• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय रेल्वेने 9 मे 2020(1430hrs) पर्यंत देशभरात 283 श्रमिक विशेष गाड्या चालवल्या


प्रवाश्यांना मोफत जेवण आणि पाणी

प्रत्येक श्रमिक विशेष गाडीत सुमारे 1200 प्रवासी

Posted On: 09 MAY 2020 11:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 मे 2020

 

लॉकडाऊनमुळे देशाच्या विविध भागात अडकलेले स्थलांतरित मजूर, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर व्यक्तींना विशेष रेल्वेने मूळ गावी परतता येईल याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर रेल्वेने श्रमिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला.

9 मे 2020 पर्यंत देशाच्या विविध राज्यातून 283 श्रमिक विशेष गाड्या चालवण्यात आल्या, यापैकी 225 गाड्या आपल्या नियोजित स्थानी पोहोचल्या तर 58 गाड्या अद्याप वाटेवर आहेत. आज म्हणजे शनिवारसाठी 49 श्रमिक विशेष गाड्या नियोजित आहेत.

या 283 गाड्यांपैकी, आंध्रप्रदेश (2 गाड्या), बिहार (90 गाड्या), हिमाचल प्रदेश (1 गाडी), झारखंड (16 गाड्या), मध्य प्रदेश (21 गाड्या), महाराष्ट्र (3 गाड्या), ओदिशा (3 गाड्या), राजस्थान (4 गाड्या), तेलंगणा (2 गाड्या), उत्तरप्रदेश (121 गाड्या), पश्चिम बंगाल (2 गाड्या) अशाप्रकारे राज्यात त्यांचा प्रवास समाप्त झाला.

या गाड्यांनी प्रयागराज, छप्रा, बलिया, गया, पूर्णिया, वाराणसी, दरभंगा, गोरखपूर, लखनौ, जौनपुर, हतिया, बस्ती, कथिहार, दानापूर, मुझफ्फरपूर, सहारसा इत्यादी ठिकाणी प्रवाश्यांना पोहोचवले आहे.

सोशल डीस्टन्सिंगचे पालन करत जास्तीत जास्त सुमारे 1200 प्रवासी या श्रमिक विशेष गाडीतून प्रवास करू शकतात. गाडी सुरु होण्यापूर्वी प्रवाश्यांची तपासणी सुनिश्चित करण्यात येते. प्रवासादरम्यान प्रवाश्यांना मोफत भोजन आणि पाणी पुरविले जाते. 


* * *

B.Gokhale/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com


(Release ID: 1622615) Visitor Counter : 274


Link mygov.in
National Portal Of India
STQC Certificate