा केला गेला. कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात या विमानांद्वारे एकूण 240 टन मालाची वाहतूक झाली. लाईफलाईन उडान अंतर्गत 161 विमानांनी उड्डाण करून 1,41,080 किलोमीटर अंतर पार केले. त्यापैकी 99 विमाने एअर इंडिया आणि अलायन्स एअरने चालविली तर 54 विमाने भारतीय हवाई दलामार्फत चालविण्यात आली. आंतरराष्ट्रीय मार्गावर, 7 एप्रिल २०२० रोजी एअर इंडियाने हाँगकाँगमधून 6.14 टन वैद्यकीय उपकरणे आणली आणि पुढे एअर इंडियाने कोलंबोला 8.85 टन मालाचा पुरवठा केला.

लाईफलाईन उडान विमानांची दैनिक अद्यतने नवीन छायाचित्रासह वैद्यकीय हवाई मालवाहतुकीशी संबंधित संकेतस्थळ लाइफलाइन उडान लिंक https://esahaj.gov.in/lifline_udan वर उपलब्ध आहेत. विमाने आणि मालाचा तपशील विविध संस्था आणि सरकारी संस्थांकडून सतत अपलोड केला जातो ज्यामुळे पोर्टलवरून विविध तपशीलांचा समन्वय साधून आणि त्यांच्या सहयोगाने योजना प्रभावीपणे राबविली जाऊ शकते. वापरकर्त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवून त्यांच्या गरजा भागविण्याच्या उद्देशाने या पोर्टलवर सुधारणा केल्या जात आहेत.

 

तारीख

एअर इंडिया

अलायन्स

आयएएफ

इंडिगो

स्पाईस जेट

एकूण विमाने

07/04/2020

04

02

03

-----

-----

09

 

 

 

 

 

 

 

 

जम्मू-काश्मीर, लडाख, ईशान्य आणि इतर बेट प्रांतासाठी एअर इंडिया आणि आयएएफने प्रामुख्याने सहयोग केला.

देशांतर्गत मालवाहू कंपन्या ; ब्ल्यू डार्ट, स्पाइसजेट आणि इंडिगो व्यावसायिक आधारावर मालवाहू उड्डाणे चालवित आहेत. स्पाइसजेटने 24 मार्च ते 7 एप्रिल २०२० पर्यंत 203 मालवाहू विमानांचे उड्डाण केले. ज्यामध्ये 2,77, 080 कि.मी. अंतर पार करून 1647.59 टन मालवाहतूक केली. यापैकी 55 आंतरराष्ट्रीय मालवाहू उड्डाणे होती. ब्लू डार्टने 25 मार्च ते 7 एप्रिल 2020 या काळात 64 देशांतर्गत मालवाहू विमानांचे उड्डाण करून 62,245 किमी अंतर कापून 951.73 टन मालवाहतूक केली. इंडिगोने 8 मालवाहू विमानांद्वारे 3 - 4 एप्रिल 2020 या काळात 6103 कि.मी. अंतर पार करून 3.14 टन मालवाहतूक केली.

स्पाइसजेटने केलेली देशांतर्गत मालवाहतूक ( 07.4.2020 पर्यंत)

तारीख

एकूण विमाने

टन

किमी

07/04/2020

12

96.89

13,634

 

स्पाइसजेटने केलेली आंतरराष्ट्रीय मालवाहतूक ( 07.4.2020 पर्यंत)

तारीख

एकूण विमाने

टन

किमी

07/04/2020

2

20.57

5,236

 

ब्लू डार्टने केलेली मालवाहतूक ( 07.4.2020 पर्यंत)

तारीख

एकूण विमाने

टन

किमी

07/04/2020

6

89.600

7131.30

 

B.Gokhale/V.Joshi/P.Kor



(Release ID: 1612338) Visitor Counter : 132