नागरी उड्डाण मंत्रालय

लाईफलाईन उडानच्या विमानांद्वारे जोरहाट, लेंगपुई, दिमापूर, इंफाळ आणि इतर ईशान्येकडील भागात वैद्यकीय सामुग्रीचा पुरवठा

Posted On: 07 APR 2020 5:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 एप्रिल 2020

 

कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात हवाई वाहतूक क्षेत्रातील विविध साधनांचा चांगल्या प्रकार उपयोग व्हावा यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालय ऑनलाईन बैठक आणि व्हर्च्युअल वॉर रूमच्या माध्यमातून आगाऊ योजना आखत आहे. मागणीनुसार साधन-सामुग्रीचा पुरवठा करण्यात कोणतीही कसर राहणार नाही, यासाठी हे नियोजन करण्यात आहे. 

दिवसाच्या नियोजनाचा आणि मागील दिवसाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाची दररोज सकाळी आठ वाजता चिंतन बैठक असते. याव्यतिरिक्त, दिवसाच्या नियोजनाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आणि दिवसागणिक काही बदल आवश्यक आहेत का, ते तपासण्यासाठी दररोज दुपारी 3 वाजता मंथन बैठक आयोजित केली जाते. या बैठकीत, आवश्यकतेचे आणि स्त्रोतांच्या वितरणाचे मूल्यांकन करण्यासाठी पुढील नियोजन देखील केले जाते.

नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या लाईफलाईन उडान उपक्रमांतर्गत दुर्गम व डोंगराळ भागासह भारतातील विविध भागात वैद्यकीय सामुग्रीची वाहतूक करण्यासाठी देशभरात आजपर्यंत 152 मालवाहतूक उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत. एअर इंडिया, अलायन्स एअर, आयएएफ आणि खाजगी विमान कंपन्यांच्या सहकार्याने लॉकडाऊन कालावधीत 200 टनांपेक्षा जास्त वैद्यकीय साधन-सामुग्रीचा पुरवठा आजपर्यंत झाला आहे.

6 एप्रिल 2020 रोजी, लाईफलाईन उडानच्या विमानांनी ईशान्य भागातील अनेक ठिकाणी आणि मध्य आणि पूर्वेकडील राज्यांपर्यंत आयसीएमआर किट, एचएलएल माल व इतर आवश्यक मालाची वाहतूक केली आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहेः

लाईफलाईन 1 (आयएएफ) दिल्ली- रांची- पटना - जोरहाट- लेंगपुई - इंफाळ - दिमापूर-गुवाहाटी -- गुवाहाटीसाठी (50 किलो) आयसीएमआर किट्स, रेडक्रॉससह आसामसाठी (800 किलो) माल, मेघालयसाठी (672 किलो) आणि उर्वरित माल मणिपूर, नागालँडसाठी, दिब्रूगडसाठी आयसीएमआर किट,  मिझोरमसाठी  (300 किलो) माल, रांचीसाठी  (500 किलो) आणि पटनासाठी आयसीएमआर किट (50 किलो) मालवाहतूक केली.

लाईफ लाइन 2 अलायन्स एअर (एटीआर): दिल्ली-वाराणसी-रायपूर-हैदराबाद-दिल्ली-

वाराणसीसाठी आयसीएमआर किट (50 किलो), रायपूरसाठी आयसीएमआर किट (50  किलो), हैदराबादसाठी आयसीएमआर किट (50  किलो), विजयवाडासाठी आयसीएमआर किट (50 किलो) आणि हैदराबादसाठी (1600 किलो) मालवाहतूक केली.

लाईफ लाइन 3 एअर इंडिया (ए 320 ): मुंबई-बेंगळुरू-चेन्नई-मुंबई

वस्त्रोद्योग मंत्रालयाचा माल, बेंगळुरूसाठी एचएलएल माल, चेन्नईसाठी एचएलएल माल याची वाहतूक केली.

लाइफ लाइन 4: स्पाइस जेट एसजी (7061) दिल्ली-चेन्नईने आयसीएमआर माल चेन्नईला नेला.

