गृह मंत्रालय
कोविड-19 व्यवस्थापनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि आरोग्य सचिवांची बैठक संपन्न
प्रविष्टि तिथि:
10 MAY 2020 3:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 मे 2020
कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि आरोग्य सचिवांसोबत बैठक घेऊन कोविड-19 व्यवस्थापनाच्या स्थितीचा आढावा घेतला.
सुरुवातीलाच, कॅबिनेट सचिवांनी नमूद केले की, 350 हून अधिक श्रमिक विशेष रेल्वेगाड्या 3.5 लाखांहून अधिक स्थलांतरित कामगारांना त्यांच्या गावी घेऊन जात आहेत. गौबा यांनी, अधिकाधिक श्रमिक विशेष रेल्वेगाड्या चालविण्यासाठी रेल्वेला सहाय्य करण्याची विनंती राज्य सरकारांना केली. वंदे भारत मिशन अंतर्गत, परदेशातील नागरिकांना भारतात परत आणण्यासाठी राज्य सरकारांनी केलेल्या सहकार्याचे त्यांनी कौतुक किल.
डॉक्टर, परिचारिका आणि पॅरामेडिक्सच्या हालचालींवर कोणतेही बंधन लावू नये आणि कोरोना योद्ध्यांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली पाहिजेत यावर त्यांनी जोर दिला.
राज्य मुख्य सचिवांनी त्यांच्या राज्यातील परिस्थीची माहिती दिली आणि सांगितले की, कोविड पासून संरक्षण आवश्यक असतानाच आर्थिक उपक्रम देखील अशंतः पद्धतीने सुरु करणे गरजेचे आहे.
* * *
B.Gokhale/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1622656)
आगंतुक पटल : 192
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam