• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
अल्पसंख्यांक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुख्तार अब्बास नक्वी यांनी भारतीय मुसलमानांना कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर रमझानच्या पवित्र महिन्यात लॉकडाऊन आणि सामाजिक अंतराच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले


24 एप्रिल पासून रमझानच्या पवित्र महिन्याची सुरवात संभाव्य

नमाज अदा करणे आणि इतर धार्मिक विधी घरात राहूनच करा – मुख्तार अब्बास नक्वी

Posted On: 13 APR 2020 7:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 एप्रिल 2020

 

केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज भारतीय मुसलमानांना, कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर 24 एप्रिल पासून सुरु होणाऱ्या पवित्र रमझान महिन्यात लॉकडाऊन आणि सामाजिक अंतराच्या मार्गर्दर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करत, घरात राहूनच नमाज अदा करणे आणि इतर धार्मिक विधी करण्याचे आवाहन केले आहे. 
नक्वी हे भारतातील राज्य वक्फ मंडळाच्या नियामक मंडळाच्या केंद्रीय वक्फ परिषदेचे अध्यक्ष देखील आहेत. देशभरातील 7 लाखांहून अधिक नोंदणीकृत मशिदी, इदगाह, इमामवाडा, दर्गा आणि इतर धार्मिक संस्था या राज्य वक्फ मंडळाच्या अखत्यारीखाली येतात अशी माहिती त्यांनी दिली.  
सौदी अरेबियासह बहुतांश मुस्लीम देशांनी रमझानच्या महिन्यात धार्मिक ठिकाणी मोठ्या संख्येने एकत्रित यायला प्रतिबंध केला आहे, ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. 
नक्वी म्हणाले की, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रमझानच्या पवित्र महिन्यात,  गांभीर्याने आणि प्रामाणिकपणे लॉकडाऊन आणि सामजिक अंतरा संदर्भातील मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी, श्री नक्वी यांनी विविध धार्मिक नेते, विविध सामाजिक आणि धार्मिक संस्थाचे प्रतिनिधी, राज्य वक्फ मंडळाचे अधिकारी आणि इतर पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांना आवाहन केले आहे. लोक त्यांच्या घरात राहूनच रमझान चे सर्व धार्मिक विधी पार पडतील हे त्यांनी सुनिश्चित करावे, असे त्यांनी सांगितले.
 
नक्वी म्हणाले की, रमझानच्या पवित्र महिन्यात कोणत्याही परिस्थितीत  लोक धार्मिक आणि इतर ठिकाणी जमा होणार नाहीत हे सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय वक्फ परिषदेने, राज्य वक्फ मंडळाला ही परिस्थिती प्रभावीपणे हाताळण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात, विविध धार्मिक आणि सामाजिक संस्था, लोक आणि स्थानिक प्रशासनाची मदत घेण्याची आवश्यकता आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात लॉकडाऊन आणि सामजिक अंतराच्या नियमांची काटेकोरपणे आणि प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी या धार्मिक आणि सामाजिक संस्था तसेच व्यक्तींना स्थानिक प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. 

राज्य वक्फ मंडळ आणि धार्मिक-सामाजिक संस्थाच्या स्वयंप्रेरित, प्रभावी आणि सकारत्मक प्रयत्नांमुळेच देशभरातील मुसलमानांनी 8 आणि 9 एप्रिल रोजी घरात राहूनच नमाज आणि इतर धार्मिक विधी पार पाडत शब-ए-बारात पाळली असे नक्वी म्हणाले. कोरोना महामारीमुळे उद्भवलेली आव्हाने लक्षात घेत, भारतीय मुसलमानांनी शब-ए-बारातच्या प्रसंगी लॉकडाऊन आणि सामाजिक अंतराच्या नियमांची काटेकोरपणे आणि प्रभावीपणे अंमलबजावणी केली हे कौतुकास्पद आहे.  
नक्वी म्हणाले की कोरोना महामारीचे आव्हान लक्षात घेत देशभरातील देऊळे, मशिदी, गुरुद्वारा, चर्च आणि इतर धार्मिक ठिकाणांची सर्व धार्मिक कार्ये रद्द करण्यात आली आहेत. लॉकडाऊन आणि सामाजिक अंतराच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.
नक्वी म्हणाले की, रमजानच्या पवित्र महिन्यात भारतातही पारंपरिकरित्या लोक देशभरातील लाखो मशिदी, दर्गा, इमामबाडा, ईदगाह, मदरसा आणि इतर धार्मिक स्थळांवर मोठ्या संख्येने एकत्र जमून नमाज अदा करतात आणि "इफ्तार" सह इतर धार्मिक विधी करतात. परंतु कोरोना महामारीमुळे, केंद्र आणि सर्व राज्य सरकारांनी लॉकडाऊन. कर्फ्यू, सामाजिक अंतराची अंमलबजावणी केली आहे.  

नक्वी म्हणाले की, लोकांना जागरूक करण्याची गरज आहे जेणेकरून ते रमजानच्या पवित्र महिन्यात घरात राहून सर्व धार्मिक विधी करतील आणि लॉकडाऊन आणि सामाजिक अंतराचे काटेकोरपणे पालन करतील. अशा प्रयत्नांची आवश्यकता केवळ मशिदी आणि अन्य धार्मिक स्थळांवरच नव्हे तर रमजानच्या पवित्र महिन्यात धार्मिक विधी करण्यासाठी मुसलमान एकत्रित जमणाऱ्या इतर सार्वजनिक तसेच वैयक्तिक ठिकाणी देखील आहे.
नक्वी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत  संपूर्ण देश गंभीरपणे आणि प्रामाणिकपणे लॉकडाऊन आणि सामाजिक अंतरांच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत आहे. कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा हा आपल्यासाठी, आपले कुटुंब, समाज आणि संपूर्ण देशासाठी हानिकारक ठरू शकतो. गांभीर्याने आणि  प्रामाणिकपणे कोरोनाला पराभूत करण्यासाठी प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे आपण पालन केले पाहिजे, असे ते म्हणाले.

 

 


G.Chippalkatti/S.Mhatre/D.Rane
 

 


(Release ID: 1614068) Visitor Counter : 258


Link mygov.in