लाइफ लाइन:: एआय चार्टर (ए 320) दिल्ली-डेहराडूनने डेहराडूनसाठी आयसीएमआर माल वाहून नेला.

तारखेनुसार तपशील खालीलप्रमाणे आहेः

अनु क्र.

तारीख

एअर इंडिया

अलायन्‍स

आयएएफ

इनडिगो

स्‍पाइस जेट

एकूण उड्डाणे

1

26.3.2020

02

--

-

-

02

04

2

27.3.2020

04

09

01

-

--

14

3

28.3.2020

04

08

-

06

--

18

4

29.3.2020

04

10

06

--

--

20

5

30.3.2020

04

-

03

--

--

07

6

31.3.2020

09

02

01

 

--

12

7

01.4.2020

03

03

04

--

-

10

8

02.4.2020

04

05

03

--

--

12

9

03.4.2020

08

--

02

--

--

10

10

04.4.2020

04

03

02

--

--

09

11

05.4.2020

--

--

16

--

--

16

12

06.4.2020

03

04

13

 

 

20

 

एकूण उड्डाणे

49

44

51

06

02

152

 

 

* लडाख, कारगिल, दिमापूर, इम्फाल, गुवाहाटी, चेन्नई, अहमदाबाद, पटना, जोरहाट, लेंगपुई, म्हैसूर, हैदराबाद, रांची, जम्मू, श्रीनगर, चंदीगड आणि पोर्ट ब्लेअरसाठी  एअर इंडिया आणि आयएएफने सहयोग केला.

मुख्य केंद्रातून गुवाहाटी, दिब्रुगड, अगरतला, आयझवाल, दिमापूर, इंफाळ, जोरहाट, लेंगपुई, मैसूर, कोयंबटूर, त्रिवेंद्रम, भुवनेश्वर, रायपूर, रांची, श्रीनगर, पोर्ट ब्लेअर, पाटणा, कोचीन, विजयवाडा, अहमदाबाद, जम्मू, कारगिल, लडाख, चंदीगड आणि गोवा येथील केंद्रांना मालवाहतूक केली.

Total Kilometers covered

1,32,029 Kms

Cargo load carried on 06.04.2020

15.54Tons

Total cargo load carried till 06.04.2020

­

184.66 + 15.54 = 200.20Tons

 

आंतरराष्ट्रीय

शांघाय आणि दिल्ली दरम्यान हवाई पूल उभारला. एअर इंडियाचे पहिले मालवाहू उड्डाण 4 एप्रिल 2020 रोजी झाले आणि 21 टन वैद्यकीय उपकरणे आणली. हाँगकाँगला आणखी एक उड्डाण होत आहे. आवश्यकतेनुसार आपत्कालीन वैद्यकीय उपकरणे आणण्यासाठी एअर इंडिया चीनला मालवाहू विमाने पाठविणार आहे.

 

खाजगी मालवाहू विमान कंपन्या

देशांतर्गत मालवाहू कंपन्या ; ब्ल्यू डार्ट, स्पाइसजेट आणि इंडिगो व्यावसायिक आधारावर मालवाहू उड्डाणे चालवित आहेत. स्पाइसजेटने 24 मार्च ते 6 एप्रिल २०२० पर्यंत 189 मालवाहू विमानांचे उड्डाण केले. ज्यामध्ये 2,58,210 कि.मी. अंतर पार करून  1530.13 टन मालवाहतूक केली. यापैकी 53 आंतरराष्ट्रीय मालवाहू उड्डाणे होती. ब्लू डार्टने 25 मार्च ते 6 एप्रिल 2020 या काळात  58 देशांतर्गत मालवाहू विमानांचे उड्डाण करून  5,51,14 किमी अंतर कापून  862.2 टन मालवाहतूक केली. इंडिगोने  8 मालवाहू विमानांद्वारे 3 - 4 एप्रिल 2020 या काळात  6103 कि.मी. अंतर पार करून 3.14  टन मालवाहतूक केली.

 

 

 

U.Ujgare/V.Joshi/D.Rane
 


(Release ID: 1612076) Visitor Counter : 211