ऊर्जा मंत्रालय
5 एप्रिलला 9 वाजता 9 मिनीटे दिवे बंद ठेवण्याच्या निर्णयावर उपस्थित शंकांचे वीज मंत्रालयाने दिलेले स्पष्टीकरण
Posted On:
04 APR 2020 3:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 एप्रिल, 2020
पंतप्रधानांनी नागरिकांना 5 एप्रिलला रात्री 9.00 ते 9.09 च्या दरम्यान स्वयंस्फूर्तीने आपल्या घरातले वीजेचे दिवे बंद करण्याचे आवाहन केले आहे. यावर काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामुळे पॉवरग्रीड अस्थिर होण्याची आणि विजेच्या दाबात अचानक झालेल्या चढउतारामुळे विद्युत उपकरणांना नुकसान पोहचण्याची धास्ती बऱ्याच ठिकाणी व्यक्त होत आहे. ही भिती पूर्णपणे निराधार आहे.
भारताची पॉवरग्रीड ही मजबूत आणि स्थिर असून योग्य व्यवस्थापन आणि नियम यांनी बांधलेली आणि त्याचमुळे मागणीतले चढउतार पेलण्यासाठी सक्षम आहे. याबाबतीत खालील बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे.
आदरणीय पंतप्रधानांनी 5 एप्रिलला रात्री 9.00 ते 9.09 च्या दरम्यान फक्त आपापल्या घरातले विजेचे दिवे बंद करायला सांगितले आहे. पथदिवे किंवा घरातील अन्य विजेवर चालणारी उपकरणे उदाहरणार्थ संगणक, दूरध्वनी, पंखे, रेफ्रिजरेटर्स आणि एअरकंडिशनर हे बंद करण्याचे आवाहन केलेले नाही. फक्त घरातील विजेचे दिवे बंद करायचे आहेत.
रुग्णालये, सार्वजनिक सेवा पुरवणारी इतर ठिकाणे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सेवा, कार्यालये, पोलिस स्थानके, उत्पादन केंद्रे, इत्यादी ठिकाणी दिवे सुरूच ठेवायचे आहेत. आदरणीय पंतप्रधानांनी फक्त घरातील दिवे बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांनी सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विजेचे दिवे सुरूच ठेवावेत अशी सूचना देण्यात येत आहे.
B.Gokhale/V.Sahjrao/D.Rane
(Release ID: 1611059)
Visitor Counter : 372
Read this release in:
Assamese
,
Hindi
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Bengali
,
English
,
Urdu
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam