मंत्रिमंडळ
भारत आणि थायलंड यांच्यात खगोलशास्त्र क्षेत्रातल्या सामंजस्य कराराला मंत्री मंडळाची मंजुरी
प्रविष्टि तिथि:
12 JUN 2019 8:10PM by PIB Mumbai
भारत आणि थायलंड यांच्यात खगोलशास्त्र / खगोल भौतिक/ हवामान विज्ञान क्षेत्रातल्या सामंजस्य कराराची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्री मंडळाच्या बैठकीत माहिती देण्यात आली.
या सामंजस्य करारामुळे, वाढता विज्ञान संवाद आणि प्रशिक्षण तसेच विज्ञान पायाभूत सुविधांचा संयुक्त वापर यातून नवे वैज्ञानिक परिणाम, मनुष्यबळ विकास साध्य करण्यासाठी मदत होणार आहे.
नोव्हेंबर 2018 मधे या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.
***
B.Gokhale /N.Chitale
(रिलीज़ आईडी: 1574206)
आगंतुक पटल : 108