• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

एफसीआयच्या अन्न धान्य वितरण आणि खरेदीचा केंद्रीय मंत्री पासवान यांच्याकडून आढावा


एफसीआय अन्नधान्य वितरणासाठीची जीवनवाहिनी ठरल्याचे गौरवोद्गार

Posted On: 28 MAY 2020 10:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 मे 2020


केंद्रीय अन्न, सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार मंत्री राम विलास पासवान यांनी आज एफसीआय, भारतीय अन्न  महामंडळाच्या विभागीय कार्यकारी संचालक आणि प्रादेशिक महाव्यवस्थापकासमवेत,अन्नधान्य वितरण आणि खरेदी यासंदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे आढावा बैठक घेतली. 

लॉक डाऊनच्या काळात एफसीआयच्या भूमिकेची पासवान यांनी प्रशंसा केली आणि अन्न धान्याची ने-आण सर्वात जास्त राहिल्याचे सांगितले.या जागतिक महामारीच्या संकटाच्या  काळात एफसीआयचे कर्मचारी अन्नधान्य योद्धे म्हणून  पुढे आल्याचे आणि या आव्हानाचे त्यांनी संधीत रुपांतर केल्याचे  सांगितले.लॉक डाऊनच्या काळात  एफसीआयने अन्न धान्याची विक्रमी चढ-उतार आणि वाहतूक केली. दुसरीकडे खरेदीही अडथळ्या विना सुरळीत सुरु राहिली,या वर्षी सरकारी एजन्सीकडून गेल्या वर्षीपेक्षा जास्त गहू खरेदी झाली.या वेळी मंत्र्यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातल्या अन्न धान्य वितरणाचाही आढावा घेतला.

 

आत्मनिर्भर भारत पॅकेज 

आत्मनिर्भर भारत पॅकेज  अंतर्गत स्थलांतरित /अडकलेल्या मजुरांसाठीच्या अन्नधान्य वाटपाचा आढावा घेताना केंद्र सरकारने 37 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना, मे आणि जून 2020 या महिन्यांसाठी 8 एलएमटी अन्नधान्य (2.44 एलएमटी गहू आणि 5.56 एलएमटी तांदूळ) निर्धारित केल्याचे त्यांनी सांगितले. यापैकी 27-5-2020 पर्यंत राज्ये/ केंद्रशासित प्र्देशानी 2.06 एलएमटी अन्नधान्याची उचल केल्याची माहिती एफसीआयने दिली आहे. 

अंदमान निकोबार, आंध्र प्रदेश आणि लक्षद्वीप यांनी आपल्या वाट्याची  दोन महिन्याच्या  संपूर्ण अन्नधान्याची उचल केली आहे. धान्याची उचल वेगाने करण्यासंदर्भात एफसीआयने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी समन्वय साधण्याच्या सूचना मंत्र्यांनी दिल्या.

 

प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजना 

या योजने अंतर्गत केंद्र सरकारने 37 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाना एप्रिल,मेआणि जून 2020 या महिन्यांसाठी  120.04 एलएमटी अन्नधान्य (15.65 एलएमटी गहू आणि 104.4 एलएमटी तांदूळ) निर्धारित केले. लाभार्थीपर्यंत धान्य वेळेत पोहोचावे या दृष्टीने धान्याची उचल वेगाने करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी समन्वय साधण्याचे आवाहन त्यांनी यासंदर्भात आढावा घेताना केले. पीएमजीकेएवाय अंतर्गत मंजूर झालेल्या अन्नधान्यापैकी 27-5-2020 पर्यंत राज्ये/केंद्रशासित प्र्देशानी 95.80 एलएमटी अन्नधान्याची (15.6 एलएमटी गहू आणि 83.38 एलएमटी तांदूळ) उचल केली आहे अशी माहिती एफसीआयने दिली आहे.

 

धर्मादाय/स्वयंसेवी संस्थाना ई लिलावाशिवाय ओएमएसएस (डी) अंतर्गत अन्नधान्य विक्री 

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार 25-5-2020 पर्यंत 186 संस्थाना 1179 मेट्रिक टन गहू आणि 890 संस्थाना 8496 मेट्रिक टन तांदूळ विक्री करण्यासाठी परवानगी दिल्याची माहिती एफसीआयने दिली. यापैकी या संस्थांनी 886 मेट्रिक टन गहू आणि 7778 मेट्रिक टन तांदुळाची उचल केली आहे.

 

पश्चिम बंगाल आणि ओदिशा मधले अम्फान चक्रीवादळ 

पश्चिम बंगाल सरकारने ई लिलावाशिवाय ओएमएसएस (डी) अंतर्गत रु.2250 प्रती क्विंटल दराने 11,800 मेट्रिक टन तांदूळ साठ्यासाठी विनंती केली आहे. मात्र ओदिशा सरकारने आतापर्यंतअन्नधान्याच्या आवश्यकतेबाबत सूचित केले नाही.पश्चिम बंगला आणि ओदिशा या चक्रीवादळाने प्रभावित  राज्य सरकारांशी समन्वय साधून एफसीआयने अन्नधान्याबाबत सध्याच्या स्थितीची माहिती द्यावी असे पासवान यांनी सांगितले.

 

खरेदी (तांदूळ/गहू)

आरएमएस 2020-21 मधे गहू विक्रीचा आणि केएमएस 2019-20 मधे तांदूळ खरेदीचा आढावा पासवान यांनी घेतला. एफसीआयने दिलेल्या माहितीनुसार 27-5-2020 पर्यंत एकूण 351 एलएमटी गहू (आरएमएस 2020-21) खरेदी झाला आहे. 60.40 एलएमटी गहू (आरएमएस) खरेदी झाला आहे. एकूण 700.29 एलएमटी धन (470.23 एलएमटी तांदुळासह) 2019-20 मधे खरेदी करण्यात आला आहे.

 

अन्नधान्याची ने-आण

लॉक डाऊन पासून ईशान्येकडच्या राज्यांसह देशभरात रस्ते, रेल्वे, जलमार्ग आणि दुर्गम डोंगराळ भागात हवाई मार्गाने अन्नधान्याची वाहतूक करण्यात येत आहे. 3550 रेल्वे डब्यातून 100 एलटी अन्नधान्याची वाहतूक करण्यात आली.रस्तेमार्गे 12 एलटी तर 12,000 टन अन्नधान्य वाहतूक 12 जहाजांच्या माध्यमातून करण्यात आली. ईशान्येकडच्या राज्यांना एकूण 9.61 एलएमटी अन्नधान्य वाहतूक करण्यात आली.

 

सेन्ट्रल पूल मधला साठा 

27.05.2020 रोजीच्या साठ्याच्या स्थितीबाबत एफसीआयने  माहिती दिली. सेन्ट्रल पूलमधे 479.40 एलएमटी गहू आणि 272.29 एलएमटी तांदूळ असा एकूण 751.69 एलएमटीअन्नधान्य साठा उपलब्ध आहे.देशाची सध्याची आणि भविष्यातली अन्नधान्याची गरज भागवण्याच्या दृष्टीने या साठ्याबाबत पासवान यांनी समाधान व्यक्त केले.संकटाच्या या काळात कठोर परीश्रम करणाऱ्या एफसीआय चे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सरकार सर्वतोपरी सहाय्य करेल असे पासवान म्हणाले. 


* * *

B.Gokhale/N.Chitale/D.Rane

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com



(Release ID: 1627542) Visitor Counter : 294


Link mygov.in