शिक्षण मंत्रालय

कोविड-19 च्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्‍यांच्या मानसिक आणि शारीरिक तंदुरूस्तीसाठी मनुष्यबळ विकास मंत्रालय, विद्यापीठ अनुदान आयोगाकडून सूचनापत्र जारी

Posted On: 06 APR 2020 3:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 एप्रिल 2020

 

संपूर्ण देशभरामध्ये कोविड-19 महामारीचा उद्रेक झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आपल्या मंत्रालयाअंतर्गत, येणाऱ्या सर्व स्वायत्त संस्था प्रमुखांना एक सल्ला-सूचना पत्र पाठवले आहे. यानुसार विद्यार्थ्‍यांच्या मानसिक आणि शारीरिक तंदुरूस्तीसाठी कोणती आवश्यक पावले सर्व संस्थांनी उचलणे गरजेचे आहे, याविषयी निर्देश दिले आहेत. 

कोविड-19 संकटकाळामध्ये आणि हे संकट संपुष्टात आल्यानंतर विद्यार्थी वर्गाचे मानसिक आणि सामाजिक आरोग्य चांगले राखणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व विद्यापीठांनी आणि महाविद्यालयांनी पुढील उपाय योजना कराव्यात असे सांगण्यात आले आहे. या भयंकर महामारीनंतर विद्यार्थ्‍यांचे कल्याण त्यांच्या भावनिक-सामाजिक अपेक्षापूर्ती करणं गरजेचं आहे. त्यासाठी पुढील पावले उचलण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

  1. विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी विद्यार्थी वर्गाच्या मानसिक आरोग्यासाठी त्यांच्या भावनिक-सामाजिक चिंता लक्षात घेवून त्यांच्या कल्याणासाठी एक हेल्प लाइन सुरू करावी. समुपदेशक आणि इतर प्राध्यापक सदस्यांच्या मार्फत मुलांचे नियमित परीक्षण करण्यात यावे.
  2. परस्परांमध्ये संवाद साधून विद्यार्थ्‍यांना नियमित मार्गदर्शन करण्यात यावे. मुलांनी शांतचित्त आणि तणावमुक्त रहावे यासाठी विद्यापीठांनी, महाविद्यालयांनी आवाहन करावे, पत्रे लिहावीत. मुलांशी संवाद साधण्याचे कार्य दूरध्वनी, इ-मेल, डिजिटल आणि समाज माध्यमांचा वापर करण्यानेही होवू शकेल.
  3. विद्यार्थ्‍यांसाठी कोविड-19 मदत गट स्थापन करण्यात यावा. यामध्ये वसतिगृह संचालक, वरिष्ठ प्राध्यापक यांचा समावेश करून मुलांना, त्यांच्या मित्रांना जे ओळखतात, त्यांच्यामार्फत आवश्यक ती मदत देता येणे शक्य होईल.
  4. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या पुढील व्हिडिओची लिंक- https://www.mohfw.gov.in/ आपल्या विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर ‘शेअर’ करावी. तसेच विद्यार्थी, शिक्षकवर्ग यांना ई-मेल, फेसबुक, व्हॉटसअॅप आणि व्टिटरसारख्या समाज माध्यमांच्या मदतीने सामायिक करण्यात यावी.

सध्या लॉकडाऊनच्या काळात घरामध्ये आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी व्यावहारिक सल्ला घेण्यासाठी पुढील लिंकचा वापर करावा-

https://www.youtube.com/watch?v=uHB3WJsLJ8s&feature=youtu.be

कोविड-19 मध्ये मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी पुढील लिंकचा वापर करावा-

https://www.mohfw.gov.in/pdf/MindingourmindsduringCoronaeditedat.pdf

कोविड-19 मध्ये मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी आरोग्य तज्ञांची मदत म्हणून  पुढील लिंकचा वापर करावा –

https://www.youtube.com/watch?v=iuKhtSehp24&feature=youtu.be

वर्तन आरोग्य आणि मानसिक-सामाजिक समस्या असेल तर पुढील टोल फ्री क्रमांकावर संपर्क  साधावा -  0804611007

या सर्व उपाय योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने आणि नियमितपणे करण्यात यावी. यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ‘युनिव्हर्सिटी अॅक्टिव्हिटी मॉनिटरिंग पोर्टल- ugc.ac.in/uamp  वर योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे.

 

B.Gokhale/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 (Release ID: 1611733) Visitor Counter : 844